वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची आर्थिक ( स्थैर्याकडे वाटचाल.)
हंगाम अखेरची संपुर्ण उस बिले व तोडणी वाहतुक बिले जमा.
आजरा.- प्रतिनिधी.
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक संघर्ष करीत आहे. अशा परिस्थितीत कारखान्याची पंचवार्षीक निवडणुक होवून डिसेंबर-2023 मध्ये ना. हसन मुश्रीफ यांच्यावर विश्वास ठेवून सभासदांनी विद्यमान संचालक मंडळाकडे कारखान्याची धुरा सोपविली सन 2023-24 हा हंगाम मध्यावर असताना विद्यमान संचालक मंडळाने कारखान्याचा कारभार हातात घेतला. त्यावेळी हायवेचे काम, अपुरी वाहतुक यंत्रणा तसेच मशिनरीच्या तकारीमुळे 111 दिवसात प्रतिदिनी केवळ 2400 मे.टन या सरासरीने 2,64,000 मे.टन इतके ऊस गाळप झाले. त्यामुळे कारखान्याचे कर्जात पुन्हा वाढ झाली. त्यानंतर विद्यमान संचालक मंडळाने आसपासच्या कारखान्यांची संख्या त्यांची वाढलेली गाळप क्षमता याचा विचार करून कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त गाळप व्हावे यासाठी कारखान्याचे जुन्या मशीनरी मध्ये सुधारणा करून त्याला अत्यावश्यक पुरक नवीन मशिनरी बसवून त्याच बरोबर सक्षम तोडणी वाहतुक यंत्रणा उभारणी केली. त्यामुळेच सन 2024-25 हंगामात केवळ 93 दिवसात प्रतिदिनी 3000 मे.टन सरासरीने 2,78,500 मे. टन इतके गाळप झाले. या हंगामात ऊसाच्या एकरी उत्पादनात 20 ते 30 टक्के घट झाली याचा परिणाम म्हणुन गळीताचे दिवस कमी झाले. त्यामुळे गळीताचे उध्दीष्ट पुर्ण करता आले नाही. परिणामी कारखान्याच्या कर्जात भरच पडत गेली.
कारखान्याचे वाढते कर्ज व व्याजाचा भुर्दंड काही अंशी कमी व्हावा या करीता ना. हसन मुश्रीफसाहेब यांनी कारखान्यास एन.सी.डी.सी. कडून मदत घेण्याचे ठरवून तसा प्रस्ताव सादर करणेस सुचना केली. त्यानुसार कारखाना व्यवस्थापणाने रू.152.00 कोटीचा कर्ज प्रस्ताव दाखल केला. सदर प्रस्तावा बाबत मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, ना. हसन मुश्रीफ, आमदार अमल महाडीक व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, त्याच बरोबर साखर आयुक्तसोा, प्रादेशिक सहसंचालक यांनी सकारात्मक प्रतिसाद व विशेष सहकार्य करून आमचे कारखान्यास कमी व्याज दराचे रू.122.68 कोटीचे कर्ज मंजुर केले. त्याबदद्ल कारखाना व्यवस्थापन व आजरा तालुक्यातील जनतेच्या वतीने त्यांचे जाहिर आभार व्यक्त केले. एन.सी.डी. सी.च्या कर्जातुन कारखान्याने के.डी.सी.सी. बँकेंचे अल्पमुदत कर्जाची परतफेड केली. त्याच बरोबर कामगारांचा थकीत प्रा. फंड, ग्रॅच्युईटी व शासकीय कर्जाची परतफेड केली आहे. तसेच माहे मार्च-2025 पासून कामगारांचे यापूर्वीचे 30 टक्के कपाती पैकी 10 टक्के पगार वाढही सुरू केली आहे.

आजरा कारखान्याकडे सन 2024-25 हंगामा मध्ये गळीतास आलेल्या व देय राहीलेल्या संपुर्ण ऊसाची प्रती मे.टन रू.3100/- प्रमाणे उस बिले संबंधीत शेतक-यांच्या खात्यावर जमा करणेत आली असुन हंगाम अखेरची देय तोडणी-वाहतुकीची बिलेही अदा केली आहेत. संचालक मंडळाने येता गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सक्षम तोडणी-वाहतुक यंत्रणा उभारणेसाठी गुढी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर तोडणी वहातुकीचे करार करणेचे काम सुरू केले आहे. पुढील हंगामासाठी ऊस नोंदी व कराराचे कामही सुरू आहे. ज्या शेतक-यांनी अद्याप ऊसाचे करार केले नाहीत. त्यांनी संबंधीत शेती ऑफिसशी संपर्क साधून आपले करार करावेत. त्याच बरोबर आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील उस तोडणी वाहतुक कंत्राटदारांनी आपल्या वाहनांचे तोडणी वाहतुकीचे करार मुदतीत करावेत असे आवाहन चेअरमन वसंतराव धुरे यांनी केले.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष देसाई जिल्हा बँकेचे संचालक तथा बँक प्रतिनिधी सुधीर देसाई, कारखान्याचे संचालक विष्णू केसरकर, उदयसिंह पोवार, मुकुंदराव देसाई, मधुकर देसाई, मारूती घोरपडे, अनिल फडके, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे), श्री.शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरूकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, संभाजी दत्तात्रय पाटील, अशोक तर्डेकर, हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई आणि प्र. कार्यकारी संचालक व्ही. के.ज्योती व अधिकारी उपस्थित होते.