🛑आजरा तालुक्यात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न..
🛑रवळनाथ पतसंस्थेतील ध्वजारोहणाचा मान महिलांना
तालुकावासियांसमोर एक नवा आदर्श : सर्वच स्तरातून कौतुक.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुक्यात आजरा तहसीलदार कार्यालय, आजरा पंचायत समिती, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग वन विभाग, उप अभियंता बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, सह आजरा नगरपंचायत, सर्व महाविद्यालय हायस्कूल व प्राथमिक शाळेमध्ये २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.

सकाळी ९. १६ मि. आजरा तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
आजरा पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी संजय धुळाज, यांच्या हस्ते करण्यात आले आदरा तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये तालुका अधिकारी, तर आजरा नगरपंचायत येथे मुख्याधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

प्रजासत्ताक दिन म्हणजे २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार आणि प्रजासत्ताकात देशाचे संक्रमण. दरवर्षी या दिवसाचे औचित्य साधून भव्य लष्करी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
नवी दिल्लीत लष्करी शक्तीचे भव्य प्रदर्शन करत सशस्त्र दलाचे जवान कार्तव्य पथावर मोर्चा काढतात. कर्तव्य पथावरील हा भव्य कार्यक्रम या शुभ दिवशी देशभरात घडणाऱ्या इतर सर्व गोष्टींना ग्रहण लावतो.
राजधानी नवी दिल्लीयेथे राष्ट्रपती भवनाजवळील रायसीना हिल (राष्ट्रपती भवन), कर्तव्य पथवर, इंडिया गेटच्या पलीकडे आणि ऐतिहासिक लाल किल्ल्यावर भव्य परेडने उद्घाटन करण्यात येते.

या दिवशी कार्तव्य पथावर समारंभपूर्वक परेड आयोजित केली जाते, जी सुंदर चित्ररथ तयार करून भारत, विविधतेतील एकता आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यांना आदरांजली म्हणून सादर केली जाते.
प्रजासत्ताक दिन परेड २०२५ मधील चित्ररथाची थीम अशी निश्चित करण्यात आली आहे-” स्वर्णिम भारत – विरासत और विकास”

संरक्षण मंत्रालय सहकार्याने मायगव्ह ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नागरिकांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आणि भारताचे प्रजासत्ताक आणि लोकशाही मूल्ये बळकट करण्यासाठी आपले योगदान देण्याचे आवाहन केले आहे.

तहसील कार्यालय आजरा या ठिकाणी झालेल्या ध्वजवंदनासाठी आजरा तहसील येथील नायब तहसीलदार मासाकांत देसाई, महसूल नायब अशोक कोलते, तहसील कार्यालय स्टाफ, आजरा पोलीस स्टेशनचे सपोनी नागेश यमगर, सर्व पोलीस कर्मचारी तसेच अण्णाभाऊ संस्था समोरचे अध्यक्ष अशोक चराटी, महाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयवंत शिंपी, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, शेतकरी संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष संचालक, भाजपचे सुधीर कुंभार, मुन्ना महाडिक युवा मंचचे समीर चांद, माजी नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी, नगरसेविका शकुंतला सलावाडे, विलास नाईक, आलम नाईकवाडे, दिलावर चांद, सह विविध पक्षांचे पदाधिकारी व्यंकटराव हायस्कूल चे विद्यार्थी आजऱ्यातील सर्व हायस्कूलचे एनसीसी विद्यार्थी, आजी-माजी सैनिक, सर्व शासकीय विभागाचे अधिकारी आजरा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🛑रवळनाथ पतसंस्थेतील ध्वजारोहणाचा मान महिलांना
तालुकावासियांसमोर एक नवा आदर्श : सर्वच स्तरातून कौतुक.
आजरा : प्रतिनिधी.

रवळनाथ पतसंस्थेत प्रजासत्ताकदिनी होणारे ध्वजारोहण जिल्हयातील प्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ डॉ. स्मिता फर्नाडीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संस्थेचे अध्यक्ष अभिषेकदादा शिंपी हे आपण स्वतः ध्वजारोहण न करता दरवर्षी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, ज्येष्ठ सभासद, महिला आदी व्यक्तींना ध्वजारोहणाचा मान देवून तालुकावासियांसमोर एक नवा आदर्श घालून देतात .

त्यांच्या या मोठ्या मनाने घेतलेल्या निर्णयाने त्यांच्यासह संस्थेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे .
दरवर्षी संस्थेत स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताकदिनी होणारे ध्वजारोहण विदयमान अध्यक्ष यांच्या हस्ते केले जाते. मात्र अभिषेक शिंपी यांनी आपण अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर आपल्या काळात होणारे ध्वजारोहण हे आपण स्वतः न करता समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, ज्येष्ठ सभासद, महिला आदी व्यक्तींना ध्वजारोहणाचा मान देण्याचा निर्णय घेतला. व स्वातंत्रदिनी होणारया पहिल्या ध्वजारोहणाचा मान ज्येष्ठ सभासद देगा शाहू डिसोझा यांना दिला व यंदा जिल्हयातील प्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ डॉ. स्मिता फर्नांडीस यांना ध्वजारोहण करण्याचा मान दिला. यावेळी उपस्थित महिलांचा सन्मान करण्यात आला.

त्यांच्या या निर्णयाने त्यांच्यासह संस्थेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी बोलताना अध्यक्ष शिंपी म्हणाले, समाजात आपण जे ताठ मानेने आणि अभिमानाने जगतो त्यासाठी अनेक मोठ्या लोकांचे योगदान आहे. आणि महिलांचा सन्मान करने हे आपले नैतिक मुल्य आहे. याची जाणीव समाजाला, तरूण पिढीला कळावी या हेतून हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सष्ट केले.

तसेच संस्थेच्या विविध ठेव योजनांसह कर्ज मागणीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे .ठेवीदारांकरिता चांगले व्याजदर दिले असल्याने ठेवीनांही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सध्या २० कोटी ठेवींचा टप्पा पुर्ण केला आहे. तसेच आपल्या संस्थेच्या सभासदांकडूनही कार्यक्षेत्र वाढीची मागणी होत होती. याशिवाय तालुक्याबाहेरील लोकांना कर्ज वितरण करता येत नव्हते. या सर्व गोष्टींचा विचार करून संस्थेचे नुकतेच जिल्हा कार्यक्षेत्र करून घेतले आहे. या कार्यक्षेत्र वाढीमूळे संस्थेचा व्यवसाय वाढविणे आता सोईचे होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सौ. प्रियंका शिंपी, सुरेखा फडके, धनश्री कांबळे, तेजस्विनी नार्वेकर, संचालिका माधुरी पाचवडेकर, अर्चना मराठे, दिवाकर नलवडे, शेखर करंबळी, आप्पासो पाटील, हुसेनसाब दरवाजकर, अशोक पोवार, अशोक पाचवडेकर, इम्रान सोनेखान, आप्पासाहेव तेरणी यासह संस्थेचे उपाध्यक्ष समीर गुंजाटी, सर्व संचालक, मॅनेजर विश्वास हरेर उपस्थित होते.