Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रशाश्वत विकासा बरोबर ग्राहक जन जागृती आवश्यक - सी आर देसाई आजऱ्यात...

शाश्वत विकासा बरोबर ग्राहक जन जागृती आवश्यक – सी आर देसाई आजऱ्यात ग्राहक दिनानिमित्त बैठक.

शाश्वत विकासा बरोबर ग्राहक जन जागृती आवश्यक __ सी आर देसाई.

आजरा.- प्रतिनिधी.

तयार झालेले उत्पादन मध्यस्था शिवाय ग्राहकांना मिळालेस, योग्य भाव मिळतो. देव घेवीतून व्यवहार एकमेकांना पुरक असावेत. रासायनीक शेती माला पेक्षा शाश्वत विकासा बरोबर ग्राहकांना जन जागृती आवश्यक असलेचे मत व्यक्त सी आर देसाई यांनी आजरा तहसील कार्यालयात झालेल्या जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले. अध्यक्ष स्थानी नायब तहसीलदार माळसाकांत देसाई होते.

प्रास्ताविक पुरवठा अधिकारी संदीप चव्हाण यांनी करून मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी सी आर देसाई यांनी शाश्वत जीवन शैली जगत असताना निर्माण झालेली परिस्थितीचा आढावा घेत पर्यावरणाचा होणारा -हास थांबवून वन संरक्षण करणे आवश्यक आहे. शेती मध्ये झालेले अमुलाग्र बदल हे अपायकारक होत असून सिमेंटचा रस्ता आणि वृक्षतोड यांचा तापमान वाढीवर परिणाम झाला आहे. ग्राहक म्हणून सर्वानी सजग राहणेची व ग्राहक चळवळ अधिक व्यापक करणेची आवश्यकता असेलचे मत व्यक्त केले

यावेळी अध्यक्ष माळसाकांत देसाई यांनी ग्राहकांनी आपला अधिकार वापरून टाळाटाळ व अडवणूक करणारे यांचे विरोधात तक्रार द्यावी. तरचं संबंधितांवर कार्यवाही करता येते. आजच्या ग्राहक दिवसांसाठी संबंधित विभागाना पत्र काढूही गैर हजार असणारे विभागाना नोटीसा पाठवणार आहे तसेच आम्ही शेतकरी व विद्यार्थ्यांना दाखले तात्काळ देण्याचा प्रयत्न करत असतो, काही अडचण असली तरी हक्कासाठी प्रत्यक्ष भेटण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवाजी गुरव यांनी सर्व विभागाचा आढावा घेत असणार्या अडचणीचा पाडाच वाचला तर सुनिल डोंगरे यांनी ग्राहकांची तक्रार निवारणासाठी सबंधीत अधिकारी हजर राहत नसतील तर ग्राहक दिनाला काय अर्थ? उपस्थित नसलेल्या विभागाचा निषेध व्यक्त केला. यावेळी ग्राहक महिला आघाडीच्या नीलम सरदेसाई, सुमन कांबळे ,ग्राहक समिती अध्यक्ष बंडोपंत चव्हाण , रामदास चव्हाण ,महादेव सुतार , बहुजन मुक्ती पार्टीचे किरण के के ,डाॅ. धनाजी राणे , डाॅ. सुदाम हारेर, व्ही.डी.जाधव, डि.के.कांबळे यांनी वेगवेगळ्या प्रश्नांची मांडणी केली.
यावेळी नायब तहसीलदार विकास कोलते ,सी. डी .देसाई , संभाजी इंजल ,काॅ.संजय घाटगे, शिवाजी इंगळे ,संजय येसादे, यशवंत दोरूगडे, गिता पोतदार, धनश्री देसाई याच्या सह महिला बचत गटाच्या सदस्या, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, ग्राहक कल्याण फाऊंडेशन व अखिल भारतीय ग्राहक पंचायत या सर्व संघटनाचे पदाधिकारी व तक्रारदार ग्राहक उपस्थित होते. यावेळी उत्तुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर रविकांत शर्मा हे गोरगरीब जनतेची चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा करतात त्याबद्दल त्यांचा अभिनंदनचा ठराव ग्राहक पंचायत महाराष्ट्र मार्फत करण्यात आला. शेवटी आभार संतोष पाटील यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.