दैनंदिन व्यवहारासाठी मराठी भाषा अग्रगण्य.- बँकांनी मराठी फलक लावावे.- आजऱ्यात मनसेची बँकांना निवेदने.
आजरा.- प्रतिनिधी.
रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार महाराष्ट्रातील सर्व बँका व फायनान्स कंपन्या मधील सर्व प्रकारचे व्यवहार व फलक मराठीतून असणे गरजेचे आहे. मात्र सर्व बँका व फायनान्स कंपन्या आरबीआयचे नियम धाब्यावरती बसवून जाणीवपूर्वक मराठी भाषेला डावलून इंग्रजींला प्राधान्य देत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले व आजरा तालुका अध्यक्ष आनंदा घंटे यांच्या नेतृत्वाखाली
दि. ६ रोजी आजरा तालुक्यातील राष्ट्रीय बँक मॅनेजर यांना पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह बँकेमध्ये जाऊन मॅनेजरला मनसे स्टाईलने समज देऊन निवेदन देण्यात आले. मॅनेजर यांच्याशी चर्चा करताना जिल्हाध्यक्ष श्री चौगुले यांनी सूचना दिल्या की बँकेतील व्यवहाराच्या सर्व स्लिपा व फलक हे इंग्रजीत असल्याचे निदर्शनास आणून देऊन बँकेतील सर्व कागदपत्रे व स्लीपा फाडून टाकलीत. सात दिवसांमध्ये सर्व व्यवहार मर्यादित करण्याचे लेखी अभिवचन मॅनेजर यांनी यावेळी दिले आहे.

यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत पुन्हा ७ दिवसांनी तपासणी साठी येण्याचा इशारा दिला.
बचत खाते, चालू खाते यांच्यासाठी भरण्यात येणारी फॉर्म देखील मराठीत हवेत , कर्ज प्रकरणासाठी करण्यात येणारे सर्व करार देखील मराठीतूनच असणे सक्तीचे आहे.

मात्र मराठी अशिक्षित लोकांना इंग्रजी भाषा न समजता आपण इंग्रजी भाषेतून जाचक अटी व नियमांवरती खातेदाराच्या सह्या घेऊन बँकेमार्फत खातेदारांची फसवणूक होत असल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष श्री चौगुले यांनी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने देत असलेल्या निवेदनाची व पुढील आंदोलनाची दखल घेऊन सर्व बँका व फायनान्स कंपनीने येत्या ७ दिवसात दैनंदिन व्यवहारांसाठी वापरण्यात येणारी सर्व चलने, करार, फलक , ग्राहकांशी संवादाची बोलीभाषा ही मराठीतच असावी, असा आग्रह धरून येणाऱ्या ७ दिवसात जर का उपरोक्त मागण्या मान्य नाही.

केल्या तर बँकेमध्ये घुसून मनसे स्टाईलने खळफट्याक आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे तालुकाअध्यक्ष श्री. घंटे यांनी दिला आहे. यावेळी उपतालुका अध्यक्ष अॅ. सुशांत पोवार, सचिव वसंत घाटगे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सरिता सावंत, मयूर हारळकर, विनायक घंटे , सुनील पाटील सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
