आजरा बसस्थानकावर चाफवडेकरचा चक्का जाम..नियमांची एस. टी सोडा..
( कंट्रोलदार यांचा चालत जाण्याच्या प्रवाशांना सल्ला. )
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील आठवडा बाजार दिवशी संध्याकाळीची नियमित असणारी गाडी न सोडल्याने चाफवडे गावातील प्रवासी संतप्त झाले. यामध्येच याबाबतचा जाब संबंधित कंट्रोलदार यांना विचारला असता त्यांनी चालत जावे असा सल्ला देल्याने.. प्रवासी अधिकच संताप झाले व आजरा एसटी डेपोमध्ये गाडी येण्या जाणारे दोन्ही वाटेत बसून बंद केले.
यावेळी प्रवासी म्हणाले मोरेवाडी गाव लहान असताना त्या गावातील जाणाऱ्या गाडीत बसतो असे देखील म्हटले. त्यामध्ये बसण्यात देखील मनाई केली. व चाफवडे गाव मोठे असताना देखील नियमित जाणारी फेरी का बंद केली असा प्रश्न उपस्थित करत या गावातील महिला व पुरुषांनी रस्त्यावर बसून सदर आमच्या गावाला एसटी सोडत नाही तोपर्यंत कोणतीही एसटी बाहेर सोडणार नाही या भूमिकेत ग्रामस्थ आहेत. याबाबतची माहिती घटनास्थळी ग्रामस्थांनी दिली.
