🛑आम्हाला सोलरची सक्ती नको शेती पंपाचे वीज कनेक्शन द्या.- अन्यथा शंख ध्वनी करू – आजऱ्यातील शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन.
🛑शेतकऱ्यांना बिल माफीची फसवी घोषणा करूनही बिले सक्तीची.- वीज ग्राहक संघर्ष समिती, आजरा करणार वीज बिलाची होळी.. आंदोलन घेतले हाती.
🛑आजरा शहरातील भारत नगर वसाहतील – पायाभूत सुविधांसाठी ३ मार्च रोजी संघर्ष मोर्चा – मुक्ती संघर्ष समिती – संग्राम सावंत.
आजरा.- प्रतिनिधी.
२०१९ पासुन प्रलंबीत ठेवलेली शेतीपंपाचे विज कनेक्शन सोलरची सक्ती न करता देण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन दि. २५ रोजी आजरा तालुक्यातील शेतकरी वर्ग. यांनी आजरा तहसीलदार, यांना दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सन २०१९ सालापासुन आम्ही शेतकरी शेतीपंपाच्या कनेक्शनसाठी आजरा महावितरण कंपनीकडे विज कनेक्शनसाठी मागणी केली होती. याबाबतचे महावितरण कंपनीच्या नियमानुसार कोटेशन भरुन कागदपत्रांची पुर्तता केली होती, परंतू महावितरण कंपनीकडून सोलरची सक्ती केली जात आहे. सोलर कनेक्शन घेतली तरच विज कनेक्शन मिळणार या महावितरणच्या नियमामुळे शेतकऱ्यांची कुचंबना होत आहे.
एकीकडे वन्यप्राण्यापासुन शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. हाततोंडाला आलेली पिके वन्य प्राणी फस्त करीत आहेत व यामध्ये होणारे नुकसान हे वनविभाग व शासनाकडून अल्पप्रमाणात दिले जाते. यामुळे यापुढे शेती करावी की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापुर्वी कांही शेतकऱ्यांनी शेतामध्ये सोलर बसविले होते सोलरच्या होल्टेजने पाणी उपसा होत नाही व असे कांही यापुर्वी बसविलेले सोलर वन विभागाच्या हत्ति या वन प्राण्यांने विस्कुट उध्दवस्त केले आहेत. मुळात सोलर हा पाणी उपसासाठी योग्य नसतानाही शासन सोलर घेण्यासाठी कोणत्या आधारे सक्ती करीत आहे हा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे. आम्हाला सोलर नको आहे. आम्हाला विज कनेक्शन मिळावे ही आमची मुळ मागणी आहे. त्यामुळे आमच्या मागणी अर्जाचा सहानुभुतीपुर्वक विचार करावा अन्यथा आम्ही आजरा तालुक्यातील सर्व शेतकरी येणाऱ्या पंधरा दिवसात २०१९ ते २०२५ पर्यंत प्रलंबीत असलेली विज कनेक्शन नाही मिळाल्यास महावितरण व
शासनाच्या नावाने शंकध्वनी अंदोलन करण्यात येईल याची नोंद करावी. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास आम्ही शेतकरी जवाबदार असणार नाही. असे दिलेल्या निवेदनात म्हंटले या निवेदनावर रवि पाटील – मडिलगे
आशिष दोरुगडे – सोहाळे, चंद्रकांत जाधव – खानापुर
विलास गुरव – खानापुर, सचिन इंदुलकर – आजरा, ज्ञानु गोमा लाड- रायवाडा, भिकाजी शेटगे – पारपोली, अरुण गुडुळकर, आजरा, ज्ञानदेव लाड – रायवाडा, रामु हरेर, प्रकारा खबरे, विनायक जोशिलकर, राजाराम जोशिलकर, सह वीज कनेक्शन मागणी अर्जदार शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

🛑शेतकऱ्यांना बिल माफीची फसवी घोषणा करूनही बिले सक्तीची.- वीज ग्राहक संघर्ष समिती, आजरा करणार वीज बिलाची होळी.. आंदोलन घेतले हाती.
आजरा.- प्रतिनिधी.
शेतकऱ्यांना बिल माफीची फसवी घोषणा करून बिले भरणे सक्तीचे केल्याच्या निषेधार्थ वीज ग्राहक संघर्ष समिती, आजरा करणार वीज बिलाची होळी.. आंदोलन हाती घेतले असल्याची माहिती संघर्ष समितीने दिली आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
साडेसात हॉर्सपॉवर पर्यंतच्या विद्युत मोटर पंप धारक शेतकऱ्यांना बिल माफीची घोषणा करूनही बिले दिली आहेत. त्याचा निषेध म्हणून बिलांची होळी करून होणारी निदर्शने महाराष्ट्र शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी साडेसात हॉर्सपॉवर खालील विद्युत मोटर पंप धारक शेतकऱ्यांना वीज बिल माफ केले जाईल अशी घोषणा केली होती. निवडणूक झाल्यानंतर सत्तेवर आल्यावर मात्र या सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. ही घोषणा फसवी होती. हे आता आलेल्या बिलावरून स्पष्ट झाले आहेत. शेतकऱ्यांना फसवणार्या या सरकारचा निषेध म्हणून आम्ही वीज ग्राहक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजी चौक आजरा येथे जमून या आलेल्या बिलाची शुक्रवार दि २८ फेब्रुवारी २०२५ रोजी ठीक ११.०० वाजता जमून निषेध म्हणून होळी करून निदर्शने करीत आहोत. असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या परिस्थिती पत्रकावर वीज ग्राहक संघर्ष समिती, आजरा निवेदनावर कॉ संपत देसाई, संभाजी पाटील, शांताराम पाटील, विक्रम देसाई, रवी भाटले, युवराज पोवार, प्रकाश मोरुस्कर, रशीद पठाण, नौशाद बुडदेखान, निसार लादजी, संजय घाटगे यांच्या सह्या आहेत
शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन वीज ग्राहक संघर्ष समितीचे वतीने केले आहे.
आजरा शहरातील भारत नगर वसाहतील – पायाभूत सुविधांसाठी ३ मार्च रोजी संघर्ष मोर्चा – मुक्ती संघर्ष समिती – संग्राम सावंत.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या भारतनगर भागात पायाभूत सुविधांचा विकास आणि सुधारणा ताबडतोब झाल्या पाहिजेत.तसेच खालील मागण्यांबाबत ताबडतोब कार्यवाही व अंमलबजावणी झाली पाहिजे.या संदर्भात आपण ताबडतोब निर्णय घेऊन अंमलबजावणी केली नाही. तर सोमवार दि.३ मार्च २०२५ रोजी “संघर्ष मोर्चा” काढून आंदोलन करणार आहोत.
आजपर्यंत भारतनगर मधील लोकांनी दिलेले वेगवेगळे तक्रार अर्ज दिलेले आहेत. मात्र याची दखल घेतली नाही.या विषयासंदर्भात आणि मागण्या संदर्भात आमचे म्हणणे आज निवेदनाद्वारे तहसीलदार आजरा ,मुख्याधिकारी नगरपंचायत आजरा, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आजरा व उपअभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मर्यादित कंपनी आजरा यांना दिलेले आहे. तसेच प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी गारगोटी यांनाही निवेदन देऊन मांडलेले आहे. या निवेदनात आजरा शहरातील भारतनगर वसाहत सन- १९९७ पासून वसाहत आहे.तरी या वसाहतीला पायाभूत सुविधा मिळालेला नाहीत. नगरपंचायत झाल्यानंतर नुसती आश्वासने लोकांना दिलेली आहेत.मात्र त्यावर ठोस भूमिका घेऊन अंमलबजावणीची कार्यवाही झालेली नाही.
महाराष्ट्र नगरपरिषदा कायदानुसार खालील कलमांच्या आधारे शहरांमधील वेगवेगळ्या व साथींना उघडली न पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी नगरपंचायतची आहे त्यामुळे भारत नगर मधील लोकांच्यासाठी पायाभूत सुविधांची ठोस अंमलबजावणी झाली पाहिजे. भारतीय संविधानाच्या कलम 243W (Article 243W) मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकार आणि कर्तव्यांबद्दल सांगितले आहे. या कलमांद्वारे नगरपंचायतींना स्थानिक पातळीवर विविध सेवांचा पुरवठा करणे आवश्यक आहे, ज्यात सांडपाणी व्यवस्थापन देखील समाविष्ट आहे.
आपल्या नगरपंचायतीच्या क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास आणि सुधारणा अत्यंत आवश्यक ठरल्या आहेत. आमच्या भागात काही महत्त्वाच्या सुविधांचा अभाव आहे ज्यामुळे लोकांचे जीवन प्रतिकूल होत आहे. या संदर्भात भारत नगर मधील लोकांनी अगोदर निवेदने दिलेली आहेत. आता मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने वेगवेगळ्या मागण्या करण्यात येत आहेत. यासंदर्भात ठोस पावले प्रशासनाने गांभीर्यपूर्वक उचलली पाहिजेत. प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून आजरा शहरातील भारत नगर मधील वसाहतीत राहणाऱ्या लोकांना न्याय द्याल अशी अपेक्षा आहे. निवेदनात आहे.
असे झाले नाही तर मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने तर सोमवार दि.३ मार्च २०२५ रोजी “संघर्ष मोर्चा” काढून आंदोलन करणार आहेत..

सदरचे निवेदन देताना मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत, जिल्हा संघटक समीर खेडेकर, तालुका संघटक मजीद मुल्ला व भारत नगर मधील अब्दुलवाहिद सोनेखान, सलीम शेख, तोफिक माणगावकर, सल्लाउद्दीन शेख, खुदबू तगारे, गुलाब शिकलगार, यासीन सय्यद, सलीम नाईकवडे, मुद्दसर इंचनाळकर, नईम नाईकवडे, शौकत पठाण,आसिफ मुराद, सलीम ढालाईत, रहुफ नसरदी, सल्लाउद्दीन नसरदी, मोईन शेख, मुबारक नसरदी, आसिफ काकतीकर, पापा लतीफ, मोहम्मद नसरदी, फहीम नसरदी, रहीम लतीफ, रशीद लाडजी मुफीद काकतीकर व इतर भारत नगर मधील लोक व मुक्ती संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.