Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रसंकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्ग वरील टोल आजरेवासियावर लादू नका.- चर्चा करूनच टोल...

संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्ग वरील टोल आजरेवासियावर लादू नका.- चर्चा करूनच टोल सुरु करा.. संभाजी पाटील.- शिवसेना उबाठा🛑बँका व फायनान्स मधील मराठी भाषेसाठी मनसे कोल्हापूरचा आक्रमक पवित्रा.

संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्ग वरील टोल आजरेवासियावर लादू नका.- चर्चा करूनच टोल सुरु करा.. संभाजी पाटील.- शिवसेना उबाठा
🛑बँका व फायनान्स मधील मराठी भाषेसाठी मनसे कोल्हापूरचा आक्रमक पवित्रा.

आजरा :- प्रतिनिधी

संकेश्वर -बांदा महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या महामार्गावर टोल वसुलीचे काम सुरु होण्याचे संकेत दिसत आहेत. टोलनाका टोलसाठी सज्ज झाला आहे. या टोल विरोधात सर्व पक्षीय नेत्यांनी हुंकार भरला होता परंतु पावसाळा, गणपती आणि त्यानंतर आचारसंहिता यामुळे टोलचे आंदोलन थांबले आणि विरोध काहीअंशी कमकुवत झाला. परंतु काल टोल सुरु होणार असे समजताच उबाठा शिवसैनिक टोलनाक्यावर धडकले. परंतु टोल सुरु झाले नसल्याने परत फिरले. महामार्गाचे निकष पूर्ण न करताही सरकार आजरेवासियावर टोलची टांगती तलवार ठेवली आहे. वेळोवेळी आंदोलने, निवेदने आणि मोर्चे काढुन टोलच्या भुताला रोखण्याचा प्रयत्न सुरु होता. परंतु आता टोलनाक्याचे काम पूर्ण झाले असून टोल वसुली करत आहेत असे समजताच उबाठा चे शिवसैनिक टोल नाक्यावर जाऊन धडकले.


यावेळी उबाठाचे उप जिल्हा प्रमुख संभाजी पाटील म्हणाले, आजरा तालुक्याच्या जनतेची फसवणूक करून जर टोल सुरु करीत असतील तर शिव सैनिक कधीही चालू देणार नाही. कोल्हापूर जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि टोल सुरु करावा.
आजरा तालुका प्रमुख युवराज पोवार म्हणाले, आजरा तालुका वासियावर टोल बसू नये म्हणून गेली दोन वर्षे लढा सुरु आहे जर टोल सुरु केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सैनिक गुन्हे अंगावर घेऊन टोल उखडून टाकू असा इशारा दिला शिवसैनिक टोलनाक्यावर धडकल्याचे समजताच स. पो.नि.नागेश यमगर आपल्या फौज फाट्यासह पोहचले परंतु शिवसैनिकांनी टोल सुरु झाला आहे. की नाही याची खात्री करण्यासाठी आलो आहोत असे स्पष्ट केल्यानंतर पोलीस माघार फिरले. यावेळी शिवसैनिकांनी टोलला पूर्णपणे विरोध केला. यावेळी गडहिंग्लज तालुका प्रमुख दिलीपराव माने, हरिश्चंद्र व्हराकटे,शिवाजी आढाव, ओमकार माद्याळकर, बिलाल लतीफ, समीर चांद, सुरेश औरगोळे, महादेव गुरव, रवींद्र सावंत सह पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

🛑बँका व फायनान्स मधील मराठी भाषेसाठी मनसे कोल्हापूरचा आक्रमक पवित्रा

कोल्हापूर.- प्रतिनिधी.

रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार महाराष्ट्रातील सर्व बँका व फायनान्स कंपन्या मधील सर्व प्रकारचे व्यवहार व फलक मराठीतून असणे गरजेचे आहे. मात्र सर्व बँका व फायनान्स कंपन्या आरबीआयचे नियम धाब्यावरती बसवून जाणीवपूर्वक मराठी भाषेला डावलून इंग्रजींला प्राधान्य देत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर तर्फे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी यलगार आंदोलनाचा प्रारंभ करण्यात आला. आयडीबीआय बँकेच्या दारामध्ये प्रचंड घोषणाबाजी करत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह बँकेमध्ये घुसून मॅनेजरला मनसे स्टाईलने समज देण्यात आली. मनसे पदाधिकाऱ्यांच्या भीतीने आयडीबीआय असेंबली रोड शाखा मॅनेजरने मागच्या दाराने धूम ठोकली . मात्र यावेळी उपस्थित असणाऱ्या असिस्टंट मॅनेजरला मनसे पदाधिकरण चांगलेच धारेवर धरून बँकेतील व्यवहाराच्या सर्व स्लिपा व फलक हे इंग्रजीत असल्याचे निदर्शनास आणून देऊन बँकेतील सर्व कागदपत्रे व स्लीपा फाडून टाकलीत. सात दिवसांमध्ये सर्व व्यवहार मर्यादित करण्याचे लेखी अभिवचन आयडीबीआयच्या असिस्टंट मॅनेजर नी यावेळी दिले तदनंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत पुन्हा ७ दिवसांनी येण्याचा इशारा दिला.
बचत खाते, चालू खाते यांच्यासाठी भरण्यात येणारी फॉर्म देखील मराठीत हवेत , कर्ज प्रकरणासाठी करण्यात येणारे सर्व करार देखील मराठीतूनच असणे सक्तीचे आहे .मात्र मराठी अशिक्षित लोकांना इंग्रजी भाषा न समजता आपण इंग्रजी भाषेतून जाचक अटी व नियमांवरती खातेदाराच्या सह्या घेऊन बँकेमार्फत खातेदारांची फसवणूक होत असल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी केला. राज साहेबांच्या आदेशाने करण्यात आलेल्या आजच्या आंदोलनाची दखल घेऊन सर्व बँका व फायनान्स कंपनीने येत्या ७ दिवसात दैनंदिन व्यवहारांसाठी वापरण्यात येणारी सर्व चलने, करार, फलक , ग्राहकांशी संवादाची बोलीभाषा ही मराठीतच असावी, असा आग्रह धरून येणाऱ्या ७ दिवसात जर का उपरोक्त मागण्या मान्य नाही केल्या तर बँकेमध्ये घुसून मनसे स्टाईलने खळफट्याक आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी दिला. या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हा सचिव निलेश आजगावकर , जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुम्मा , तालुका अध्यक्ष अभिजीत पाटील , विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष मा.अभिजीत राऊत , अजिंक्य शिंद , यतिन होरणे , राजन हुल्लोळी , सुरज कानूगडे , अरविंद कांबळे , सुनील तुपे , उत्तम वंदुरे , मोहसीन मुल्लाणी , चंद्रकांत सुगते , रणजित वरेकर , संजय चौगुले , विकी पहुजा , गणेश तेरवाडे , राहुल खाडे , राहुल पाटील , नवनाथ निकम , अमित बंगे , प्रविण जाधव, गणेश लाखे , सागर साळोखे, ऋषिकेश सुतार , नितेश गणेशाचार्य, विजय करजगार इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.