🟥त्या मुलीला मी ७५०० रुपये दिलेत.- दत्ता गाडेचा पोलिसांकडे दावा.
( बँक खाते तपासताच धक्कादायक बाब समोर!.)
🛑तालुक्याच्या ग्रामिण भागात लोकवस्तीत बिबट्याचा वावर वाढला. – सर्वसामान्यान्मध्ये घबराट.
पुणे – प्रतिनिधी.
स्वारगेट एसटी डेपोतील शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे सत्र न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान रोज नवनवीन माहिती समोर येत असून, आरोपीच्या बँक खात्यातील व्यवहारांबाबत महत्त्वाचा खुलासा झाला आहे.
🟥बँक खात्यात फक्त २४९ रुपये
या प्रकरणात आरोपीच्या वकिलाने गाडे आणि पीडितेच्या दरम्यान आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर पोलिसांनी बँक खात्यांची चौकशी केली असता, गुन्हा घडल्याच्या वेळी आरोपीच्या खात्यात फक्त २४९ रुपये असल्याचे आढळले. त्यामुळे वकिलाने दावा केलेले ७,५०० रुपये नेमके कुठून आले, याचा तपास पोलीस करत आहेत.
आरोपीच्या पत्नीचा सवाल
दरम्यान, आरोपीच्या पत्नीनेही आपल्या पतीची बाजू मांडत, “बलात्कार झाला असेल, तर पीडितेचे कपडे फाटले का नाहीत? तिच्या शरीरावर कुठे ओरखडे का नाहीत? ती आधी बसमध्ये चढली आणि त्यानंतर दोन मिनिटांतच बाहेर आली, हे बलात्काराचे लक्षण आहे का?” असे प्रश्न उपस्थित केले.
🛑फोन डिटेल्समधून संबंध नाकारला
आरोपीच्या वकिलाने गाडे आणि पीडिता यांची मागील एका महिन्यापासून ओळख असल्याचा दावा केला होता. त्यामुळे पोलिसांनी या दाव्याची पडताळणी करण्यासाठी दोघांचे फोन रेकॉर्ड तपासले. दोन वर्षांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR) च्या तपासणीमध्ये पीडितेचा आणि आरोपीचा कोणताही संपर्क झालेला नाही, असे स्पष्ट झाले आहे.
🔴आरोपीचा दावा खोटा.
पोलिसांनी आरोपीच्या बँक खात्यातील व्यवहार, ऑनलाईन पेमेंट्स आणि मोबाईल ट्रान्झॅक्शन यांची सखोल चौकशी केली. गाडे याने पीडितेला पैसे दिल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे ७,५०० रुपये दिल्याचा आरोपीचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी पुणे पोलीस तपास अधिक गतीने पुढे नेत आहेत.
🛑तालुक्याच्या ग्रामिण भागात लोकवस्तीत बिबट्याचा वावर वाढला. – सर्वसामान्यान्मध्ये घबराट ( वडदहसोळ येथील ग्रामस्थ गिरीष म्हादये यांच्या घराच्या अंगणामध्ये गेले दोन दिवस बिबट्या.)
राजापूर :- प्रतिनिधी
मागील काही महिन्यांपासून तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहरामध्ये बिबट्याच्या लोकवस्तीतील बिनधास्त वावराने लोकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. अशातच आता वडदहसोळ भागामध्ये बिबट्याचा लोकवस्तीमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. वडदहसोळ येथील ग्रामस्थ गिरीष म्हादये यांच्या घराच्या अंगणामध्ये गेले दोन दिवस बिबट्या रात्रीच्यावेळी आल्याचे त्यांच्या घर परिसरामध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये दिसून आले आहे.
गेल्या काही वर्षापासून तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहरामध्ये बिबट्याचा राजरोस वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन वर्षापूर्वी तर, शहरासह ग्रामीण भागामध्ये पाळीव जनावरांची शिकार करणार्या बिबट्याने वाहन चालकांवर रात्रीच्योवळी हल्ला करून जखमी केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. गोवळ परिसरामध्ये सातत्याने गोठ्यामध्ये घुसून शेतकर्यांच्या पाळीव जनावरांना हल्ला करून बिबट्याने नुकसान केल्याच्या घटना घडल्या आहेत. लोकवस्तीतील बिबट्याच्या या बिनधास्त वावराने सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण केली आहे. तर, दिवसाढवळ्या शेतशिवारामध्ये तर, रात्रीच्यावेळी लोकवस्तीमध्ये बिनधास्त येवून पाळीव जनावरांना बिबट्याकडून हल्ला होवून नुकसान केले जात असल्याने शेतकरीही भयभीत झाला आहे. मात्र, बिबट्याचा अद्यापही बंदोबस्त करण्यात वनविभागाला यश आलेले नाही. अशातच, तालुक्यातील वडदहसोळ भागामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे. सातत्याने रात्रीच्यावेळी लोकवस्तीमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात असताना वडदहसोळ येथील ग्रामस्थ श्री. म्हादये यांनी आपल्या घराच्या आवारामध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये बिबट्या आल्याचे कैद झाले आहे. त्यामुळे या भादगामध्ये बिबट्याचा वावर असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी गिरीष म्हादये यांच्यासह ग्रामस्थांकडून वनविभागाकडे करण्यात आली आहे.