Homeकोंकण - ठाणेबदलापुरात नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू.- धुळवडीचा रंग काढायला गेले अन् पाण्यात...

बदलापुरात नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू.- धुळवडीचा रंग काढायला गेले अन् पाण्यात बुडाले.🛑मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना मोठा धक्का! – १३०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी FIR दाखल🟥फेसबुकवर ओळख ते हनी ट्रॅप! ISI साठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक.🟥होळीचा सण साजरा केला अन् घरी जाताना कार दरीत कोसळली.

🔴बदलापुरात नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू.- धुळवडीचा रंग काढायला गेले अन् पाण्यात बुडाले.
🛑मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना मोठा धक्का! – १३०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी FIR दाखल
🟥फेसबुकवर ओळख ते हनी ट्रॅप! ISI साठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक.
🟥होळीचा सण साजरा केला अन् घरी जाताना कार दरीत कोसळली.

बदलापूर :- प्रतिनिधी.

राज्यात धुळवडीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक धुळवड साजरी करत आहेत. बदलापुरातही धुळवड सणाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मात्र धुळवडीदरम्यान गालबोट लागणारी घटना घडली आहे. बदलापुरात धुळवडीदरम्यान दुर्देवी घटना घडली आहे. बदलापुरातील उल्हास नदीत बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
बदलापुरात धुळवड खेळल्यानंतर रंग काढायला गेलेल्या मुलांसोबत धक्कादायक घटना घडली आहे. बदलापुरात धुळवडीदरम्यान उल्हास नदीत बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धुळवड खेळल्यानंतर रंग काढायला गेलेल्या चौघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू झाला आहे. बदलापूरच्या चामटोली परिसरात राहणारे चौघे मुले होते. चारही मुले चामटोली जवळील पोद्दार गृह संकुलात राहणारे होते. चौघांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
बदलापूरच्या चामटोली भागात राहणाऱ्या चौघांनी धुळवड खेळली. धुळवड खेळल्यानंतर रंग काढण्यासाठी उल्हास नदीजवळ पोहोचले. उल्हास नदीत चौघे अल्पवयीन मुले उतरले. या चौघांना पाण्याचा अंदाज आला. त्यामुळे चौघे अल्पवयीन मुले पाण्यात बुडाले. चामटोली राहणाऱ्या चौघांचा बुडून मृत्यू झाला. चौघांच्या मृत्यूने चामटोली परिसरात खळबळ उडाली आहे. चौघे पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि स्थानिकांनी तातडीने चौघांचे मृतदेह बाहेर काढले. चौघांच्या मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली आहे. चौघांच्या मृत्यूने धुळवड सणाला गालबोट लागलं आहे.

🛑मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना मोठा धक्का! – १३०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी FIR दाखल करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी

नवी दिल्ली :- वृत्तसंस्था

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाला मोठा झटका बसल्याचे पाहायला मिळाले. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपला पराभूत करत ऐतिहासिक विजय नोंदवला. यानंतर आम आदमी पक्षाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. कारण १३०० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्या प्रकरणी गृह मंत्रालयाने आपचे नेते मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यास मान्यता दिली आहे. दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये वर्गखोल्या बांधताना हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. इंडियन एक्सप्रेसने सूत्रांच्या हवाल्याने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.२०२२ मध्ये दिल्ली सरकारच्या दक्षता आयोगाने कथित घोटाळ्याची चौकशी करण्याची शिफारस केली होती आणि मुख्य सचिवांना अहवाल सादर केला होता.

🔴राष्ट्रपतींचीही मंजुरी.

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात मंत्रि‍पदावर असताना मनीष सिसोदीया आणि सत्येंद्र जैन यांनी केलेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यासाठी राष्ट्रपतींनी देखील मान्यता दिली आहे, सूत्रांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.
केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) त्यांच्या १७ फेब्रुवारी २०२० च्या रिपोर्टमध्ये, सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्ली सरकारी शाळांमध्ये २४०० हून अधिक वर्गखोल्यांच्या बांधकामात स्पष्टपणे अनियमितता आढळून आल्याचे नमूद केले आहे.
मनीष सिसोदीया हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. आबकारी धोरण प्रकरणात ते तुरूंगात देखील गेले होते . तर सत्येंद्र जैन यांची मनी लाँड्रिग प्रकरणात चौकशी केली जात आहे. आता गृह मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर या दोन आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. हे दोनही नेते सध्या जामीनावर तुरूंगाबाहेर आहेत.
दिल्लीतील माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांना सीबीआयने मद्य घोटाळ्याच्या आरोपांनंतर अटक केले होते. त्यांच्यावर आरोप आहे की मद्य धोरण २०२१-२२ लागू करताना भ्रष्टाचार करण्यात आला. सीबीआय आणि ईडीचा आरोप आहे की सिसोदीया यांनी मद्य धोरण काही खाजगी कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी आखण्यात आले होते. तसेच या प्रकरणात १०० कोटींची लाच घेतल्याचा आरोप असून ही रक्कम गोवा निवडणुकी दरम्यान आम आदमी पक्षाच्या प्रचारासाठी वापरण्यात आली.तर सत्येंद्र जैन हे माजी आरोग्य मंत्री आहेत. त्यांना ईडीने ३० मे २०२२ साली मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात अटक केली होती. ईडीचा आरोप आङे की जैन यांनी २०१५-२०१६ साली बनावट कंपन्यांच्या मध्यमातून १६.३९ कोटी रुपयांची मनी लाँड्रिंग केली होती.

🟥फेसबुकवर ओळख ते हनी ट्रॅप! ISI साठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक;- ‘या’ प्रोजेक्टची गोपनीय माहिती पुरवली पाकिस्तानला!

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद येथील आयुध निर्माण कारखान्यात काम करणाऱ्या एका व्यक्तीला हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (यूपी एटीएस) आग्रा येथून रविंद्र कुमार आणि त्याच्या सहकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर पाकिस्तानस्थित हँडलर्सना लष्करासंबंधी गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र कुमार हा फिरोजाबादमधील हजरतपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत काम करत होता आणि त्याच्याकडे काही संवेदनशिल कागदपत्र त्याच्याकडे होते. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार अत्यंत गोपनीय अशी काही माहिती ज्यामध्ये डेली प्रॉडक्शन रिपोर्ट, स्क्रिनिंग कमीटीची काही गोपनीय पत्रे, प्रलंबित मागण्यांची यादी आणि ड्रोन आणि गगनयान प्रोजेक्टबद्दलची माहिती आयएसआय (ISI)शी संबंधित महिलेला पुरवली.

Oplus_131072

फेसबुकवरून साधला संपर्क

गेल्या वर्षी नेहा शर्मा असल्याचे भासवून एका महिलेने रविंद्र याच्याशी संपर्क साधला होता. आपण पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी काम करत असल्याचे सांगून देखील ती रविंद्र याला हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढण्यात यशस्वी झाली. तपासात उघड झाले की, दोघांमधील संभाषण लपवून ठेवण्यासाठी रविंद्र याने त्याच्या फोनमध्ये तिचा नंबर चंदन स्टोअर कीपर २ म्हणून सेव्ह केला होता. तसेच त्याने आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात त्या महिलेला गोपनीय कागदपत्रे व्हॉट्सॲपद्वारे पाठवल्याचा आरोप आहे.तपासादरम्यान यूपी एटीएसला रविंद्र याच्या फोनमध्ये गोपनीय माहिती आढळून आली. ज्यामध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी आणि गोरखा रायफल रेजिमेंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेल्या लॉजिस्टिक ड्रोन चाचण्यांबद्दलची गोपनीय माहितीचा समावेश होता.रविंद्र हा पाकिस्तानातील आयएसआय हँडलर्सच्या थेट संपर्कात होता आणि भारतातील सुरक्षा प्रोजेक्ट्सबद्दलची माहिती तो त्यांना पुरवत होता.
रविंद्र याला अटक केल्यानंतर एटीएसने त्याच्या आग्रा येथील सहकाऱ्यालाही अटक केली आहे. तसेच तपास यंत्रणांनी डिजीटल पुरवे जप्त केले आहेत. ज्यामध्ये व्हॉट्सअॅप चॅट आणि गोपिनय कागदपत्रांचा समावेश आहे, तपासाचा भाग म्हणून ज्याचे सध्या विश्लेषण केले जात आहे.

🟥होळीचा सण साजरा केला अन् घरी जाताना कार दरीत कोसळली.
( बहीण-भावाची आयुष्यभरासाठी ताटातूट.- भावाचा मृत्यू तर बहिण गंभीर जखमी.)

नागपूर :- प्रतिनिधी.

नागपूर जिल्ह्यातील बूटीबोरी येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात बूटीबोरी – तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील टी-पॉईंटजवळील उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री घडला. वर्ध्याहून नागपूरला परत येताना कार चालकाने चुकीच्या दिशेने गाडी वळवल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. कारमध्ये एकूण पाच तरुण प्रवास करत होते. त्यापैकी अरिंजय अभिजित श्रावणे (१८) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची बहीण अक्षता अभिजित श्रावणे गंभीर जखमी झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या सदर परिसरातील गांधी चौकात राहणारे सक्षम बाफना, हिमांशू बाफना आणि मानस बदानी (वय २०) हे तिघे वर्ध्यात होळी निमित्त गेटटुगेदरसाठी गेले होते. परतीच्या प्रवासात त्यांनी अरिंजय आणि अक्षता यांना वर्ध्यातून सोबत घेतले. नागपूरकडे येताना चालकाने चुकून चंद्रपूरच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलावर गाडी वळवली. चुकीच्या मार्गावर गेल्याचे लक्षात येताच तो गोंधळला आणि भरधाव वेगातील कार उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून २० फूट खाली कोसळली. या अपघातात अरिंजयचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची बहीण अक्षता गंभीर जखमी झाली.

इतर तिघांनाही दुखापती झाल्या असून सर्वांना तातडीने नागपूरच्या किंग्जवे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बूटीबोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रतापराव भोसले घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सांगितले की, कार अत्यंत वेगात होती, त्यामुळे अपघात टाळता आला नाही. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून चालकाविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. होळीचा, रंगपंचमीचा आनंदाचा दिवस साजरा करण्यासाठी निघालेल्या मित्रमंडळींवर काळाने घाला घातला. यात एकाच्या झालेल्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.