सुरेश भैय्या जोशींच्या वक्तव्याचा शिवसेना उभाठा गट आजरा वतीने निषेध.. आजऱ्यात शिवसेनेची निदर्शने. – भैय्या जोशी कोण रे…. परिसरात आवाज दुमदुमला.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील शिवसेना उभाठा गटाच्या वतीने आर एस एस चे सुरेश भैय्या जोशीं यांनी घाटकोपर येथे गुजराती चालते मुंबईत मराठी येणे गरजेचे नाही. या केलेल्या वक्तव्याचा आजरा येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात दि. ७ रोजी निषेध करत निदर्शने केली. आर एस एस चा सुरेश भैया कोण रे पायताण मारा दोन रे.. अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख युवराज पोवार म्हणाले मुंबई ही मराठी माणसाच्या कष्टातून त्यागातून तयार झाली आहे. मुंबई कुणाच्या बापाची नाही जोशी हा भाजपने सोडलेला आहे. अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या या जोशीचा आम्ही आजरा तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करत आहोत. भाजपच्या नेत्यांनी असे वक्तव्य करण्याचे थांबवावे मुंबई ही गिरणी कामगार सह आणि एक जणांच्या त्यागातून उभी राहिली आहे. पुन्हा असे वक्तव्य केले तर शिवसेना त्या पद्धतीने उत्तर देईल. असे वक्तव्य करणाऱ्या जोशीला कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीप माने यांनी आपल्या मनोगत तीव्र शब्दात निषेध केला.

त्यावेळी शहर प्रमुख ओमकार माद्याळकर, तालुकाप्रमुख संजय येसादे, युवा सेनेचे महेश पाटील, शिवाजी आढाव, दयानंद भोपळे, दिनेश कांबळे, सह शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
