Homeकोंकण - ठाणेसुरक्षित प्रवासासाठी केंद्राचा मोठा निर्णय!.- नितीन गडकरींनी उघडली सरकारची तिजोरी.- अपघातग्रस्तांची मदत...

सुरक्षित प्रवासासाठी केंद्राचा मोठा निर्णय!.- नितीन गडकरींनी उघडली सरकारची तिजोरी.- अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्यांना २५ हजार रूपयांचे बक्षीस!..🟥मोस्ट वाँटेड खलिस्तानवाद्याला चंद्रपुरातून अटक.- अमृतसर येथील पोलीस चौकीवर ‘हँडग्रेनेड’…

🛑सुरक्षित प्रवासासाठी केंद्राचा मोठा निर्णय!.- नितीन गडकरींनी उघडली सरकारची तिजोरी.- अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्यांना २५ हजार रूपयांचे बक्षीस!..
🟥मोस्ट वाँटेड खलिस्तानवाद्याला चंद्रपुरातून अटक.- अमृतसर येथील पोलीस चौकीवर ‘हँडग्रेनेड’…

नवी दिल्ली :- वृत्तसंस्था

रस्त्यावर एखादा अपघात झाल्यास इतर वाहनचालक तो अपघात पाहूनही तिथे न थांबता आपल्या मार्गाने निघून जातात. बरेचजण आपला वेळ जाईल म्हणून तिथे थांबून अपघातग्रस्तांची मदत करत नाहीत. तर काहीजण पोलिसांना देखील अपघाताची माहिती देत नाहीत. पोलीस आपल्याकडे चौकशी करत बसतील, त्याचा मनःस्ताप सहन करावा लागेल, पोलीस आपल्यालाच या अपघातात अडकवतील या भितीने लोक अपघातग्रस्तांची मदत करणं टाळतात. लोकांची ही सवय बदलण्यासाठी आणि त्यांना माणुसकी दाखवत अपघातग्रस्तांची मदत करायला प्रवृत्त करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोणीही अपघातग्रस्तांची मदत केली तर केंद्र सरकार त्यांना आता २५ हजार रुपये बक्षीस म्हणून देणार आहे. देशात सुरक्षित प्रवासाला चालना मिळावी आणि अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळून त्यांचे प्राण वाचवता यावेत यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात नेणाऱ्या लोकांसाठी सरकार बक्षिसाची रक्कम २५ हजार रुपये करणार आहे. सध्या ही रक्कम पाच हजार रुपये इतकी आहे. म्हणजेच बक्षिसाची रक्कम पाच पटींनी वाढवली जाणार आहे”.

🟥नितीन गडकरी काय म्हणाले?

रस्ते सुरक्षेबाबत बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांच्याबरोबर एका टीव्हीवरील कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, “मी रस्ते वाहतूक मंत्रालयाला बक्षिसाची रक्कम वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. आत्ता देखील अशा प्रकारचं बक्षीस दिलं जात आहे. परंतु, त्या बक्षिसाची रक्कम खूप कमी आहे.अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीला ५ हजार रुपये बक्षीस म्हणून दिले जातात. मात्र मी बक्षिसाची रक्कम वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. रस्त्यावर कोणीही एखादा अपघात पाहिला तर एका तासाच्या आत अपघातग्रस्ताला रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीला हे बक्षीस दिलं जाईल.

🛑लोक अपघातग्रस्तांची मदत का करत नाहीत?

बऱ्याचदा हिट अँड रन प्रकरणांमध्ये पोलिसांना साक्षीदार सापडत नाहीत. अशा स्थितीत ज्या व्यक्तीने पोलिसांना या अपघाताची माहिती दिलेली असते त्या व्यक्तीलाच साक्षीदार बनवण्याचा प्रयत्न केला जातो. रस्ते अपघातामधील पीडितांना मदत करणारे पोलिसांच्या कायदेशीर कार्यवाहीचा भाग बनतात. त्यात त्यांचा खूप वेळ जातो, तसेच त्यांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे अनेकजण पोलिसांना अपघातांची माहिती देणं टाळतात. काही घटनांमध्ये अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्या व्यक्तीला या अपघात प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन साक्षीदार बनवण्याचा प्रयत्न केला जातो.

🟥मोस्ट वाँटेड खलिस्तानवाद्याला चंद्रपुरातून अटक.- अमृतसर येथील पोलीस चौकीवर ‘हँडग्रेनेड’…

चंद्रपूर – प्रतिनिधी.

अमृतसर येथील पोलीस चौकीवर ‘हँडग्रेनेड’ फेकणाऱ्या खलिस्तानवाद्याला गुप्तचर यंत्रणेने चंद्रपूर येथून अटक केली. स्थानिक पोलीस आणि गुप्तचर यंत्रणेने संयुक्तरित्या ही कारवाई केली. जसप्रीत सिंग (२०) असे या खलिस्तानवाद्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी अत्यंत गुप्तपणे ही कारवाई करण्यात आली. यानंतर आरोपीला पंजाब पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिली.
🔴जसप्रीत सिंगने २०२३ मध्ये अमृतसर येथील पोलीस चौकीवर हल्ला केला होता. अमली पदार्थांच्या व्यवसायातही तो सक्रिय होता. पोलीस चौकीवरील हल्ल्यानंतर तो पसार झाला. तेव्हापासून पंजाब पोलीस त्याच्या मागावर होते. सहा दिवसांपूर्वी तो महाराष्ट्रात दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जसप्रीत सिंग चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथे आला होता. येथील लॉयड मेटल कंपनी परिसरात तो अन्य ओळखीच्या व्यक्तींसोबत राहात होता. येथूनच गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने त्याला अटक केली.
🅾️जिल्ह्यात सिमेंट, पोलाद, पेपर मिल, आयुध निर्माण कारखाना तसेच वीज केंद्र व इतरही मोठे उद्योग आहेत. या उद्योगात परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने येत आहेत. या कामगारांमध्ये गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असलेल्या कामगारांचा देखील मोठ्या संख्येने समावेश आहे. अशा स्वरूपाचे गुन्हेगारी कामगार येथे येत असल्याने जिल्ह्यातील गुन्हेगरी वाढल्याचा आरोप होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.