🛑कानोलीत युवकांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून साकारले मैदान.
🛑 हारूर येथे विकासकामांचा शुभारंभ…
🛑 नागरिकांनी! लेकरांच्या पोषणासाठी पुनर्वसन केंद्रात दाखल करावे..
( डॉ.अमोल पाटील यांची राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे आयोजन.)
आजरा.- प्रतिनिधी.

कानोली (ता. आजरा ) येथील सरंबळवाडी जवळील गायरान हद्दीत पडीक जमिनीवर युवकांच्या पुढाकाकाने मैदान तयार करण्याचे नियोजन झाले आणि बघता -बघता युवक आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने गेले तीन दिवस मैदान सपाटीकरण काम जोरात सुरु आहे. युवक आणि लोकांनी ठरविले तर अश्यक असे कामही लोकवर्गणीतुन होऊ शकते याचे उदाहरण म्हणून याकडे पहावे लागेल, कामाला मुहूर्त मिळाला तो लक्ष्मी -देवी यात्रेच्या निमित्ताने. कांही हौशी युवक यांनी यात्रा काळात क्रिकेट स्पर्धा भरविण्याचे नियोजन केले, नियोजन झाले. मात्र स्पर्धा भरविण्यासाठी मैदान कुठे. असा प्रश्न उभा राहिला. मग हौसेला मोल नाही. ग्रा. प. हद्दीत रिकामे गायरान सरंबळवाडी फाट्यावर मैदान करण्याचे ठरले. मग आणि प्रश्न उभा राहिला मैदान करण्यासाठी पैशाचा. मग चर्चा सुरु झाली. आणि KPL यात्रेनिमित्त हा सोशल मीडिया ग्रुप तयार झाला, यामध्ये क्रिकेट शौकीन किरण देसाई यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतुन मैदान तयार करण्याची संकल्पना मांडली त्याला युवक आणि ग्रामस्थ यांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळाला आणि आणि बघता बघता ₹20000/- जमा झाले. मात्र एवढ्या रक्कमेत मैदान तयार होणे शक्य न्हवते मग अहवान करण्यात आले आणि निधी जमा होण्यास सुरवात झाली. किमान 50000 ₹ अपेक्षित खर्च निधी आहे. अजूनही निधीची आवश्यकता आहे.. मात्र थांबून चालणार नाही म्हणत मैदानाचे काम सुरु झाले. शनिवार दि. 15 रोजी गावच्या सरपंच सौ. सुषमा पाटील आणि प्रमुख यांच्या उपस्थितीत मैदान कामाचा शुभारंभ झाला.
यावेळी. ग्रा. प. सदस्य सुधीरकुमार पाटील, सेवा संस्थेचे चेअरमन दिलीप पाटील, संभाजी आपगे, राजू पाटील, सुभाष पाटील किरण देसाई, विनायक सावरतकर,अभिजित देसाई प्रविण पाटील, गुरूदास पाटील, दिग्विजय भोसले,प्रणव पाटील, वैभव पाटील, विरेंद्र पाटील प्रथमेश देसाई. महेश गंधवाले, आदित्य देसाई, प्रथमेश पाटील, ज्योतीरादित्य पाटील, प्रतीक पाटील, गिरीश भोगण, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सरंबळवाडीचे मा. उपसरपंच बाजीराव देवरकर यांनी तर ₹10000/- ची देणगी देऊन युवकांना प्रोत्साहित केले. मुबई-पुणे व स्थानिक वाहनधारक यांनी मदत करून सहकार्य केले. युवकांनी केलेले कार्य नक्कीच समाजाला दिशा देणारे आहे.

🛑 हारूर येथे विकासकामांचा शुभारंभ…
आजरा.- प्रतिनिधी.

ग्रुप – ग्रामपंचायत कानोली -हारूर ता. आजरा येथे १५ लाख रुपयाच्या निधीचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमच्या अध्यस्थानी सरपंच सौ. सुषमा पाटील होत्या, २५/१५ योजनेतील विकास कामाचा शुभारंभ भाजप ओ बी. सी. सेलचे तालुका प्रमुख जयवंत सुतार आणि अनिकेत चराटी यांच्या हस्ते झाले, तर दलित वस्ती कामाचा शुभारंभ सरपंच सौ. सुषमा पाटील यांच्या हस्ते झाला, यावेळी बोलताना जयवंत सुतार म्हणाले, आमदार शिवाजीराव पाटील यांनी तालुक्यासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता आम्ही त्यांच्या माध्यमातून करीत आहोत, यापुढेही आम. शिवाजीराव पाटील आणि अशोकआण्णा चराटी यांचे सहकाऱ्यातून निधी देण्याचे आश्वासन दिले, स्वागत व प्रास्ताविक सुभाष पाटील यांनी केले. यावेळी उपसरपंच स्वप्निल आर्दाळकर यांनी मनोगत व्यक्त केले, यावेळी ग्रा. प
सदस्य सुधीरकुमार पाटील, चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, दिपाली सुतार, माया लोहार, यांच्यासह, गजरगाव सरपंच आनंदा कांबळे, सुरेश रेडेकर, विलास सुतार, मिलिंद पालकर, गणपती कळसकर, मारुती कदम, एम. टी. पाटील, प्रकाश पाटील, बाळासो चव्हाण सयाजी सावंत संतोष सावंत, साहिल पाथरवट, दिलीप पाटील, दिनकर पाटील, राजू पाटील, गोपाळ भोगण, रावसाहेब पाटील सी. ए. पाटील उपस्थित होते. आभार सुरेश रेडेकर यांनी मानले..

🛑नागरिकांना! लेकरांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करा..
( डॉ.अमोल पाटील यांची राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे आयोजन.)
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुका कुपोषण मुक्त करून सुदृढ व निरोगी पिढी निर्माण करण्यासाठी तालुक्यातील तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित श्रेणीतील बालकांना त्यांच्या पालकांनी उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथील पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये तात्काळ दाखल करावे त्यामुळे ही बालके सर्वसाधारण श्रेणीमध्ये येतील व त्यांचा शारीरिक व मानसिक विकास होण्यास मदत होईल असे समुपदेशन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी मौजे किटवडे येथील पालकांच्या भेटीदरम्यान केले.
सुदृढ भारत व श्रेष्ठ भारत संकल्पनेतील सुदृढ नागरिक निर्माण होण्यासाठी कुपोषण मुक्त समाज निर्माण करणे गरजेचे आहे. तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित बालकांना उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येतील पोषण पुनर्वसन केंद्रात १४ दिवस दाखल करून घेतले जाते त्यांच्या सर्व रक्त चाचण्या व इतर तपासण्या मोफत केल्या जातात त्यांना आहारतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली दररोज सहा वेळा पौष्टिक आहार दिला जातो तसेच त्यांचे वर औषध उपचारही केले जातात पालकांना बालकासोबत राहण्याची व जेवणाची उत्तम सोय केंद्रात केलेली आहे त्याबरोबर बुडीत मजुरी पोटी शासन दैनंदिन तीनशे रुपये इतका भत्ता शासनामार्फत पालकांना दिला जातो या सर्व सुविधा असूनही अज्ञानापोटी सदर पोषण पुनर्वसन केंद्रात कमी प्रमाणात बालके दाखल होतात
किटवडे सारख्या अतिदुर्गम भागातील कुपोषित बालकांच्या पालकांना त्यांच्या घरी जाऊन ग्रामीण रुग्णालय आजरा येथील पथकाने भेट दिली पालक व ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करणे विषयी योग्य समुपदेशन केले त्यानंतर सदर पालक या बालकांना पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यास तयार झाले या पालकांप्रमाणेच आजरा तालुक्यातील तीव्र व मध्यम कुपोषित बालकांच्या पालकांनी आपापल्या पाल्यांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करावे व बालकांचे शारीरिक मानसिक सामाजिक भवीतव्य उज्वल करावे असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी यावेळी केले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकातील डॉ. सुरजित पांडव,
डॉ. स्वाती रेडेकर, श्रीमती सारिका शिंदे, श्रीमती सुषमा साठे, विजय एरंडोलकर, अंगणवाडीसेविका,
सरपंच लहू वाकर व ग्रामस्थ किटवडे लिंगवाडी यावेळी उपस्थित होते.
