Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रकृतज्ञता म्हणून 'रामकृष्ण' जलाशय नाव.- आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांचे निवेदन.

कृतज्ञता म्हणून ‘रामकृष्ण’ जलाशय नाव.- आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांचे निवेदन.

कृतज्ञता म्हणून ‘रामकृष्ण’ जलाशय नाव.- आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांचे निवेदन.
आजरा. प्रतिनिधी. ०७
आंबेओहोळ प्रकल्पग्रस्त आणि लाभार्थि शेतकरी यांनी कै. बाबासाहेब कुपेकर व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या प्रकल्पासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन जलाशयाचे नाव ‘रामकृष्ण’ जलाशय असे दिले आहे . यात श्रेयवादाचा कोणताही विषय नसून केवळ कृतज्ञता व्यक्त केली आहे . परंतु काही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या विघ्नसंतोषी व कृतघ्न मंडळीनी या जलाशयाचे नाव ‘ अश्रूसागर’ ठेवणे हास्यास्पद असल्याचे धरणग्रस्त शेतकऱ्यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे .
या प्रकल्पाचा दुरान्वयेही संबंध नसणाऱ्या काही मंडळींच्या पुढाकाराने काहीजण प्रकल्पाचे काम थांबावे म्हणून कोर्टात गेले आहेत . मात्र प्रकल्पात पाणीसाठा झाल्याने या मंडळींना पोटशूळ सुटला आहे . शिवाय धरणाला विरोधाच्या निमित्ताने चालणारी दुकानदारीही आता बंद होण्याची भिती या मंडळींच्या मनात आहे .
आमच्या मात्र जमिनी गेल्या आहेत . परंतु उर्वरीत आणि भागातील पीण्याचा आणि जमिनीच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार असल्याने आम्हाला आनंद झाला आहे . आमच्या ज्या बांधवांचे पुनर्वसन अद्याप रेंगाळले आहे त्यात भाऊबंदकी, कागदपत्रांची अपूर्णता व अन्य कारणे असून त्यांचाही प्रश्न सुटण्यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे . त्याचाच एक भाग म्हणून मंत्री मुश्रीफ दरमहा आढावा बैठक घेत असून लवकरच हा प्रश्नही मार्गी लागेल याची आम्हाला खात्री आहे . निवेदनावर वडकशिवाले येथील शिवाजी पाटील, रघुनाथ पाटील, गणपती लोखंडे, राजेश पाटील यांच्या सह्या आहेत .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.