कै. केदारी रेडेकर धर्मादाय रूग्णालयामार्फत ग्रामीण भागातील गरजू रूग्णांना.- मोफत आरोग्य रथाची सोय केली
( मलिग्रे येथे आरोग्य रथाचे उदघाटन. )
आजरा.- प्रतिनिधी.
कै. केदारी रेडेकर धर्मादाय रूग्णालयामार्फत ग्रामीण भागातील गरजू रूग्णांना गडहिंग्लज येथील हाॅस्पिटल येणे जाणे करीता मोफत आरोग्य रथाची सोय केली असलेचे या उदघाटन प्रसंगी गोकुळ दुध संघाच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी व्यक्त केले. आरोग्य रथाचे उदघाटन मलिग्रे सरपंच शारदा गुरव यानी केले. यावेळी श्रीमती रेडेकर यांनी आजरा पूर्व भागातील कोळिंद्रे, कागिनवाडी, मलिग्रे, कानोली, सरबंळवाडी, हारूर, गजरगाव, इंचनाळ मार्गे दर गुरूवार या भागातील रूग्णांना मोफत ने आण करण्यासाठी आरोग्य रथाची सोय केली तसेच कै.केदारी रेडेकर हाॅस्पिटल मार्फत अल्प दरात व शासकीय योजना उपलब्ध असून, गरजू रूग्णांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. यावेळी माझी सरपंच समिर पारदे, गजानन देशपांडे, दत्ता परिट, उपसरपंच चाळू केंगारे, आनंदा बुगडे, पत संस्था चेअरमन केशव बुगडे, विश्वास बुगडे, शिवाजी भगुत्रे, अक्षय कांबळे, बाळू कांबळे, विनायक पाटील यांचे सह मलिग्रे ग्रामस्थ उपस्थित होते आभार माझी सरपंच अशोक शिंदे यांनी मानले.
या आरोग्य रथाची सुरूवात कोळिद्रे येथून केली असून प्रत्येक गावा गावात या रथाचे उदघाटन व स्वागत करण्यात आले.