Homeकोंकण - ठाणेमुंबईवरील 26/ 11 च्या हल्ल्यातील खतरनाक दहशतवादी तहव्वुर राणाला भारताकडे सोपवणार.- डोनाल्ड...

मुंबईवरील 26/ 11 च्या हल्ल्यातील खतरनाक दहशतवादी तहव्वुर राणाला भारताकडे सोपवणार.- डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा.🛑वाळू माफियांकडून महसूलच्या पथकावर जीवघेणा हल्ला.

🟥मुंबईवरील 26/ 11 च्या हल्ल्यातील खतरनाक दहशतवादी तहव्वुर राणाला भारताकडे सोपवणार.- डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा.
🛑वाळू माफियांकडून महसूलच्या पथकावर जीवघेणा हल्ला.

वॉशिंग्टन :- वृत्तसंस्था.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसीय अमेरिका दौऱ्यावर असून त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने मुंबईतील २००८ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपीचं प्रत्यार्पण करण्याची मंजुरी ट्रम्प प्रशासनाने दिली आहे. मोदी-ट्रम्प भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटातील सूत्रधार तहव्वुर राणा याच्या प्रत्यार्पणाला आम्ही मंजुरी देत आहोत. राणाला न्यायाचा सामना करण्यासाठी भारतात जावं लागेल असं त्यांनी सांगितले. व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. आम्ही इथं आणि भारतात बराच वेळ एकत्र राहिलो आहे. ५ वर्षापूर्वी मी सुंदर देशात जाऊन आलो. तो माझ्यासाठी अविश्वसनीय काळ होता. अमेरिका आणि भारत यांच्यात विशेष नातं आहे. जगातील सर्वात जुनी आणि मोठी लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी फ्रेमवर्कची मी घोषणा करत आहे असं त्यांनी सांगितले.

🟥मुंबई पोलिसांनी 26/11 दहशतवादी हल्ल्यासंबंधी आपल्या आरोपपत्रात तहव्वुर राणाच्या नावाचा समावेश केला आहे होता. त्याच्यावर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI आणि दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाचा सक्रीय सदस्य म्हणून काम केल्याचा आरोप आहे. चार्जशीटमध्ये राणावर आरोप आहे की, त्याने 26/11 दहशतवादी हल्ल्यााचा मास्टरमाइंड डेविड कोलमॅन हेडलीची मदत केली. मुंबईत कुठे-कुठे हल्ले करायचे, त्या जागांची रेकी तहव्वुर राणाने केली होती. प्लान बनवून पाकिस्तानी दहशतवाद्यांना सोपवला होता.
तहव्वुर राणा आणि डेविड कोलमॅन हेडली उर्फ दाउद सईद गिलानी बालपणीचे मित्र आहेत. हेडली एक अमेरिकी नागरिक आहे. त्याची आई अमेरिकी आणि वडिल पाकिस्तानी होते. अमेरिकी अधिकाऱ्यांनी ऑक्टोंबर 2009 मध्ये शिकागोमधून हेडलीला अटक केली होती. अमेरिकी कोर्टाने 24 जानेवारी 2013 रोजी हेडलीला मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्या प्रकरणी दोषी ठरवून 35 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. तहव्वुर राणाने पाकिस्तानच्या हसन अब्दाल कॅडेट स्कूलमध्ये शिक्षण घेतले. हेडलीने सुद्धा अमेरिकेत शिफ्ट होण्याच्या पाच वर्ष आधी तिथे शिक्षण घेतले होते.

🛑वाळू माफियांकडून महसूलच्या पथकावर जीवघेणा हल्ला.
( पथकाला पेटवून देण्याचा प्रयत्न.- थोडक्यात वाचला जीव (

छत्रपती संभाजीनगर :- प्रतिनिधी.

वाळू माफियांनी महसूलच्या पथकावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात ही घटना घडली आहे. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी ४ वाळूतस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

🟥मिळालेल्या माहितीनुसार, अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडल्यानंतर महसूल विभागाच्या पथकावर वाळूतस्करांनी तुफान दगडफेक केली. एवढच नाही तर अधिकारी, कर्मचारी बसलेल्या शासकीय वाहन डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने चालकाने तात्काळ वाहन पळवल्याने त्यांचा जीव वाचला. घटनेचा माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी 4 वाळूतस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असून त्यापूर्वी वाळू माफियांचा गुंडगिरी पाहायला मिळत आहे.
🔴गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळू माफियांचा हैदोस पाहायला मिळतो. पैठण, वैजापूर, सिल्लोड तालुक्यातील अनेक भागात तर बिनधास्तपणे वाळू उपसा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आता तर या वाळू माफियांची हिंमत एवढी वाढली आहे की, थेट महसूल विभागाच्या पथकावर डिझेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न झाला. हा सर्व धक्कादायक प्रकार सिल्लोड तालुक्यातील दीडगाव ते उपळी रस्त्यावर रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी हल्ला करणाऱ्या वाळूतस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.