Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रशिवजयंती दिवशी शिवध्वज फडकणार 12,500 फूट - ना .प्रकाश अबीटकर यांनी शिवध्वज...

शिवजयंती दिवशी शिवध्वज फडकणार 12,500 फूट – ना .प्रकाश अबीटकर यांनी शिवध्वज देत दिल्या शुभेच्छा.🛑आंबेओहोळ धरणग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत – प्रांत. कार्यालयांत बैठक.🛑भारतीय जनता पार्टी आजरासंघटन पर्व २०२४ – सभासद नोंदनी अभियान संपन्न.

🛑शिवजयंती दिवशी शिवध्वज फडकणार 12,500 फूट – ना .प्रकाश अबीटकर यांनी शिवध्वज देत दिल्या शुभेच्छा.
🛑आंबेओहोळ धरणग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत – प्रांत. कार्यालयांत बैठक.
🛑भारतीय जनता पार्टी आजरा
संघटन पर्व २०२४ – सभासद नोंदनी अभियान संपन्न.

कोल्हापूर.- प्रतिनिधी.

महाराष्ट्र व कोल्हापूर ची कन्या जागतिक विक्रमवीर गिर्यारोहक अन्वी अनिता चेतन घाटगे, वय -5 वर्षे जगातील सर्वात लहान गिर्यारोहक व जगातील वेगवान climber म्हूणन ओळख असलेली कोल्हापूर ची चिमुकली अन्वी.. ने आतापर्यंत गिर्यारोहन क्षेत्रात 5 वर्ल्ड रेकॉर्ड, 6 आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, 6 इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ची नोंद केली आहे, वयाच्या अवघ्या 2 वर्षे 11 महिने ची असताना महाराष्ट्रतील सर्व्वोच कळसुबाई शिखर चढाई करत वर्ल्ड रेकॉर्ड केले. तसेच, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यातील सर्व्वोच शिखरे कमी वयात सर केले आहेत.
62 गडसंवर्धन मोहीम राबवत छत्रपती शिवराय यांचे गड सांभाळीन हेचि जीवन हा ध्यास त्यांचा आहे. शिवजयंती म्हणजे शिवविचारांचा जागर, धीरता, व वीरता आणि मावळ्यांचे बलिदान यांना आठवत जगण्याची निष्ठा आणि हाच विचार पेरता यावा व गडकोट दुर्ग संवर्धन करूयात हा संदेश सर्वदूर पोचविण्यासाठी, उत्तराखंड राज्यातील हिमालय रांगेतील १२५०० फूट उंचीवर असलेले केदारकंठा हे शिखर सर करण्यासाठी दि. 17 फेब्रुवारी रोजी मुख्य चढाईस सुरुवात करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवशी 19 फेब्रुवारी रोजी शिखरावर पोचून छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवध्वज फडकाऊन , छ. महाराज महाराज यांची प्रतिमा पूजन करून शिवजयंती साजरी करणार आहे. त्यासाठी ती 13 फेब्रुवारी रोजी रवाना झाली आहे.

यावेळी अन्वी यांना या हिमालय शिखर चढाई मोहीम साठी ना .प्रकाश अबीटकर , पालकमंत्री तथा ,आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी शिवध्वज देत शुभेच्छा दिल्या, तसेच आमदार राजेश क्षीरसागर, अमृतमामा भोसले, उपमहाराष्ट्र केसरी, शाहुपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, संतोष डोके,सहा.पोलीस निरीक्षक क्रांती पाटील, विशाल मुळे, पोलिस उपनिरीक्षक अंकुश कारंडे, अनिकेत कुंडले ,शंकर कोळी ,अमर कांबळे व शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार तसेच चंदूकाका सराफ ज्वेलर्स चे ऑपरेशन मॅनेजर राजेंद्र पाटील सर आणि सर्व स्टाफ, सौ .सुनीता पाटील, अध्यक्षा प्रकाश पब्लिक स्कूल, इस्लामपूर, प्रतिकदादा पाटील, आनद पोवार व विविध घटकातील मान्यवर, शिवप्रेमी, गिरीप्रेमीयांनी मोहिमे साठी शुभेच्छा दिल्या . यावेळी वडील चेतन घाटगे, प्रशिक्षक व आई अनिता घाटगे, प्रा. अनिल मगर सर हे अन्वि सोबत् मोहिमेसाठि रवाना झाले आहेत.
युवा वर्ल्ड चे तेजस जिबकाटे यांनी मोहीम आखणी केली आहे.

🛑आंबेओहोळ धरणग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत – प्रांत. कार्यालयांत बैठक.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

आंबेओहोळ धरणग्रस्तांची प्रांतकार्यालय गडहिंग्लज येथे बैठक पार पडली. गडहिंग्लजचे प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांच्याशी झालेल्या बैठकीत कृष्णा खोरे महामंडळाचे अधिकारी व प्रकल्पग्रस्त यांच्या विविध विषयावर चर्चा झाली. यावेळी आंबेऒहळ धरणग्रस्त संग्राम संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव म्हणाले. आजरा-भुदरगड प्रांताधिकार्‍यांना पुनर्वसनाचे सर्वाधिकार आहेत मात्र येथील कार्यालयातून केवळ पोस्टमनचे काम केले जाते एक तर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वाधिकार गडहिंग्लजप्रांतांना द्यावेत अन्यथा जिल्हा पुनर्वसन कार्यालयातून कामकाज चालवावे. कोणाच्यातरी राजकारणासाठी धरणग्रस्तांचा बळी देऊ नका. गेली २४ वर्ष प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होत नाही. जमिनी संपादन केल्या जात नाहीत हे बरोबर नाही. त्यावर दोन गावच्या जमिनी संपादन करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल असे आश्वासन प्रांताधिकारी काळबांडे यांनी दिले. जमिनी मिळालेल्या धरणग्रस्तांना भूखंड वाटप का केले जात नाहीत? असा प्रश्न प्रकल्पग्रस्तांनी यावेळी उपस्थित केला. जमिनी ऐवजी पॅकेज मिळण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी करारनामे करून सुद्धा पैसे दिले जात नाहीत असा प्रश्न सदु शिवने यांनी उपस्थित केला यावर लवकरच धरणग्रस्तांना पैसे मिळतील अशी माहिती देण्यात आली. अद्याप पुनर्वसन न झालेल्या शेतकऱ्यांना निर्वाह भत्ता दिला नाही तो देण्याबाबत चर्चा झाली याच विषयाला अनुसरून अनेक वर्ष महिन्याला चारशे रुपये भत्ता दिला जातो शेतकऱ्यांच्या भत्त्यात चाळीस वर्ष वाढ नाही मात्र सरकारी नोकरांना पाचव्या वेतन आयोगापासून सातव्या वेतन आयोगापर्यंत वाढ करण्यात आली आहे. महागाईमुळे भत्ता वाढवून मिळावा अशा प्रकारचे स्वतंत्र निवेदन प्रांताधिकारी ‍यांच्या मार्फत पुनर्वसन मंत्री यांना देण्यात आले. ते निवेदन प्रांताधिकारी यांनी स्वीकारले. धरणग्रस्तांच्या मिळालेल्या जमिनीवर बेकायदा चुकीचा बोजा चढवला आहे, तो कमी करण्याबाबत प्रांताधिकार्‍यांनी आश्वासन दिले. सदरची बैठक दोन टप्प्यात पार पडली सुरुवातीला कॉम्रेड संपत देसाई यांनी काही प्रश्नाबाबत चर्चा केली त्यानंतर संग्राम संघटनेच्या वतीने कॉम्रेड शिवाजी गुरव यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी प्रकाश देसाई, सुभाष पाटील, सदू शिवणे, रोहिणी चौगुले, बाबू नाईक, नंदू पाटील, सखाराम कदम, महादेव खाडे, सुशीला पाटील, कल्पना जाधव, मनोहर पावले यांच्यासह आरदाळ , कर्पेवाडी, होन्याळी व हालेवाडी गावातील प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🛑भारतीय जनता पार्टी आजरा
संघटन पर्व २०२४ – सभासद नोंदनी अभियान संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

आजरा येथील छ संभाजी महाराज चौक आजरा येथे भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यानी देशभरामध्ये चालू असलेल संघटन पर्व २०२४ मढ़ील सभासद नोंदनी अभियान राबविले आले. देशभरमद्ये १३ कोटी सभासद संख्या आसनारी विश्वतील सगल्यात मोठा राजकीय पक्ष म्हणुन भाजपा पक्ष परिचित आहे.
महाराष्ट्रमध्ये १.५० कोटी सदस्य संख्या करण्याचे उद्धिष्ठ आहे .प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फड़नवीस यांच्या मार्गदर्शनखाली आणि तसेच ना चंद्रकांतदादा पाटील, खा धनंजय महादिक आणि जिल्हा अध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या सूचने नुसार आज आजरा मध्ये देखिल सभासद नोंदनी अभियान आयोजित करण्यात आली होती.
त्यामध्ये भा ज पा च्या कार्याने प्रेरित होऊन तरुण तरुणी वृद्ध नागरिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभाला. आजरा तालुक्यातील नेते माजी तालुका अध्यक्ष अरुण देसाई, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कुंभार, नगरसेवक आनंदा कुंभार, माजी कारखाना संचालक मालिककुमार बुरूड, श्रीपती यादव, राजू चंदनवाले, अभिनंदन परुलेकर, जयसिंग शेंदरकर, विनोद जाधव, सचिन इंडलकर, रामजी पाटील आनंदा पाटील उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.