🟥सैफ अली खानवर सहा वार.
मानेला, मणक्याला दुखापत.
( सैफवर लिलावती रूग्णालयात शस्त्रक्रिया.)
मुंबई :- प्रतिनिधी.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. गुरुवारी मध्यरात्री सैफ अली खानच्या वांद्रा येथील बंगल्यावर हा संपूर्ण थरार घडला. चोरीच्या उद्देशाने आलेल्या हल्लेखोराने सैफवर सहा वार केल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर त्याला तात्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्याच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला आहे. सैफ वांद्रे येथील सतगुरु शरण येथे राहतो. पहाटे 3 वाजताच्या सुमारास एक चोर त्याच्या घरात घुसला. चोरट्यांनी प्रथम घरातील मोलकरणीवर हल्ला केला. मोलकरीण आणि हल्लेखोर यांच्यातील वाद ऐकून सैफ त्याच्या खोलीतून बाहेर आला. त्यानंतर हल्लेखोराने त्याच्यावर हल्ला केला. सैफ अली खानवर सहा वेळा चाकूने वार करण्यात आले, त्यापैकी दोन खोलवर होते. हल्ल्यानंतर सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाने त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. या हल्ल्यात सैफ अली खानच्या मानेला, डाव्या मनगटाला आणि छातीला दुखापत झाली आहे. चाकूचा एक छोटासा भाग अभिनेत्याच्या मणक्यालाही लागला आहे. पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यामुळे ऑपरेशन आवश्यक होते.
न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन डॉ. लीना जैन, भूलतज्ज्ञ डॉ. निशा गांधी, डॉ. उत्तममणी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या एका टीमने ही शस्त्रक्रिया केली. याबाबत आता अभिनेत्री करीना कपूरकडूनही अधिकृत माहिती देण्यात आली आहे. काल रात्री सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या घरी घरफोडीचा प्रयत्न झाला. सैफच्या हाताला दुखापत झाली असून त्यासाठी तो रुग्णालयात आहे, त्याच्यावर प्रक्रिया सुरू आहे. बाकीचे कुटुंब सुरक्षित आहे. आम्ही मीडिया आणि चाहत्यांना धीर धरण्याची विनंती करतो आणि पोलिस आधीच त्यांची योग्य चौकशी करत असल्याने आणखी कोणत्याही प्रकारचा अंदाज लावू नये. तुमच्या काळजीबद्दल सर्वांचे आभार, असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.
🛑नेमकं रात्री काय घडलं?
🔺रात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला
🔺मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सैफ अली खान याच्या वांद्रे पश्चिमेकडून सद्गुरू सरण या इमारतीतील घरात बुधवारी रात्री एक चोर शिरला होता.
🔺चोराला पाहून सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड सुरू केला.
🔺त्यावेळी सैफ अली खानला जाग आली.
🔺खोलीतून बाहेर आल्यानंतर सैफ अली खान आणि चोर आमनेसामने आले.
🔺यावेळी पकडलं जाण्याच्या भीतीनं चोराने त्याच्याकडील चाकूने सैफ अली खानवर सपासप वार केले.
🔺मुंबई पोलिसांनी या घटनेची गंभीरतेनं दखल घेतली असून चोराला शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथक कामाला लागलं आहे.
लीलावती रुग्णालयाचे सीईओ निरज उत्तमानी म्हणाले, सैफ अली खानला पहाटे 3-30 वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आले. त्याला सहा जखमा असून त्यापैकी दोन खोल आहेत. एक जखम त्याच्या मणक्याच्या जवळ आहे. आम्ही त्याच्यावर ऑपरेशन करत आहोत. न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन भूलतज्ज्ञ निशा गांधी यांच्याकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतरच नुकसान किती आहे हे सांगता येईल.