Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रझेप अॅकॅडमी 'या अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या आजरा शाखेचे उद्घाटन...

झेप अॅकॅडमी ‘या अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या आजरा शाखेचे उद्घाटन मंगळवार २४ डिसेंबर रोजी होणार उत्साहात संपन्न.

झेप अॅकॅडमी ‘या अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या आजरा शाखेचे उद्घाटन मंगळवार २४ डिसेंबर रोजी होणार उत्साहात संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

गडहिग्लज येथील ‘ज्ञानदीप प्रबोधिनी ‘च्या वतीने चालवण्यात येणाऱ्या ‘झेप अॅकॅडमी ‘या अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या आजरा शाखेचे उद्घाटन मंगळवार दिनांक २४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला असणारे गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड हे डोंगराळ व दुर्गम तालुके विकासाच्या बाबतीत नेहमीच वंचित राहीले या भागातील जनतेला विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आधार देण्यासाठी तसेच त्यांचे सामाजिक,
गडहिग्लज येथील ‘ज्ञानदीप प्रबोधिनी ‘च्या वतीने चालवण्यात येणाऱ्या ‘झेप अॅकॅडमी ‘ या अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या आजरा शाखेचे उद्घाटन मंगळवार दिनांक २४ डिसेंबर रोजी होणार आहे.‌

Oplus_131072

कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला असणारे गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड हे डोंगराळ व दुर्गम तालुके विकासाच्या बाबतीत नेहमीच वंचित राहीले आहेत. या भागातील जनतेला विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आधार देण्यासाठी तसेच त्यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रबोधन करण्याच्या उद्देशाने ०३ नोव्हेंबर, २०१७ रोजी समविचारी मंडळींनी एकत्र येवुन ज्ञानदीप प्रबोधिनी या संस्थेची स्थापना केली. या ट्रस्टमार्फत गडहिग्लज येथे झेप अॅकॅडमी ही अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु केले आहे. या अॅकॅडमीची आजरा शहरात मंगळवार दि. २४ डिसेंबर २०२४ रोजी विदेश मंत्रालयाचे माजी राजदुत व सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे, यांच्या शुभहस्ते शाखा सुरु होत आहे. याप्रसंगी जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक चराटी, आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, आजरा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम.एल. चौगुले यांनी सांगितले

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडेही गुणवत्ता आहे. केवळ योग्य मार्गदर्शन आणि शैक्षणिक सुविधांचा अभाव असल्यामुळे ग्रामीण विद्यार्थी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी आम्ही ज्ञानदीप प्रबोधिनी संचलित झेप अकॅडमी सुरु केली. कोल्हापूर, पुणे सारख्या मोठ्या शहरातील संस्थांमध्ये ज्या सुविधा दिल्या जातात. त्या धर्तीवर किंबहुना त्याहून अधिक चांगल्या सुविधा आम्ही उपलब्ध करुन दिल्या आहेत. समाजातील गरीब होतकरु विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. दैनंदीन अध्यापनासह वेळोवेळी तज्ञ मार्गदर्शक, यशस्वी प्रशासकीय अधिकारी यांची व्याख्याने आयोजित केली जातात. एकुण १०० विद्यार्थी आमच्या सुसज्ज अभ्यासिकेचा लाभ घेत आहेत.
गेल्या ७ वर्षात ग्रामीण भागातील ४५ विद्यार्थी प्रशासकीय सेवेत रुजु झाले आहेत. शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कर्तव्य भावनेने गुणवंतांचा गौरव, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम, रस्ते बांधकाम कामगारांना दिवाळी फराळ वाटप, रक्तदा शिबीर, थोर महात्म्यांच्या जयंती, पुण्यतिथी कार्यक्रमाचे
आयोजन व वैचारीक प्रबोधन असे विविध उपक्रमराबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. संस्थेचे हे सर्व उपक्रम राबविण्यासाठी समाजातील अनेक दानशुरांकडुन रुपये ६५ लाखाहून अधिक देणगी मिळाली आहे. त्यांच्या सहकार्यातून या संस्थेचे रोपटे विस्तारत आहे. सर्व हितचिंतकांचा विश्वास आणि मार्गदर्शन यामुळेच संस्थेने यशस्वी वाटचाल करुन समाजात वेगळे स्थान निर्माण केले आहे. असेही चौगुले यांनी यावेळी स्पष्ट केले.

Oplus_131072

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.