इ व्ही एम विरोधात व वन्यप्राण्यामुळे शेत पिकाचे नुकसान – याबाबत ९ एप्रिल जेलभरो आंदोलन
( बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक.)
आजरा :- प्रतिनिधी.
आजरा येथील बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने इ व्ही एम विरोधात व वन्य प्राण्यांच्या मुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे होत असलेल्या नुकसान या विषयांच्यासाठी जेलभरो आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. या अनुषंगाने मौजे हत्तिवडे ता. आजरा येथे बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कोपरा सभा घेतली. यावेळी वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे तसेच त्यांच्यावर प्राण्यांचे हल्ले होत आहेत. सरकारला याबद्दल काहीही देणे घेणे नाही. परंतु शेतकऱ्याला याचा खूप मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे.
वन्यप्राण्यामुळे शेतीबरोबर शेतकऱ्यांना जीव सुद्धा घालवावा लागत आहे. त्याचबरोबर इ व्ही एम विरोधात ही आंदोलन करणार आहेत. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामधील अनेक तालुक्यांमधून याविषयी निवेदने दिलेली आहेत. आणि या विषयासाठी कोल्हापुरातून बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने एक मोठे व्यापक आंदोलन निर्माण केले जात आहे.. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी तसेच संविधानप्रेमी जनतेने या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन ही करण्यात येत आहे.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टी, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष किरण के के,अमित सुळेकर,डॉ. उल्हास त्रिरत्ने सह पदाधिकारी उपस्थित होते.