HomeUncategorizedअतिवृष्टी २०२४ घरांची पडझड.- नुकसान भरपाई अद्याप नाही.- शासनाचे दुर्लक्ष.( जिल्ह्यात आजरा...

अतिवृष्टी २०२४ घरांची पडझड.- नुकसान भरपाई अद्याप नाही.- शासनाचे दुर्लक्ष.( जिल्ह्यात आजरा गडहिंग्लज चंदगड मधील अधिक लाभार्थी. )🛑आजरा अर्बन बँकेला “बँको ब्लू रिबन-२०२४” पुरस्कार प्रदान .🟥अल्पवयीन गुन्हेगारांचे वय १४ वर्षे करण्याचे अजित पवार यांचे संकेत.

🛑अतिवृष्टी २०२४ घरांची पडझड.- नुकसान भरपाई अद्याप नाही.- शासनाचे दुर्लक्ष.
( जिल्ह्यात आजरा गडहिंग्लज चंदगड मधील अधिक लाभार्थी. )
🛑आजरा अर्बन बँकेला “बँको ब्लू रिबन-२०२४” पुरस्कार प्रदान .
🟥अल्पवयीन गुन्हेगारांचे वय १४ वर्षे करण्याचे अजित पवार यांचे संकेत.

कोल्हापूर.- प्रतिनिधी.

Oplus_131072

कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ग्रामीण भागासह २०२४ मध्ये अति पावसाने ( अतिवृष्टीने ) राज्यात अनेक घरांची पडझड झाली. सदर घरांचे पंचनामे झाले. अतिवृष्टी मध्ये पडझड झालेल्या बाधिथ लाभार्थ्यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केले. परंतु महाराष्ट्र शासनाकडून सदर प्रस्ताव धूळखाहात पडले आहेत. सन. २०२५ उजाडलं नव सरकार स्थापन झालं. पण अद्यापही याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत स्थानिक तहसील विभागात विचारणा केली असता अद्या प याबाबतचा महाराष्ट्र शासनाकडून पाठपुरवठा होऊन दिलेले प्रस्ताव मंजूर किंवा निधी बाबतचे परिपत्रक स्थानी तहसील ला प्राप्त न झाले असल्याचे सांगण्यात येते.
गोरगरीब लाभार्थी यांची दगड मातीची घरी आहेत. अशी घरे अतिवृष्टी काळात कोसळली काहींना उघड्यावर राहण्याची वेळ आली काही नाही भाड्याने दुसऱ्याच्या घरात स्थलांतर केले.
ज्या विभागात अति पाऊस पडून अतिवृष्टीने नेहमीच घरांची पडझड होते. अशा ठिकाणी तरी शासनाने सदर प्रस्ताव मंजूर करून निधी देणे गरजेचे होते परंतु अजूनही या प्रस्तावांकडे लक्ष देऊन राज्यातील जिल्हा अतिवृष्टी विभागाकडे सदर निधी पाठवला नसल्याने लाभार्थी अतिवृष्टीने पडलं झालेल्या घराच्या दुरुस्तीची कधी करायची व हा निधी कधी येणार या प्रतीक्षेत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गडहिंग्लज चंदगड राधानगरी भुदरगड या तालुक्यातील अतिवृष्टीने पडझड झालेल्या घरांची संख्या अधिक आहे. यासाठी जिल्हा अतिवृष्टी विभागाने तात्काळ महाराष्ट्र शासनाकडे मागणी करून बाधित लाभार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी सदर लाभार्थ्याकडून होत आहे.

🛑आजरा अर्बन बँकेला “बँको ब्लू रिबन-२०२४” पुरस्कार प्रदान

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

अविस पब्लिकेशन यांचेमार्फत लोणावळा येथे घेणेत आलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये भारतातील अग्रगण्य को-
ऑपरेटीव्ह बँकांचा सहभाग होता. गेली ६४ वर्षे अत्यंत उत्कृष्ठ बैंकिंग सेवा देणाऱ्या मार्च २०२४ अखेरच्या संपलेल्या
आर्थिक वर्षामध्ये अर्बन बँकामधून सर्व निकषामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केले बद्दल (ठेवी रु.८५० कोटी च्या वरील बँक)
अविस पब्लिकेशन यांचे मार्फत दिला जाणारा “बँको ब्लू रिबन -२०२४” चा पुरस्कार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे चिफ
जनरल मॅनेजर भार्गेश्वर बॅनर्जी यांचे हस्ते व बँकोचे पदाधिकारी अविनाश शिंत्रे आणि अशोक नाईक यांचे
उपस्थितीत देणेत आला यावेळी बँकोचे ज्युरी अतुल खिरवाडकर उपस्थित होते. सदर पुरस्कार बँकेच्या वतीने बँकेचे संचालक रमेश कुरुणकर, डॉ. दीपक सातोसकर, सुनील मगदुम, किशोर भुसारी, सुर्यकांत भोईटे यांनी स्विकारला. या बद्दल अविस पब्लिकेशन यांनी बँकेचे अभिनंदन केले.

चौकट

बँकिंग हा केवळ व्यवसाय म्हणून न मानता समाजपयोगी आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी बँकेचे सर्व व्यवस्थापन आणि कर्मचारी कार्यरत आहेत यासाठी या बँकेचे कौतुक होत आहे. शेतीपुरक उद्योग, छोटे व्यावसायिक व उद्योग यांना अर्थ पुरवठा हा केंद्र बिंदू मानून बँकेने आतापर्यन्त जवळपास रु.१६०० कोटीच्या वर व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. स्वभांडवलावर मल्टी स्टेट दर्जा प्राप्त करणारी जिल्ह्यातील आजरा बँक ही एकमेव बँक असून शेड्यूल बँकेकडे वाटचाल सुरू आहे. बँकेत आधुनिक अशा FCO कार्य प्रणालीच्या माध्यमातून सेव्हिंग खाती उघडण्याबाबतची व केंद्र शासनाची PMFME (सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग) व PMEGP व राज्य शासनाची अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना, मोबाईल बँकिंग, Google Pay, PhonePe, Paytm, QR Code तसेच Whatsap Banking च्या माध्यमातून सर्व ग्राहकांना आपल्या बँकेतील त्यांच्या सर्व खात्यांचे statement पाहणे, चेक बुक रिक्वेस्ट देणे, खाते ब्लॉक करणे इ. सुविधा उपलब्ध आहेत.

🟥अल्पवयीन गुन्हेगारांचे वय १४ वर्षे करण्याचे अजित पवार यांचे संकेत.

मुंबई.- प्रतिनिधी.

बाल गुन्हेगारीची वयोमर्यादा १८ वर्षे आहे. मात्र, १३ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून, मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. या वयोगटातील मुलांची दिशाभूल करून त्यांच्याकडून काही चुकीच्या गोष्टी करवून घेतल्या जातात. त्यामुळे अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याने अल्पवयीन गुन्हेगारीची वयोमर्यादा १८ ऐवजी १४ वर्षे करण्याचे विचाराधीन आहे. त्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. बारामती तालुक्यातील पणदरे येथील एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.

🟥या विषयी पुढे बोलतांना ते म्हणाले, ‘‘१८ वर्षांखालील मुले गुन्हा घडल्यानंतर ही मुले अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करता येत नाही. त्यांना कारागृहात टाकता येत नाही. वयोमर्यादेमुळे त्यांना बालसुधारगृहात ठेवावे लागते. त्यामुळे ही वयोमर्यादा कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना विनंती केली आहे. १४ वर्षांच्या मुलाचा गुन्ह्यात सहभाग असेल, तर कायद्यामध्ये बदल करून या वयोगटातील मुलांनाही कडक शिक्षा कशी होईल, यासाठी प्रयत्न केले जातील.
‘संसदेचे अधिवेशन एक फेब्रुवारीपासून सुरू होईल. त्यामध्ये अर्थसंकल्प सादर केला जाईल. या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत मी दिल्ली दौरा करणार आहे. त्या वेळी अल्पवयीन गुन्हेगारांचे वय कमी करण्यासंदर्भात पुन्हा चर्चा करण्यात येईल.’ असेही पवार यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.