Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमुंबईपासून नागपूरपर्यंत महापालिका निवडणुका शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार.- संजय राऊतांची मोठी...

मुंबईपासून नागपूरपर्यंत महापालिका निवडणुका शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार.- संजय राऊतांची मोठी घोषणा. ( महाविकास आघाडीत महाफूट? होण्याची शक्यता.)🛑वाळू माफियांची मुजोरी.- पकडलेला वाळूचा ट्रकात जाताना.- तलाठी व कोतवालास धावत्या ट्रकमधून दिले फेकून. – तलाठ्यास चिरडण्याचा प्रयत्न

🟥मुंबईपासून नागपूरपर्यंत महापालिका निवडणुका शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार.- संजय राऊतांची मोठी घोषणा. ( महाविकास आघाडीत महाफूट? होण्याची शक्यता.)
🛑वाळू माफियांची मुजोरी.- पकडलेला वाळूचा ट्रकात जाताना.- तलाठी व कोतवालास धावत्या ट्रकमधून दिले फेकून. – तलाठ्यास चिरडण्याचा प्रयत्न

मुंबई :- प्रतिनिधी.

महाराष्ट्रातील लोकसभा, विधानसभा निवडणुका काही महिन्यांपूर्वी पार पडल्या. या निवडणुकीनंतर आता महापालिकेची निवडणूक कधी होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्या राज्यातील सर्वच पक्षांकडून महापालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यातच आता ठाकरे गटाकडून आगामी महापालिकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या महापालिका निवडणुका आम्ही स्वबळावर लढू, अशी मोठी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज केली आहे.

🔴संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महापालिकेच्या निवडणुकांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट पण स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. मुंबईपासून नागपूरपर्यंत महापालिका आम्ही स्वबळावर लढणार, अशी मोठी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला पाहायचंच आहे, असे संजय राऊत म्हणाले.

मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल. एकदा आम्हाला पाहायचंच आहे. नागपूरलाही आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिले आहेत. आताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता असं आमचं ठरतंय की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. आघाडीमध्ये लोकसभा, विधानसभेत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला किंबहुना पक्षाच्या वाढीला बसतो. महापालिका, जिल्हापरिषद आणि नगरपंचायतीत स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावेत, असे संजय राऊत म्हणाले.

🛑वाळू माफियांची मुजोरी.-
बुलढाण्यात पकडलेला वाळूचा ट्रक घेऊन जात असताना तलाठी व कोतवालास धावत्या ट्रकमधून दिले फेकून. – तलाठ्यास चिरडण्याचा प्रयत्न

बुलढाणा :- प्रतिनिधी.

मागिल काही दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगावराजा तालुक्यातील महसूल विभागाच्या आशीर्वादाने खडकपूर्णा नदी पात्रातून अवैध रेती उपसा आणि वाहतूक जोमाने सुरू आहे. दरम्यान देऊळगावराजाचे तलाठ्याने अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर कारवाईसाठी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याला चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला.तर दुसऱ्या घटनेत पकडलेला वाळूचा ट्रक घेऊन जात असताना तलाठी व कोतवालास धावत्या ट्रकमधून फेकून दिल्याची घटना घडली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुका हा अवैध वाळू तस्करांचे केंद्रबिंदू म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. महसूल विभागाच्या आशीर्वादाने वाळू उपसा सुरु असल्याचे बोलले जात आहे. मात्र बुलढाणा जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीला लगाम लावण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मोठी पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील महसूल प्रशासनाला अवैध रेती वाहतूकदारांवर कदम कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

🔴तलाठ्याने पकडला वाळूचा डंपर

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार काल सायंकाळी नांदुरा शहराजवळ नांदुरा तहसीलचे तलाठी नितीन म्हस्के व कर्मचारी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई करण्यासाठी थांबले. यात एक अवैध रेतीचा डंपर त्यांनी थांबवला. यानंतर चालकास कागदपत्रे विचारले असता त्याकडे काही आढळले नाही. म्हणून सदर तलाठी व कोतवाल अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये बसले व ट्रक सरळ तहसील कार्यालयात घेऊन जाण्याचे चालकाला सांगितले.

🟥तलाठी, कोतवालास ट्रकमधून फेकले

मात्र चालकाने त्यांना शिवीगाळ करत ट्रक भरधाव मलकापूरकडे घेतला. यानंतर धावत्या ट्रकच्या केबिनमधूनच तलाठी व कोतवालास लाथ मारून ट्रक खाली ढकलले. यात कोतवाल व तलाठी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी गंभीर कलमान्वये ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. अद्याप ट्रक चालक फरार आहे. यामुळे मात्र बुलढाणा जिल्ह्यात रेतीमाफी यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.

🔴तलाठयांस चिरडण्याचा प्रयत्न

देऊळगावराजा तालुका हा अवैध वाळू तस्करांचे केंद्रबिंदू म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. मात्र स्थानिक महसूल विभागाच्या आशीर्वादाने सुरू असलेली रेती माफियागिरी आज त्यांच्याच विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर उठल्याचे पाहण्यास मिळाले. देऊळगावराजाचे तलाठी परमेश्वर बुरकुल यांनी अवैध रेती वाहतूक करणारा डंपर कारवाईसाठी अडविण्याचा प्रयत्न केला असता डंपर चालकाने भरधाव असलेला डंपर त्यांच्या अंगावर घालून चिरडण्याचा प्रयत्न केला. परंतु, बुरकुल यांनी बाजूला उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला असला तरी त्यांना जबर मार लागला असून मेंदूला मार बसला आहे. त्यांच्यावर सध्या जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.