Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रवसंतराव देसाई आजरा शेत. सह. साखर कारखाना लि, अमुतनगर-गवसे.(💥 स्व. वसंतराव देसाई...

वसंतराव देसाई आजरा शेत. सह. साखर कारखाना लि, अमुतनगर-गवसे.(💥 स्व. वसंतराव देसाई यांच्या पुण्यतिथी निमित्य कारखाना कार्यस्थळावर अभिवादन !)🛑शिवाजी विद्यापीठ व आजरा महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने संघाच्या नेटबॉल स्पर्धेचे उद्घाटन संपन्न.

🛑वसंतराव देसाई आजरा शेत. सह. साखर कारखाना लि, अमुतनगर-गवसे.
(💥 स्व. वसंतराव देसाई यांच्या पुण्यतिथी निमित्य कारखाना कार्यस्थळावर अभिवादन !)
🛑शिवाजी विद्यापीठ व आजरा महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने संघाच्या नेटबॉल स्पर्धेचे उद्घाटन संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा साखर कारखान्याचे संस्थापक स्व. वसंतराव देसाई, माजी आमदार यांना आज त्यांच्या १९ व्या पुण्यतिथी दिनी कारखाना कार्यस्थळावरील त्यांचे पुर्णाकृती पुतळयाचे कारखान्याचे अध्यक्ष मा.श्री. वसंतराव धुरे यांचे हस्ते पुजन करून कारखाना परिवारा तर्फे अभिवादन करणेत आले.

सन १९८० व १९९० च्या दशकात स्वर्गीय वसंतराव देसाई यांनी आपल्या निस्वार्थी सहका-यां समवेत अथक प्रयत्न करून आजरा साखर कारखाना पुर्णत्वास आणला, आजरा तालुक्यातील गोरगरीब शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार तसेच तोडणी-वहातुक कंत्राटदार मजुर यांच्यासाठी तसेच तालुक्याच्या विकासासाठी आजरा साखर कारखाना वरदान ठरला आहे. स्व. वसंतराव देसाई यांचे या कारखान्याच्या उभारणीतील योगदान तालुक्यातील जनतेच्या कायम स्मरणात रहावे यासाठी कारखाना व्यवस्थापणाने कारखाना कार्यस्थळावर त्यांचा पुर्णकृती पुतळा उभारला असून, वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना असे नांव दिलेले आहे.

दि. २६ रोजी त्यांच्या १९ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्य सकाळ पासून कारखान्याचे व्हा. चेअरमन, एम. के. देसाई, जेष्ठ संचालक मुकुदराव देसाई, संचालक श्री. गोविंद पाटील, राजेश जोशिलकर, संभाजी पाटील, रशिद पठाण, नामदेव नार्वेकर, दिगंबर देसाई, व अन्य मान्यवर संचालक प्र. कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती, तसेच कामगार संघटनेचे अध्यक्ष धनाजी किल्लेदार व कारखान्याचे खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, युनियन पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

🛑शिवाजी विद्यापीठ व आजरा महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने संघाच्या नेटबॉल स्पर्धेचे उद्घाटन संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

शिवाजी विद्यापीठ व आजरा महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने दि.२३ ते २५ डिसेंबर २०२४ दरम्यान शिवाजी विदयापीठ येथे आयोजित केलेल्या पुरुष व महिला संघाच्या नेटबॉल स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले स्पर्धा उद्घाटन प्रसंगी सिद्धार्थ शिंदे, सदस्य, शिवाजी विद्यापीठ अधिसभा, ॲडव्होकेट, स्वागत परुळेकर सदस्य, शिवाजी विद्यापीठ अधिसभा, डॉ. शरद बनसोडे, संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग शिवाजी विद्यापीठ, योगेश पाटील, कार्यालयीन अधीक्षक महाविद्यालय,आजरा यांच्या हस्ते पार पडला. यावेळी डॉ. धनंजय पाटील, शारीरिक शिक्षण संचालक आजरा महाविद्यालय, मा. एम एस पाटील, पर्यवेक्षक आजरा महाविद्यालया आजरा, अल्बर्ट फर्नांडिस, क्रीडा शिक्षक,आजरा महाविद्यालय आजरा, सांगली, सातारा, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यातील विविध महाविद्यालय चे २५० हुन अधिक पुरुष व महिला खेळाडू,क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक,पंच गौरव खामकर, सुशांत,संकेत गायकवाड आदी उपस्थित होते.

Oplus_131072

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.