मडिलगे ग्रामपंचायतच्या वतीने उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील मडिलगे येथील ग्रामपंचायत वतीने गावातील अनेक तरुण – तरुणींनी शैक्षणिक व अन्य क्षेत्रात उज्वल यश संपादन करत आपली यशाची पायरी अखेर निश्चित केली. याबद्दल ग्रामपंचायत मडिलगे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सरपंच बापू निऊगरे होते. यावेळी सरपंच श्री निऊगरे बोलताना म्हणाले मडिलगे गावातील अनेक तरुण व तरुणीं यांनी आपल्या क्षेत्रात उज्वल यश संपादक करत अखेर उंच भरारी घेतली आहे. हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतर विद्यार्थी यांनी आपल्या क्षेत्रात उंच भरारी घ्यावी. शालेय शैक्षणिक जीवनात कोणती अडचण आल्यास ग्रामपंचायत त्यांच्याशी संपर्क करावा. मी आपल्याला शैक्षणिक मदत व अर्थसहाय्य करू परंतु आपण मनःपूर्वक अभ्यासावर लक्ष देऊन यशाची वाटचाल कायम ठेवावी. असे बोलताना म्हणाले यावेळी माजी सभापती भिकाजी गुरव, माजी उपसभापती दिपक देसाई, माजी सरपंच शिवाजी गुरव, यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
यावेळी ज्ञानेश्वरी सुतार ( मुरकुटे ) यांची आरोग्य सेविका, परिवाहन मंडळ चालक अंकुश आयवाळे, तसेच देश सेवेत कु. शामल देसाई, तृशाली येसणे यांची निवड झाली. या सत्कार समारंभ कार्यक्रमाला सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थेचे पदाधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायत सदस्य सुशांत गुरव यांनी आभार मानले.

