Homeकोंकण - ठाणेगोवा पोलिसांनी पत्रादेवी येथे ड्रग्जवर मोठी कारवाई करीत २५ लाखांचा मुद्देमाल केला...

गोवा पोलिसांनी पत्रादेवी येथे ड्रग्जवर मोठी कारवाई करीत २५ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.🟥मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याकडे लक्ष घालावे अशीही मागणी सिंधुदुर्गातून होत आहे.

🛑गोवा पोलिसांनी पत्रादेवी येथे ड्रग्जवर मोठी कारवाई करीत २५ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.
🟥मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याकडे लक्ष घालावे अशीही मागणी सिंधुदुर्गातून होत आहे.

सिंधुदुर्ग :- प्रतिनिधी.

ड्रग्जची वाहतूक केल्याप्रकरणी पत्रादेवी येथे कुडाळ येथील युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. परवेज अली खान ( वय ३०) असे त्याचे नाव आहे.त्याच्याकडून २०८ ग्रॅमची एक्स्टस पावडर व ४३ उच्च दर्जाच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गोवा पोलिसांचे कौतुक होत आहे. दरम्यान काही दिवसां पुर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सिंधुदुर्ग जिल्हा ड्रग्ज मुक्त व अवैध धंदे बंद करण्याचा विडा उचलला होता. तर तसे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. तरीपण सिंधुदुर्गात अवैध डंपर वाळू वाहतूक,मटका जुगार, ड्रग्ज तसेच विदेशी अवैध दारू बंद करण्याचा आदेश दिला होता. परंतू पालकमंत्र्यांचा या आदेशाला संबंधित अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवत अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच हे अवैध धंदे जोमात सुरू आहेत. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांचा पोलीस अधीक्षकांसह पोलिसांवर तसेच संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर वचक नसल्याचे यावरून दिसून येत आहे.
वेंगुर्ले, कुडाळ, सावंतवाडीसह सिंधुदुर्गात अवैध दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे.बांदा पोलीस चेक नाका तसेच आरोंदा पोलीस चेक नाक्यावरून पोलिसांच्या डोळ्यासमोर ही गोव्यातून वाहतूक सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणावर होत आहे.सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.मात्र ते ओस पडल्याचे दिसून येत आहे.

वेंगुर्ले शहरात बिनधास्त दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे.वेंगुर्ले शहरातील कलानगर, भटवाडी,सातेरी मंदिर नजीक, दाभोली प्राथमिक शाळेजवळ तसेच तुळस होडावडा, आरवली शिरोडा आदी तालुक्यात दारूची विक्री जोमात सुरू असताना वेंगुर्ले पोलिसांना विचारले तर पोलीस म्हणतात तुम्ही दाखवून दया? आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलो एकही दारूचा अड्डा नसल्याचे सांगतात.तर वेंगुर्ले पोलीस ठाण्यातही धडाकेबाज पोलीस निरीक्षकांची गरज असल्याचे वेंगुर्ले शहरातून मागणी होत आहे.याकडेही पालकमंत्री नितेश राणेंनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

दरम्यान पत्रादेवी येथे पोलिसांनी ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आली. त्याच्याकडून तब्बल २५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याबाबतची माहिती पोलीस उपअधीक्षक नेर्लोस अल्बुकक यांनी दिली.याबाबत अधिक माहिती अशी की, अंमली पदार्थ विरोधी पोलिसांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पत्रादेवी येथे वाहनांची तपासणी करत असताना परवेज खान याच्याकडे २०८ ग्रॅमची एक्स्टस पावडर व ४३ उच्च दर्जाच्या गोळ्या असा एकूण २५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान संशयित परवेज खान हा आंतरराज्य ड्रग्ज टोळीमध्ये गुंतलेला असून तो गोवा व मुंबईतील ड्रग्ज पदार्थांना ड्रग्ज पुरवठा करत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. सध्या सुट्टी असल्याने गोव्यात मोठ्या प्रमाणात देशी पर्यटक गोव्यात आले आहेत.त्यामुळे तो हा ड्रग्ज गोव्यातील विविध भागातील ड्रग्ज विक्रेत्यांना पुरवठा करण्यात येणार होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.