व्हाट्सअँपने आपल्या सपोर्ट पेजवर महत्त्वाची माहिती दिली.- पहा काय माहिती दिली.
नवी दिल्ली वृत्तसंस्था.
नवीन वर्षाच्या सुरूवातीला नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे प्रचंड टीका झाल्यानंतरही इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हाट्सअँपने आपल्या व्यासपीठावर गोपनीयता संबंधित अटी व धोरणे पुन्हा लागू करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. नवीन पॉलिसीबाबत कंपनीकडून युजर्सना पुन्हा एकदा नोटीफिकेशन पाठवलं जात असून १५ मे पर्यंत पॉलिसी स्वीकारण्यास सांगण्यात आलं आहे. अशात प्रश्न उपस्थित होतो की जर तुम्ही पॉलिसी स्वीकारली नाही तर काय होईल. याबाबत व्हाट्सअँपने आपल्या सपोर्ट पेजवर महत्त्वाची माहिती दिली आहे.
तातडीने डिलीट नाही करणार अकाउंट:
१५ मे पर्यंत नवीन पॉलिसी न स्वीकारल्यास कंपनी तुमचं व्हाट्सअँप अकाउंट तातडीने डिलीट करणार नाही.
मात्र जोपर्यंत पॉलिसी स्वीकारत नाहीत तोपर्यंत व्हाट्सअँप वापरण्याचा पूर्ण अॅक्सेस तुम्हाला मिळणार नाही, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. म्हणजेच व्हाट्सअँप’चे सर्व फिचर्स तुम्हाला वापरता येणार नाहीत.
मेसेज वाचता किंवा पाठवता येणार नाहीत:
पॉलिसी न स्वीकारल्यास काही कालावधीसाठी युजर्सना कॉल्स आणि नोटिफिकेशन्स येतील, पण मेसेज वाचता किंवा पाठवता येणार नाहीत.
डिलीट झालेलं अकाउंट पुन्हा वापरता येणार नाही:
एकदा तुमचं अकाउंट डिलीट झाल्यास पुन्हा ते अकाउंट तुम्हाला वापरता येणार नाही. व्हॉट्सअॅपकडून कायमस्वरुपी अकाउंट डिलीट केलं जातं. अकाउंट डिलीट झाल्यानंतर युजरला त्याचा कोणताच डेटा पुन्हा भेटणार नाही. त्याचे सर्व मेसेज आणि डॉक्युमेंट्स डिलीट होतील.