Homeकोंकण - ठाणेनितेश राणेंचं आदित्य ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य शिवसैनिकांनी जोरदार राडा घालताच शब्द मागे.

नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य शिवसैनिकांनी जोरदार राडा घालताच शब्द मागे.

नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य शिवसैनिकांनी जोरदार राडा घालताच शब्द मागे

मुंबई. प्रतिनिधी.०७

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर बोलताना भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांचा तोल गेला. काल विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भरविण्यात आलेल्या प्रतिविधानसभेत बोलताना आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचे वंशज आहेत का? यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल, असं वादग्रस्त आणि आक्षेपाचे वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. त्यानंतर मुंबईत शिवसैनिकांनी जोरदार राडा केला. आता त्यानंतर नितेश राणे यांच्याकडून ‘भावना दुखावल्या असल्यास शब्द मागे घेतो’ असं ट्विट करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भारतीय जनता पक्षाच्या 12 राडेबाज आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. या निलंबनाच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कोणत्याही कामकाजात भारतीय जनता पक्ष आमदारांनी सहभाग घेतला नाही. विधानसभेच्या पायऱ्यांवर बसूनच भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला. यावेळी भारतीय जनता पक्षाने प्रतिविधानसभा भरवली होती. इथेच भाषण करत असताना आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर अत्यंत खालच्या पातळीवर आक्षेपार्ह टीका केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.