Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमागील 24 तासांत.- देशात 37 हजार 154 नवीन रुग्ण.- आजपंर्यत तीन कोटी...

मागील 24 तासांत.- देशात 37 हजार 154 नवीन रुग्ण.- आजपंर्यत तीन कोटी रुग्णांची कोरोणावर मात.- तर 724 इतक्या जणांचा मृत्यू.

मागील 24 तासांत.- देशात 37 हजार 154 नवीन रुग्ण.- आजपंर्यत तीन कोटी रुग्णांची कोरोणावर मात.-
तर 724 इतक्या जणांचा मृत्यू

नवी दिल्ली. वृतसंस्था.१२

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 37 हजार 154 नवीन रुग्ण आढळले आहेत. याच कालावधीत 39,649 इतक्या रुग्णाने कोरोनावर मात केली आहे. तर 724 इतक्या जणांचा मृत्यू झाला आहे. भारताचा सध्याचा रिकव्हरी रेट 97.22 टक्के इतका झाला आहे. मागील दीड वर्षात देशात तीन कोटींपेक्षा जास्त जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोनामुक्ताची संख्या तीन कोटी 14 हजार इतकी झाली आहे.

भारताचा आठवड्याचा आणि दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्केंपेक्षा कमी आहे. भारताचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 2.32 टक्के इतका आहे. तर दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट 2.59 टक्के इतका आहे. मादील 21 दिवसांपासून भारताचा दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट तीन टक्केंपेक्षा कमी आहे.
देशाची सध्याची कोरोना परिस्थिती –

एकूण रुग्ण Total cases: 3,08,74,376

एकूण कोरोनामुक्त Total recoveries: 3,00,14,713

उपचाराधीन रुग्ण Active cases: 4,50,899

एकूण मृताची संख्या – Death toll: 4,08,764

मागील 24 तासांतील लसीकरण 12,35,287

एकूण लसीकरण – Total vaccinated:37,73,52,501
आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, 11 जुलै 2021 पर्यंत देशात 43 कोटी 23 लाख 17 हजार 813 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. रविवारी देशात 14 लाख 32 हजार 343 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

राज्यात 6,013 रुग्ण बरे झाले तर 8,535 रुग्णांची भर

राज्यात रविवारी दिवसभरात 8,535 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 61,57,799 झाली आहे.राज्यात आज रोजी एकूण 1,16,165 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. रविवारी राज्यात 6,013 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 59,12,479 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.02 % एवढे झाले आहे.
राज्यात रविवारी 156 रुग्ण दगावले. त्यांपैकी 118 मृत्यू हे मागील 48 तासांतील तर 38 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले मृत्यू कोविड पोर्टलवर अद्ययावत झाल्याने राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 194 ने वाढली आहे. मृतांचा एकूण आकडा 1,25,878 वर पोहोचला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.