केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालये चे मलिग्रे येथे श्रम संस्कार शिबीर संपन्न.
आजरा .- प्रतिनिधी.
मलिग्रे ता. आजरा येथे कै. केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालये चे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत , विशेष श्रम संस्कार शिबीर तीन दिवस संपन्न झाले .या शिबिराचे उद्घाटन मलिग्रे सरपंच शारदा गुरव याच्या हस्ते करण्यात आले
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गोकुळाच्या संचालीका व केदारी रेडेकर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अंजनाताई रेडेकर होत्या. त्यांनी श्रम संस्कार आणि आरोग्य अनुषंगाने ग्रामस्थाशी संवाद होण्यासाठी व विद्यार्थ्यांना सामाजिक भान येण्याकरिता शिबिराचे नियोजन मलिग्रे येथे केले असून, हे गाव आरोग्य सेवेकरीता दतक घेतले असल्याचे सांगितले, यावेळी मोफत आरोग्य तपासणी व हिमोग्लोबीन तपासणी, ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, महिला साठी हाळदी कुंकू, बालविवाह प्रतिबंध माहितीपट इत्यादी कार्यक्रम तसेच किशोरवयीन मुला-मुलींमध्ये होणारा रक्तक्षय या विषयी डाॅ. उदयकुमार कोळी यांचे व्याख्यान झाले. यावेळी प्राचार्य डाॅ. शिवानी गंवडे उपप्राचार्य डाॅ.पंकज विश्वकर्मा डाॅ.मानाली आंब्रे, डाॅ.अमृत इंजल, डाॅ.धनश्री कुंभार, गणेश एर॔डे, सृष्टी पेढेकर, उपसरपंच चाळू केंगारे, अशोक शिंदे, शिवाजी कागिनकर, आनंदा बुगडे, शिवाजी भगुत्रे, आपाजी बुगडे, रंजना बुगडे महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार किरण पाटील यांनी मानले.
