संविधान बचाओ देश बचाओ.- आजऱ्यात शिवसेना, व महाविकास आघाडीचा संविधान पूजन संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथे संविधान बचाव या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या मेळाव्यात २६ जानेवारीच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात सर्वत्र संविधान पूजन साजरे करण्याचे आदेश दिले होते.

त्या अनुषंगाने शिवसेना आजरा व महाविकास आघाडी यांच्या वतीने संविधान पूजन साजरा करण्यात आला.

आजरा येथील संभाजी महाराज चौकामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे होते.

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख श्री. शिंत्रे म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जो आदेश दिला आहे.

या देशाप्रमाणे आज सर्वत्र महाराष्ट्रभर संविधान पूजन कार्यक्रम होत आहेत. हुकूमशाहीच्या राजकारणात संविधान धोक्यात असल्याचे स्पष्ट दिसत आहे त्यामुळे संविधानाची आठवण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण करून देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.

ता. प्रमुख युवराज पोवार यांनी संविधान पूजन करण्याचा हेतू स्पष्ट केला. यावेळी प्रा. नवनाथ शिंदे संविधान पूजन व संविधान कशा पद्धतीने धोक्यात जात आहे. यासाठी संविधान वाचवण्यासाठी सर्व नागरिकांनी संविधानाचे महत्त्व जाणून घेतले पाहिजेत. याबाबतचे मार्गदर्शन केले.

यावेळी संविधान बचाव देश बचाओ च्या घोषणांनी परिसर दराने सोडला..

यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, शहर प्रमुख ओमकार माधाळकर, समीर चांद, विभाग प्रमुख दयानंद भोपळे, दिनेश कांबळे, शिवसेना, युवा सेना पदाधिकारी महाविकास आघाडीचे माजी नगरसेवक किरण कांबळे तसेच रवींद्र भाटले, सह प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री चांद यांनी आभार मानले.
