आजरा पोलिस वसाहतीची
दुरावस्था.- निषेधार्थ ८ रोजी आंदोलन.- आजरा मनसे.
आजरा.प्रतिनिधी.०६
आजरा येथील पोलिस वसाहतीची दुरावस्थे बाबत सध्या पावसाळा सुरु असून पावसाळ्यात पोलिस वसाहतीत पाण्याची गळती, आरोग्यास धोकादायक असा परिसर या वसाहतीची तात्काळ डागडुजी करावी अन्यथा आजरा मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल अशा अशायाचे निवेदन उप. अभियंता बांधकाम विभाग याना देण्यात आले होते. या अनुषंगाने अद्याप बांधकाम विभागाने कोणतेही पाऊल उचलले नसल्याने आजरा मनसे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत दि.८/७/२०२१ रोजी सकाळी ११ वा. प्रशासनाच्या कामकाजाच्या निषेधार्थ जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजरा तालुका यांच्या वतीने उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आजरा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर मनसे ता.अध्यक्ष अनिल निऊगरे, ता. सचिव चंद्रकांत सांबरेकर यांच्या सह्या आहेत.
