समन्वयाने घरकुलाचे प्रश्न मार्गी लावावेत आमदार प्रकाश आबिटकर:
आजऱ्यात महा आवास अभियान कार्यशाळा संपन्न.
आजरा:-प्रतिनिधी.
प्रधानमंत्री आवास योजना ही अत्यंत महत्वपूर्ण पद्धतीने राज्य शासनाने राबवलेले अभियान असून अनेक लोकांना याचा थेट फायदा होतो. घरकुलांचे प्रश्न मार्गी लागावेत, सर्व सामान्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार व्हावे यासाठी चांगल्या व गतिमान पद्धतीने घरकुले उभी व्हावीत म्हणून प्रशासन व लाभार्थ्यांमध्ये समन्वय असावा असे प्रतिपादन आजरा भुदरगड चे आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते आजरा येथे महाआवास अभियान कार्यशाळेत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती उदय पवार होते.
सभेच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रास्ताविकपर भाषणामध्ये गटविकास अधिकारी बीड विभाग यांनी महा आवाज अभियान संदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी आम. प्रकाश आबिटकर म्हणाले, ही योजना राबवण्यात करता सरपंचांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे सर्व सरपंचांनी दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत असे आवाहन केले. आम. राजेश पाटील म्हणाले, मूलभूत गरजांपैकी स्वतःचे घरकुल ही आधी कडे प्राधान्य देना जोगी गरज निर्माण झाली आहे घरकुलांचे स्वप्न उराशी बाळगून सर्वसामान्य वर्ग आयुष्यभर कष्ट करताना दिसतो त्यांच्या डोक्यावर छत नाही अशांच्या डोक्यावर छत उभारणी करता ही योजना सरकारने राबवली आहे. गावातील विविध प्रश्न सोडवण्याबरोबरच घरकुलांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरपंचानी प्रयत्न करावेत असेही स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य जयवंत शिंपी, सौ. सुनिता रेडेकर तसेच पंचायत समिती उपसभापती वर्षा बागडी, सदस्य रचना होलम, तसेच उपअभियंता बांधकाम एल. एस. जाधव, उप अभियंता पाणीपुरवठा एस. ए. शितोळे, पंचायत समिती मधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आभार साहेब गटविकास अधिकारी पी. बी. जगदाळे यांनी मानले संपन्न झाली.
या कार्यशाळेचे मार्गदर्शक आम. प्रकाश आबिटकर, आम. राजेश पाटील होते. प्रास्ताविक गट. विकास अधिकारी बी. डी बाघ यांनी केले. सभापती उदयराज पवार अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास, चेअरमन संजय सिंह चव्हाण, तहसीलदार विकास अहिर होते. यावेळी बोलताना आम. श्री. आबिटकर म्हणाले
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण- आजरा तालुका महाआवास अभियानामध्ये सर्वसामान्यांना गरजुना घरकुल मिळावे यासाठी प्रयत्नशील अहोत. या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा यासाठी प्रामुख्याने ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांनी प्राप्त लाभार्थ्यांना सहकार्य करावे. प्रत्येक गरजूला घर मिळावे हाच या अभियानाचा व कार्यशाळेचा उद्देश आहे. कोरोणाचा पादुर्भाव वाढत आहे. यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी कोरणाचे शासनाने घालून दिलेले निर्बंध पाळावे व स्वतःच्या कुटुंबाला व स्वतःला सुरक्षित ठेवावे नेहमी मास्क वापरा असेही आम. श्री आबिटकर यांनी मार्गदर्शन मेळाव्यात बोलताना म्हणाले. आम. राजेश पाटील मार्गदर्शन मेळाव्यात बोलताना म्हणाले राज्यात ग्रामीण गृहनिर्माण योजना याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामात गतिमान करण्यासाठी ही योजना असून या योजनेमध्ये गरजूंना घरे मिळावी हा शासनाचा उद्देश असून ग्रामपंचायत स्तरावर गरजूंना मदत व्हावी व त्यांना निवारा मिळावा यासाठी आमचे प्रयत्न राहतील महा आवास अभियान ग्रामीण राबविण्याचे उद्देश म्हणजे ग्रामीण गृहनिर्माण योजना मध्ये शासकीय यंत्रणेबरोबरच समाजातील सर्व घटक त्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे ग्रामीण क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढवणे याबाबत जनजागृती करून ग्रामीण गृहनिर्माण योजना अंतर्गत गरजूंना पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसल्यास लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना अशा विविध योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळून घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी आमचे प्रयत्न असतील यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांना सरपंच ग्रामसेवक यांनीही सहकार्य करण्याची गरज असल्याचे आम. श्री पाटील बोलताना म्हणाले
यावेळी जिल्हा परिषद सदस्य जयवंत शिंपी, सौ. सुनिता रेडेकर तसेच पंचायत समिती उपसभापती वर्षा बागडी, सदस्य रचना होलम, तसेच उपअभियंता बांधकाम एल. एस. जाधव, उप अभियंता पाणीपुरवठा एस. ए. शितोळे, पंचायत समिती मधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आभार साहेब गटविकास अधिकारी पी. बी. जगदाळे यांनी मानले