Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रभारतनगर वसाहतीतील प्रलंबित कामाची अंमलबजावणी व्हावी.- मुक्ती संघर्ष समितीची अधिकारी समावेत बैठक.🛑...

भारतनगर वसाहतीतील प्रलंबित कामाची अंमलबजावणी व्हावी.- मुक्ती संघर्ष समितीची अधिकारी समावेत बैठक.🛑 एमआयडीसीच्या विस्तारी करणासाठी नारायण बागेऐवजी अन्य पर्यायी शोधावा – श्रमिक मुक्ती दल. ( प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप करावे.) आजरा तहसीलदार यांना निवेदन.

🛑भारतनगर वसाहतीतील प्रलंबित कामाची अंमलबजावणी व्हावी.- मुक्ती संघर्ष समितीची अधिकारी समावेत बैठक.
🛑 एमआयडीसीच्या विस्तारी करणासाठी नारायण बागेऐवजी अन्य पर्यायी शोधावा – श्रमिक मुक्ती दल. ( प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप करावे.) आजरा तहसीलदार यांना निवेदन.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

आजरा नगरपंचायत हद्दीतील भारत नगर वसाहतीतील ग्रामस्थांच्या विविध समस्या बाबत आज दि. ३ रोजी मुख्याधिकारी नगरपंचायत आजरा उपअभियंता, सा. बां. उपविभाग आजरा उपकार्यकारी अभियंता, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मर्या, उपविभाग आजरा, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन आजरा नगरपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या भारतनगर वसाहत भागात पायाभूत सुविधांचा विकास आणि सुधारणा ताबडतोब मिळाल्या पाहिजेत. यासाठी सदर निधीमध्ये भारतनगर वसाहत मध्ये कामांची यादी बनवताना या वसाहतीमधील सर्व कामे रस्ते, गटर्स आणि सांडपाणी ओढयाला जाण्याची सोय झाली पाहिजे.याबाबत. मुक्ती संघर्ष समितीचे अध्यक्ष संग्राम सावंत व पदाधिकारी यांच्यासोबत सामूहिक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत
आजरा नगरपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या भारतनगर भागात पायाभूत सुविधांचा विकास आणि सुधारणा ताबडतोब झाल्या पाहिजेत.मुक्ती संघर्ष समितीने दि. २४ रोजी व सोम दि.३ मार्च २०२५ रोजी दिलेल्या निवेदनातील मागण्यांबाबत ताबडतोब कार्यवाही व अंमलबजावणी झाली पाहिजे.
या संदर्भात आपण ताबडतोब निर्णय घेऊन अंमलबजावणी केली नाही. तर सोमवार दि. ३ मार्च २०२५ रोजी “संघर्ष मोर्चा” काढणार होतो. आंदोलन करणार होतो. मात्र कायदासुव्यवस्था बिघडू नये. कायदयाचे उल्लंघन होऊ नये.यासाठी आज आम्ही आपणासमोर बैठक करून आमच्या मागण्या मांडत आहोत. याकडे आपण सर्व विभागांनी वरील विषयास व संदर्भास अनुसरून आमचे म्हणणे व कायद्यानुसार नगरपंचायतींना स्थानिक पातळीवर विविध सेवांचा पुरवठा करणे आवश्यक आहे. ज्यात सांडपाणी व्यवस्थापन देखील समाविष्ट आहे. तसेच आरोग्य व आरोग्यविषयक सेवासाठी नगरपंचायतींना नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवणे आणि रोग नियंत्रणासाठी आवश्यक सेवा देणे यासाठी अधिकार प्राप्त आहेत. आपल्या नगरपंचायतीच्या क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास आणि सुधारणा अत्यंत आवश्यक ठरल्या आहेत. या भागात काही महत्त्वाच्या सुविधांचा अभाव आहे ज्यामुळे लोकांचे जीवन प्रतिकूल होत आहे. या संदर्भात भारतनगर मधील लोकांनी अगोदर निवेदने दिलेली आहेत. आता मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने भारतनगर (आजरा शहर) यांच्यासाठी खालील मागण्या करण्यात येत आहेत. याची निर्गत कायमस्वरूपी झाली पाहिजे. यासाठी आपण प्राधान्याने भारतनगर वसाहती मधील कामांची यादी बनवली पाहिजे. आणि काम ताबडतोब सुरू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवले पाहिजेत. भारतनगर वसाहतभागात पायाभूत सुविधांचा विकास आणि सुधारणा ताबडतोब मिळाल्या पाहिजेत. यासाठी सदर निधीमध्ये कामांची यादी बनवताना या वसाहतीमधील सर्व कामे रस्ते, गटर्स व सांडपाणी ओढयाला जाण्याची सोय झाली पाहिजे यासह विविध मागण्या केल्या आहेत.‌ “स्ट्रीट लाईट” ताबडतोब जोडून मिळाली पाहिजे. लो व्होल्टेज चे निवारण करून ज्यादाचे व्होल्टेज, तसे मागणी केलेल्या ठिकाणी रस्ते व गटर्स, मुबलक पाणी व वसाहतीमध्ये केलेल्या कामांची, झालेल्या कामांची व नियोजित कामांची यादी मिळाली पाहिजे. यासंदर्भात ठोस पावले प्रशासनाने गांभीर्यपूर्वक उचलावी आपण यामध्ये लक्ष घालून आजरा शहरातील भारत नगर मधील वसाहतीत राहणाऱ्या लोकांना न्याय द्याल अशी अपेक्षा आहे.
या संदर्भात आपण ताबडतोब निर्णय घेऊन अंमलबजावणी केली नाही. तर पुन्हा “संघर्ष मोर्चा” काढून “बेमुदत ठिय्या आंदोलन” करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये. याची नोंद घ्यावी. वरील विषयाबाबत चर्चा होऊन योग्य ती सेवा सुविधा देण्याची आम्ही सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी सहा. कार्यकारी अभियंता अ. स. कचरे, नगरपंचायत कार्यकारी अभियंता राकेश चौगुले, बांधकाम अभियंता प्रविण बैले, महावितरण अभियंता निखिल भोगरे, पी. बी. सुर्वे अभियंता सर्व विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ मुक्ती संघ समितीचे पदाधिकारी राज्याध्यक्ष संग्राम सावंत, समीर खेडेकर मजीद मुल्ला राज्याध्यक्ष जिल्हा संघटक तालुका संघटक
अब्दुलवाहिद सोनेखान सलीम शेख(सर) तौफिक माणगावकर सल्लाउद्दीन शेख, खुदबूद्दीन तगारे गुलाब शिकलगार सलीम नाईकवडे मुदस्सर इंचनाळकर, यासीन सय्यद (सर ) नईम, नाईकवडे, शौकत पठाण, आसिफ मुराद, सलीम ढालाईत, रहुफ नसरदी, सल्लाउद्दीन नसरदी, मोईन शेख, मुबारक नसरदी, आसिफ काकतीकर, पापा लतीफ मोहम्मद नसरदी,फहीम नसरदी रहीम लतीफ, रशीद लाडजी,
मुफीद काकतीकर सह भारत नगर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजरा नगरपंचायत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

🛑 एमआयडीसीच्या विस्तारी करणासाठी नारायण बागेऐवजी अन्य पर्यायी शोधावा – श्रमिक मुक्ती दल कॉ. संपत देसाई.
( प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप करावे.)

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील एमआयडीसीच्या विस्तारी करणासाठी नारायण बागेऐवजी अन्य पर्यायी शोधावा याबाबत श्रमिक मुक्ती दल कॉ. संपत देसाई. सह पदाधिकारी यांनी आजरा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
१- आजरा शहरालगत असलेली संस्थानकालीन नारायण बाग ही आजरा शहराचे हृदय असल्याने आजरा शहराला प्रदूषणमुक्त ठेवायचे असल्यास एमआयडीसीच्या विस्तारीकरणासाठी नारायण बागेऐवजी अन्य पर्यायी जागेचा विचार करणे.
२- आजरा तालुक्यात अनेक प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप अजून झालेले नाही. उचंगी धरणाची उंची दोन मीटर वाढवल्याने अजून किमान २५ हेक्टर जमीन आवश्यक आहे त्यामुळे सदरची जमीन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राखीव ठेवणेबाबत. कोणत्याही विभागाचा विकास व्हायचा असेल तर उद्योगधंदे वाढले पाहिजेत. त्यासाठी एमआयडीसी आवश्यक आहे. पण ती शहराचे अथवा नागरी वस्तीचे आरोग्य धोक्यात आणणारी नसावी. आजरा शहरालगत असलेली नारायण बाग ही आजरा शहराचे हृदय आहे. ही बाग फार पूर्वी म्हणजे संस्थान काळापासून आजरा शहराला स्वच्छ हवा पुरवत आली आहे. या बागेच्या बाजूने अलिकडे आजरा शहराचा विस्तार होऊन नागरी वस्ती झाली आहे. नारायण बाग मधील आजरा आणि पारेवाडी महसूल क्षेत्रातील १५/१६ हेक्टर जमीन ही एमआयडीसीच्या विस्तारीकरणासाठी दिली जाणार असल्याचे वर्तमानपत्रात आलेल्या बातमीवरून कळले आहे. खरतर कोणत्याही शहरालगत एमआयडीसी उभा करणे हे शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असते. त्यामुळे एमआयडीसी उभा करतांना ती शहरापासून आणि नागरी वस्तीपासून दूर उभी केली जाते. असे असतांना ज्या नारायण बागेला आजरा शहराचे हृदय समजले जाते. पश्चिमेकडून येणारा वारा आजरा शहराला स्वच्छ हवा पुरवत आला आहे. तोच वारा इथे एमआयडीसी झाल्यास आजरा शहरात प्रदूषित हवा आणि पाणी घेऊन येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी होणारे एमआयडीसीचे विस्तारीकरण थांबले पाहिजे. अजूनही या तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी किमान २५ ते ३० हेक्टर जमीन आवश्यक आहे. सदरची जमीन ही प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राखीव ठेवण्यात यावी. त्यामुळे एमआयडीसीचे विस्तारीकरण झालेच पाहिजे, या मुद्द्याशी आम्ही सहमत आहोत पण ते विस्तारीकरण ऐवजी अन्य ठिकाणी या निवेदनावर कॉ. संपत देसाई, प्रकाश मोरुस्कर, दशरथ घुरे, नारायण भडांगे, दशरथ घुरे, नारायण भदंगे, विष्णूमांजरेकर, संभाजी चव्हाण, दत्तात्रय बापट, विजय पाटील सह प्रकल्पग्रस्त व श्रमिक मुक्ती दिनाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.