Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रवसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची १५ जानेवारी अखेरची ऊस बिले जमा.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची १५ जानेवारी अखेरची ऊस बिले जमा.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची १५ जानेवारी अखेरची ऊस बिले जमा.

आजरा.- प्रतिनिधी.

वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सिझन २०२४/२५ या हंगामात ९३ दिवसांमध्ये एकुण २७८३५७. ५४० मे. टन गाळप करून ३३१२५० विंवटल साखर पोती उत्पादीत केलेली आहे. सरासरी ११.९० टक्के इतका साखर उतारा प्राप्त झालेला असुन कारखान्याकडे दि. ०१.०१.२०२५ ते १५.१.२०२५ अखेर गाळप झालेल्या ऊसाची बिले प्रतिटन रु.३१००/- प्रमाणे विनाकपात ऊस पुरवठादार शेतक-यांच्या सेव्हींग खातेवरती जमा करण्यात आली आहेत. तरी संबंधित ऊस पुरवठादार शेतकरी यांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून बिलाची रक्कम उचल करावी अशी माहिती कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे यांनी दिली.

हंगाम २०२४/२५ मध्ये करखान्याने जास्तीत जास्त ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवुन सक्षम तोडणी वाहतुक यंत्रणा उभारली होती. परंतु अती पावसामुळे ऊसाची वाढ न झाल्याने व वातावरणाच्या परिणामामुळे ऊसास अकाली तुरे आलेने सरासरी हेक्टरी उत्पादन कमी होवून साखर उत्ता-यातही त्याचा परिणाम झाला, कारखाना गाळप करणेस सक्षम असुन सुध्दा ऊसा अभावी कारखाना लवकरच बंद करावा लागला. त्यामुळे गाळपाचे ठेवलेले उदित पार करू शकलो नाही. कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ, वैद्यकिय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शना खाली जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास आलेल्या ऊसाची व तोडणी वाहतुकीची उर्वरीत बिले देखील लवकरच जमा करणार असलेबाबत कारखान्याचे चेअरमन श्री. धुरे यांनी दिली.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष देसाई जिल्हा बँकेचे संचालक तथा बैंक प्रतिनिधी सुधीर देसाई, कारखान्याचे संचालक विष्णू केसरकर, उदयसिंह पोवार, मुकुंदराव देसाई, मधुकर देसाई, मारूती घोरपडे, श्री.अनिल फडके, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे), शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरुकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, संभाजी दत्तात्रय पाटील, अशोक तर्डेकर, हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई आणि प्र.कार्यकारी संचालक व्ही. के. ज्योती व अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.