मेडिकल असोसिएशन ऑफ आजरा चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..
आजरा .- प्रतिनिधी.
मेडिकल असोसिएशन ऑफ आजरा आणि इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा आजरा या आजरा तालुक्यातील नोंदणीकृत डॉक्टरांच्या संघटनेचे वार्षिक स्नेहसंमेलन “ EUPHORIA 2025 ” उत्साहात पार पडले .
ह्या स्नेहमेळाव्या मध्ये आजरा तालुक्यातील डॉक्टर्स आणि लहान मुला मुलींनी गाणी, नृत्य आणि विविध कलाविष्कार सादर केले .
गडहिंग्लज मधील नामांकित “देसाई हॉस्पिटल” चे डॉ चंद्रशेखर देसाई , डॉ रोहित देसाई , डॉ दिशा राणे – देसाई आणि डॉ सुष्मा देसाई ह्या स्नेहसंमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ दिपक सातोस्कर , डॉ अंजनी देशपांडे , डॉ प्रवीण निंबाळकर आणि डॉ दिपक हरमळकर यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले .
डॉ रोहित देसाई यांनी “उच्च रक्तदाब” आणि डॉ दिशा देसाई यांनी “विविध नेत्रविकार आणि त्यावरील उपाय “ ह्या विषयांवर सर्व डॉक्टर्स ना मोलाचे मार्गदर्शन केले.
वार्षिक स्नेहसंमेलन आणि कौटुंबिक स्नेहमेळावा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रामुख्याने डॉ अनिल देशपांडे , डॉ गौरी भोसले , डॉ अंजनी देशपांडे , डॉ सुरजीत पांडव , डॉ रोहन जाधव आणि मेडिकल असोसिएशन मधील सर्वच सदस्यांनी आपले योगदान दिले .मेडिकल असोसिएशन ऑफ आजरा ही संघटना नेहमीच अशा सामाजिक कार्यक्रमा सोबतच मोफत आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण आणि सांस्कृतिक घेत असते , त्यापैकीच हा एक वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला .
डॉ भरत मोहिते आणि डॉ गौरी भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. मेडिकल असोसिएशन ऑफ आजरा चे अध्यक्ष डॉ प्रवीण निंबाळकर यांनी आभार मानले .
