Homeकोंकण - ठाणेसाडेसात हॉर्सपॉवर विद्युत मोटर पंप धारक शेतकऱ्यांना.- न्याय मिळालाच पाहिजे महाविकास आघाडीची...

साडेसात हॉर्सपॉवर विद्युत मोटर पंप धारक शेतकऱ्यांना.- न्याय मिळालाच पाहिजे महाविकास आघाडीची निदर्शने.🛑वडकशिवालेत तलाठी कार्यालयाचे ग्रामस्थ, महिलांच्या हस्ते लोकार्पण संपन्न.🛑पुण्यात एसटी प्रवासी युवतीवर अत्याचार प्रकरणी. आरोपी नराधमावर कठोर कारवाई करावी.- आजरा तालुका एसटी प्रवासी संघटनेचे मागणी.🛑स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम दत्ता गाडेच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या.- मध्यरात्री रंगला अटकेचा थरार.- गावातून केली अटक.

🛑साडेसात हॉर्सपॉवर विद्युत मोटर पंप धारक शेतकऱ्यांना.- न्याय मिळालाच पाहिजे महाविकास आघाडीची निदर्शने.
🛑वडकशिवालेत तलाठी कार्यालयाचे ग्रामस्थ, महिलांच्या हस्ते लोकार्पण संपन्न.
🛑पुण्यात एसटी प्रवासी युवतीवर अत्याचार प्रकरणी. आरोपी नराधमावर कठोर कारवाई करावी.- आजरा तालुका एसटी प्रवासी संघटनेचे मागणी.
🛑स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम दत्ता गाडेच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या.- मध्यरात्री रंगला अटकेचा थरार.- गावातून केली अटक.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथे महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवार दि २८ फेब्रुवारी २०२५ रोजी साडेसात हॉर्सपॉवर पर्यंतच्या विद्युत मोटर पंप धारक शेतकऱ्यांना बिल माफीची घोषणा करूनही बिले दिली आहेत. त्याचा निषेध म्हणून बिलांची होळी करून निदर्शने केली. महाविकास आघाडीच्या वतीने घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी बोलताना कॉम्रेड संपत देसाई म्हणाले
महाराष्ट्र शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी साडेसात हॉर्सपॉवर विद्युत मोटर पंप धारक शेतकऱ्यांना वीज बिल माफ केले जाईल अशी घोषणा केली होती. निवडणूक झाल्यानंतर सत्तेवर आल्यावर मात्र या सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. ही घोषणा फसवी होती हे आता आलेल्या बिलावरून स्पष्ट झाले आहेत. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या या सरकारचा निषेध म्हणून आम्ही उद्या वीज ग्राहक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजी चौक आजरा निषेध म्हणून होळी करून निदर्शने करत असल्याचे सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, जनता बँकेचे चेअरमन मुकुंददादा देसाई, कॉम्रेड शांताराम पाटील, संजयभाऊ सावंत, विक्रम देसाई, शिवसेना उभाठा ता. प्रमुख युवराज पोवार, रवींद्र भाटले सह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस, शिवसेना सह मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते , मोटर पंप धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.‌

🛑स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम दत्ता गाडेच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या.- मध्यरात्री रंगला अटकेचा थरार.- गावातून केली अटक

पुणे :- प्रतिनिधी.

स्वारगेट बस स्थानकातील तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्ता गाडे याचा शोध घेण्यास पुणे पोलिसांना अखेर यश आले आहे. गाडे याला त्याच्याच गावात असलेल्या एका शेतातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मध्यरात्री दीडच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तरुणीवर बलात्कार केल्यानंतर गाडे हा आपल्या गुणाट या गावी आला होता.

महाशिवरात्री असल्याने तो तिथल्या कीर्तन कार्यक्रमात देखील सहभागी झाला होता. मात्र माध्यमांवर त्याचा फोटो आल्यानंतर तो तिथून फरार झाला होता. गावकऱ्यांनी त्याला गावात आल्याचे पाहिले होते. त्यानुसार पोलिसांच्या १३ पथक त्याचा शोध घेण्यासाठी तैनात करण्यात आली होती. श्वान पथक, ड्रोनच्या माध्यमातून त्याचा शोध सुरु होता. गावात आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध सुरु होता. पोलिसांनी दिवसभर शोधा ध करून देखील तो सापडला नव्हता. मात्र मध्यरात्री दीडच्या सुमारास तो पोलिसांना सापडला. बलात्कारच्या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यकक्षामतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, दोन दिवसांच्या शोध मोहिमेला अखेर यश आले आहे.

त्याला पकडल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याला पुण्यात आणण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तो स्वारगेट पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांच्या हाताला लागला. त्याला घेऊन पोलिसांचे पथक आता पुण्याच्या दिशेने निघाले आहे. दत्ता गाडे याने अजून काही कांड केले आहेत का? याचा उलगडा देखील आता होणार आहे. स्वारगेट सारख्या माहत्वाच्या ठिकाणी ही घटना घडल्याने सर्वांनाचं धक्का बसला होता. यामुळे महिलांची सुरक्षितता पुन्हा एकदा वाऱ्यावर असल्याचे पहायला मिळाले आहे. तरुणीने योग्य वेळी तक्रार दाखल केल्याने या प्रकरणाला वाचा फुटली होती. त्यामुळे दत्ता गाडे सारख्या सराईत आरोपीला पकडणे शक्य झाले. आरोपीला आज दुपारी तीननंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपीला सध्या लष्कर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

🛑वडकशिवालेत तलाठी कार्यालयाचे ग्रामस्थ, महिलांच्या हस्ते लोकार्पण संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

मौजे-वडकशिवाले, ता-आजरा येथे तत्कालीन सरपंच संतोष बेलवाडे यांच्या कार्यकाळात व पुढाकारातून सन २०२१/२२ मध्ये तलाठी कार्यालय मंजूर झाले. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आज ग्रामस्थांच्या हस्ते त्याचे लोकार्पण संपन्न झाले. तत्कालीन मंत्री मा. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या सहकार्यातून या कार्यालयाच्या बांधकामाला निधी उपलब्ध झाला. बरीच वर्षे तलाठी कार्यालय गावातील ग्रामस्थांच्या घरात भाड्याने घेऊन चालू होते. स्वतंत्र कार्यालय झालेने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. अशी माहिती श्री बेलवाडे यांनी दिली
यावेळी माजी सरपंच संतोष बेलवाडे, शंकर कदम,दत्तात्रय खराडे, मनोहर गोविलकर, नेताजी बेलवाडे, बाबुराव कांबळे, जनार्दन गोविलकर, बाबासाहेब जाधव, आनंदा मोरे, नारायण भोसले, बाबू कांबळे, सात्तापा पाटील, आनंदा कांबळे, सागर कांबळे, तानाजी शिवणे, मारुती गुंजकर, बाळू मिसाळ, भिकाजी कांबळे, स्वामी कांबळे, प्रमिला गुंजकर, कलावती भुसारी, अंकिता बेलवाडे, अनिता खराडे, निर्मला संकपाळ, गीता संकपाळ, कांता संकपाळ, माया कांबळे, मंगल कांबळे, शोभा कांबळे, तानुबाई संकपाळ, सुनंदा कांबळे, गुणवंता लोखंडे, अंजना कंबके, सविता कांबळे, तानुबाई संकपाळ इ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🛑पुण्यात एसटी प्रवासी युवतीवर अत्याचार प्रकरणी. आरोपी नराधमावर कठोर कारवाई करावी.- आजरा तालुका एसटी प्रवासी संघटनेचे मागणी.

आजरा.- प्रतिनिधी.

पुण्यात एसटी प्रवासी युवतीवर अत्याचार प्रकरणी आरोपी नराधमावर कठोर कारवाई करावी. अशी मागणी आजरा तालुका एसटी प्रवासी संघटनेच्या करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पुणे शहरातील स्वारगेट एसटी बस स्थानकावर अकलूज कडे जाणाऱ्या प्रवासी युवतीवर दत्तात्रेय गाडे यांनी अत्याचार केला आहे. या घटनेचा आजरा तालुका एसटी प्रवासी संघटना तीव्र शब्दात निषेध करीत आहे. या लच्छानस्पद घटनेतील नराधम दत्तात्रय गाडे या आरोपीला लवकर पकडून त्याच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालून त्याला फाशी शिक्षा द्यावी.

याचबरोबर राज्यातील प्रवासी महिला युवती यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक बस स्थानकावर पोलीस कक्षाची स्थापना करण्यात यावी. ज्या बस स्थानकावर सुरक्षारक्षक कार्यरत नाहीत त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक व्हावी.
तसेच वस स्थानकावरील प्रवासी वगळता इतर उनाडकी व टवाळकी करत बसलेले युवक यांना पायबंद घालण्यात यावा ही अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी यांच्यासह आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.