Homeकोंकण - ठाणेधक्कादायक.- पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं.- कमरेला लोखंडी जड वस्तू बांधून मृतदेह...

धक्कादायक.- पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं.- कमरेला लोखंडी जड वस्तू बांधून मृतदेह विहिरीत टाकला.- जिल्हा हादरला.🟥सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा फोटो आला समोर🟥लाडक्या बहिणींना जानेवारीचा हफ्ताजानेवारीच्या या तारखेला मिळणार.- महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांची माहिती

🛑धक्कादायक.- पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं.- कमरेला लोखंडी जड वस्तू बांधून मृतदेह विहिरीत टाकला.- जिल्हा हादरला.
🟥सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा फोटो आला समोर
🟥लाडक्या बहिणींना जानेवारीचा हफ्ता
जानेवारीच्या या तारखेला मिळणार.- महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांची माहिती

दापोली :- प्रतिनिधी.

आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करून आपण जणू काही केलेच नाही असं भासवणाऱ्या पत्नीनेच पतीचा आपल्या प्रियकराच्या साथीने गळा आवळून अत्यंत निर्घृण पद्धतीने खून करून मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचा धक्कादायक व संतापजनक प्रकार दापोली तालुक्यात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पती बेपत्ता झाल्याची तक्रार देणाऱ्या पत्नीवरच दापोली पोलिसांचा संशय होता त्या दिशेने तपास करून अवघ्या 48 तासातच दापोली पोलिसांना या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात मोठे यश आल आहे. केशकर्तनालयाचा व्यवसाय करणाऱ्या निलेश दत्ताराम बागकर याचा कट रचून खून झाल्याचं आता पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी नेहा बागकर व पालगड येथील एसटी चालक प्रियकर मंगेश चीजगरकर या दोघांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
🟥याबाबत अधिक माहिती अशी की, दापोली शहराजवळ गिम्हवणे येथे निलेश बागकर याचा केशकर्तनालयाचा पारंपारिक व्यवसाय आहे. मृत निलेश याची पत्नी नेहा बागकर हीच्याजवळ अनेकदा काही घरगुती कारणावरून वाद सुरू होते. आपल्या पत्नीचे बाहेर काही सुरू असल्याचा संशय निलेश व काही नातेवाईकांना होता. मात्र आपल्या वाटेत अडथळे असलेल्या पती निलेश याला संपवण्याचा कट पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने आठवड्यापूर्वीच रचला होता अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आपल्या पती बेपत्ता असल्याचा तक्रार देणाऱ्या पत्नीला पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी चौकशीला बोलावले होते. त्यावेळी या प्रकरणातील संशयित आरोपी पत्नी नेहा ही जात असलेल्या हॉटेलमधील कामाचे टाइमिंग व तिने पोलिसांना चौकशी सांगितलेले टाइमिंग यामध्ये तफावत आढळताच पोलिसांचा तिच्यावरचा संशय वाढला. यावेळी तिला पुन्हा एकदा चौकशीला बोलवण्यात आलं होतं मात्र बुधवारी पत्नी नेहा हिला पोलीस पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतलं चौकशीचा पोलिसी हिसका दाखवताच त्यावेळी तिने या खून प्रकरणाची कबुलीच पोलिसांना दिली आहे. यावेळी कारमध्ये बसलेला निलेश व त्याची पत्नी अशा स्वरूपाचं काही सीसीटीव्ही फुटेजही तपासात पोलिसांच्या हाती आले आहे.

या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी नेहा बागकर हिचा पालगड येथील एसटी चालक प्रियकर मंगेश चीजगरकर याच्या मदतीने हा खून केला आहे. मंगेश व नेहा, निलेश यांचे गेल्या दहा-बारा वर्षांपासून घरगुती संबंध होते. त्यामुळे मंगेश याच्याबरोबर कारमधून जाताना निलेशला कोणताही संशय आला नाही याच सगळ्याचा फायदा घेऊन हा कट रचण्यात आला होता अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी हर्णै येथे मयत निलेश पत्नी नेहा व मंगेश या तिघांनीही निलेश याला कारमधून पार्टीसाठी नेले होते या ठिकाणी निलेश व नेहा या दोघांनीही ड्रिंक केले व हर्णै बायपास येथे अत्यंत निर्दयीपणे निलेशाचा गळा आवळून नेहा व मंगेशने खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मंगेशला पालघर येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका विहिरीत निलेशचा मृतदेह कमरेला लोखंडी जड वस्तू बांधून टाकून देण्यात आला अशी ही कबुली नेहा बागकर हिने पोलीस तपासात दिली आहे. त्यानंतर तात्काळ पोलिसात पथकाने पालघर येथील विहिरीत गळ टाकून हा निलेश याचा मृतदेह बाहेर काढला आहे.

यावेळी नेहाचा प्रियकर संशयित मंगेश हा फरार झाला होता. त्याचा शोध दापोली पोलिसांनी काही तासात लावत दापोली एसटी डेपोतून एका बंद गाडीमध्ये बसला होता त्याला बुधवारी मध्यरात्री उशिरा पोलीस पथकाने ताब्यात घेऊन चौकशीनंतर उशिरा अटक केली आहे. दापोली पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. हत्या करणे, हत्येचा कट रचणे, पुरावा नष्ट करून मिळून गुन्हा करणे अशा स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे ,सहाय्यक निरीक्षक प्रवीण देशमुख, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली ढोले या पोलीस पथकाने या सगळ्या प्रकरणाचा अवघ्या काही तासात छडा लावला आहे. दरम्यान, पत्नी व प्रियकराने निलेश याचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

🟥सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा फोटो आला समोर

मुंबई :- प्रतिनिधी.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. चाकूने त्याच्यावर ६ वार करण्यात आले होते. त्यातील २ वार अत्यंत खोलवर असल्याची माहिती मिळत आहे. पोलीस तपास करत असताना त्यांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज आलं आहे. त्यात हल्लेखोराचा चेहरा दिसत असून, तो पायऱ्यांचा वापर करून पळ काढण्याचा प्रयत्नात दिसत आहे. संशयित हल्लेखोराचा फोटो सीसीटीव्ही फुटेजवरून घेण्यात आला असून, या फोटोच्या आधारे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सैफ अली खानवर मध्यरात्री हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. विरोधकांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवले होते. दरम्यान घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली. तपास करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या 8 टीम स्थापना करण्यात आल्या. तर मुंबई पोलिसांच्या 7 टीम तयार करण्यात आल्या. सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी एकूण 15 टीमकडून तपास करण्यात येत आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याने सैफ अली खान याच्यावर हल्ला केल्यानंतर पायऱ्यांचा वापर केला. घरातून पळून जाताना सैफवर चाकू हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपास केला. त्यात आरोपी पायऱ्यावरून उतरताना 6 व्या मजल्यावर दिसला. या फोटोवर 2 वाजून 33 मिनिटांची वेळ दिसत आहे.

पोलिस सूत्रांच्या माहिती प्रमाणे, ज्या व्यक्तीने सैफ अली खानच्या घरात चोरी करून हल्ला केला तो सराईत गुन्हेगार असू शकतो. ही घटना ज्या पद्धतीने घडली त्याची मोडस ऑपरेंडी पाहता हल्लेखोरावर यापूर्वीही असेच गुन्हे दाखल झाले असावेत. पोलिसांचा असा विश्वास आहे की, अशा प्रकारच्या घटना केवळ सराईत आरोपीच करू शकतात. आरोपी प्रभादेवी परिसरात लपला. पोलिसांना लोकेशन सापडलं. पोलीस तपास घेत आहेत. हल्ल्याच्या वेळी डम डेटाच्या आधारे आरोपीची ओळख पटली, पोलिसांना त्या भागात कोणते मोबाइल नेटवर्क सक्रिय होते याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असल्याचे समजते.

🟥लाडक्या बहिणींना जानेवारीचा हफ्ता २६ जानेवारीच्या आधी मिळणार.- महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई :- प्रतिनिधी

Oplus_0

लाडकी बहीण योजना सुरूच रहाणार असून, वाढीव रकमेबाबत येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेतला जाणार आहे. जानेवारीचा हप्ता हा 1500 रुपयांचा असणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जानेवारी २०२५ चा हफ्ता मिळण्याची तारीख सरकारने सांगितली आहे. २६ जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा १५०० रुपयांचा हफ्ता बँकेच्या खात्यामध्ये जमा होईल, अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे.

लाडक्या बहिणींना २६ जानेवारीच्या आधीच या महिन्याचा हफ्ता मिळणार असल्याचं राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलं आहे.या संबंधी माहिती देताना आदिती तटकरे म्हणाल्या की,२६ जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी ३,६९० कोटींचा निधी विभागाला मिळणार आहे. अर्थसंकल्पातही महिलांना अधिक लाभ देण्यासाठी निधीची तरतूद केली जाईल. आदिती तटकरे यांनी सांगितले की, सरकारकडून फेब्रुवारी महिन्याचेही नियोजन केले जात आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्ही २कोटी ४६लाख महिलांना दिला जात आहे. काही महिलांबाबत तक्रार आली होती. बनावट केसेस फारच कमी होत्या त्यांना लाभ देणे बंद केले जाईल. त्यामुळे योजनेत कोणता फरक पडेल असे मला वाटत नाही.
जुलै महिन्यात सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत महिलांच्या खात्यात डिसेंबरपर्यंत ६ हप्ते जमा झाले आहेत. जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार, याबद्दल काहीच माहिती समोर येत नव्हती. संक्रातीच्या मुहूर्तावर हा हप्ता जमा होणार, अशी चर्चा होती. यामुळे लाडक्या बहिणींची संक्रात गोड होणार असे बोलले जात होते. मात्र संक्रातीला महिलांच्या खात्यात पैसे आलेच नाही. आता २६ जानेवारीच्या आधी महिलांना पैसे मिळणार असल्याचे सांगितले जात असून त्यासाठी महिलांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. हा हफ्ताही मागील हफ्त्याप्रमाणे १५०० रुपयांचा असणार आहे. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये महिलांच्या सातव्या हफ्त्याचे वितरण सुरू केले जाईल, असेही अदिती तटकरे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.