श्री सद्गुरू बाळुमामा बग्गा क्रं. ६ पालखी सोहळा आजरा – मडिलगेत होणार संपन्न. – गुरुवारी सायंकाळी महाप्रसाद
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा मडिलगेत श्री सद्गुरू बाळुमामा क्षेत्र आदमापूर बग्गा क्रं. ६ यांचा पालखी सोहळा संपन्न होणार आहे.
मंगळवार दि. २५ पासून बग्गा गावामध्ये दाखल झाला आहे. या बग्याचे कारभारी म्हणून नाग्गाप्पा मिरजे सेवेत आहेत.
सदर पालखी सोहळा हा श्री सद्गुरू बाळुमामा कौल देतील त्या ठिकाणी पालखी थांबुन पालखी सोहळा व महाप्रसाद तेथील ग्रामस्थ महाप्रसादाचे आयोजन करतात व ज्यांच्या शेतामध्ये बकरी बसवायचे असतात तोही कौल दिला जातो यानंतर त्या शेतामध्ये बकरी बसवली जातात ही प्रथा पारंपारिक पद्धतीने चालत आलेली आहे.
मडिलगे गुरुवार दि. २८ रोजी सायंकाळी ग्रामस्थ मडिलगे यांनी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सरपंच बापू निऊगरे सह सर्व देवस्थान व पंच मंडळी, ग्रामस्थ या सोहळ्यात सहभागी घेऊन हा सोहळा पार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या महाप्रसादाचा लाभ गावातील व परिसरातील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन मडिलगे ग्रामस्थांनी केले आहे.
