ग्रामस्थ व मनसेच्या आंदोलन / पाठपुराव्याला यश – देवर्डे येथील वहीवाट रस्ता प्रकरण अखेर निकाली.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील देवर्डे येथील मनसे पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या तक्रारीवरून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रस्ता अतिक्रमण दूर करून, रस्ता पूर्ववत करणे संदर्भात निर्णय दिला असताना प्रशासन व ग्रामपंचायत देवर्डे हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून, रहिवाशी्यांना वेठीस धरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू पाहत होते. याबाबत आजरा मनसे पदाधिकारी वारंवार पाठपुरावा करून देखील तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी वारंवार, गटविकास अधिकारी यांना सूचना करून देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते.
या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजरा व ग्रामस्थ देवर्डे हे बेमुदत ठिय्या आंदोलन दि.३ रोजी मा. गटविकास अधिकारी यांचे दालनात करणेत येणार होतं. परंतु सदर मागणी योग्य असल्यने शेवटी प्रशासनाने अतिक्रमण काढले मनसे आजरा सदर गोष्टीच्या पाठवपूरवा गेली २ वर्ष करीत होती. सततच्या प्रयत्नांना आज यश आले आहे. रस्ता प्रक्षणाचा पहिला टप्पा आज दि.१ एप्रिल रोजी अतिक्रमण दूर करून करण्यात आला. यावेळी प्रशासन व पाटील कुटुंबं यांच्यात शाब्दिक चकमक झाली. उर्वरित रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करणेत येईल कोणतीही ठोस कागदपत्र सदर न झालेने कारवाई करणेत आली. आजरा मनसे व ग्रामस्थ देवर्डे यांचा पाठपुरावा केला होता. ग्रामस्थांकडून आजरा मनसे चे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. प्रशासनाने योग्य निर्णय घेतल्याने ग्रामस्थ प्रशासनाचे आभार मानत आहेत. प्रामुख्याने आजरा पोलिस प्रशासनाची मदत झाली. अशी ग्रामस्थांनी माहिती दिली.