HomeUncategorizedकोरोणा अपडेट. २४ तासात राज्यात ३५ कोरोना रुग्णांचा मृत्यू. - महाराष्ट्र आरोग्य

कोरोणा अपडेट. २४ तासात राज्यात ३५ कोरोना रुग्णांचा मृत्यू. – महाराष्ट्र आरोग्य

कोरोणा अपडेट.
२४ तासात राज्यात ३५ कोरोना रुग्णांचा मृत्यू. – महाराष्ट्र आरोग्य विभागाची माहिती.
औरंगाबाद – प्रतिनिधी.

कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर नागरिकांनी कोरोना संबंधी नियम पाळण्यात कसूर करण्यास सुरूवात केली होती. मात्र, त्यामुळे रुग्ण संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ झालीय. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासात राज्यात ३५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, असे असले तरी राज्यातील नागरिक कोरोनाबाबत अद्याप सावध झालेले दिसत नाही.

राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कलम १४४ लागू.
मात्र, असे असतानाही राज्यात अनेक राजकीय आणि सांस्कृतीक कार्यक्रम सुरूच असल्याचं दिसून येतय. रस्त्यावरही लोक मास्क न लावताना फिरतांना दिसत आहे.

गेल्या २४ तासात महाराष्ट्रात ६ हजार ९७१ कोरोना रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर २ हजार ४१७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र, या सर्वात २४ तासातील मृत्यूचा आकडा ३५ रुग्णांवर पोहोचला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या ५१ हजार ७८८ वर पोहोचली आहे. राज्यातील सक्रिय रुग्ण संख्येतही वाढ झाली असून सध्या ५२ हजार ९५६ सक्रिय रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाने कळवले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.