🛑स्वच्छतागृह.. महिला व पुरुष.- उद्घाटनचा मुहूर्त सापडेना.- नागरिकांची होते कुचंबांना.
( आजरा नगरपंचायतने तहसील कार्यालयाच्या शेजारी बंद असलेले स्वच्छतागृह सुरू करावे.- नागरिकांची मागणी. )
🛑झूलपेवाडीत लेफ्टनंट पदी निवड, व सेवानिवृत्त निमित्ताने भव्य मिरवणूक.
( मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे भावेश्वरी आजी-माजी सैनिक पोलीस सशस्त्र कल्याणकारी मंडळाचे आवाहन.)
आजरा.- प्रतिनिधी
आजरा तहसीलदार कार्यालयाच्या शेजारी स्वच्छतागृह हे अस्वच्छता व दुर्गंधी होत असल्याने बंद केले. व प्रशासकीय इमारतीत स्वच्छतागृह असल्याने या ठिकाणी असलेले स्वच्छतागृह बंद झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू झाले. परंतु या परिसरात तहसील कार्यालय, पंचायत समिती भूमी अभिलेख अशी अन्य कार्यालय आहेत. आजूबाजूला अनेक महा.ई सेवा केंद्र एकंदरीत तालुक्यातील वेगवेगळ्या कारभार व आपली शासकीय कामे करून घेण्यासाठी ग्रामीण भागातून अनेक नागरिक येत असतात. या ठिकाणी स्वच्छतागृह राष्ट्रीय महामार्ग किंवा आजरा नगरपंचायतने केलेले नसून तहसीलदार कार्यापासून संभाजी महाराज चौकात असलेल्या स्वच्छतागृहात नागरिकांना जावं लागतं. याचा विचार करून आजरा नगरपंचायत नाही. स्वच्छ सर्वेक्षण आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाखाली तहसील कार्यालयाच्या व संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला रस्त्याच्या कडेला रेडीमेड स्वच्छतागृह उभा केले आहे. परंतु अनेक दिवसांपासून त्या स्वच्छतागृहाचा दरवाजा च उघडला नाही. अर्थातच अजून हे स्वच्छतागृह बंदच आहे. याचा उद्घाटन सोहळा कधी होणार. या प्रतीक्षेत नागरिक आहेत. आजरा नगरपंचायतने नागरिकांच्या अडचणीचा विचार करून लवकरच तहसील कार्यालयाच्या बाजूला बंद अवस्थेत ठेवलेले स्वच्छतागृह चालू करून नागरिकांची सोय करावी अशी मागणी आजरा तालुक्यातील नागरिक व येथील दुकानदार व्यापारी अन्य व्यावसायिक यांच्याकडून होत आहे. किमान हे स्वच्छतागृह चालू ठेवायचे नाही आहे तर कशासाठी या ठिकाणी ठेवले आहे. याचा तरी किमान खुलासा करावा.
🛑झूलपेवाडीत लेफ्टनंट पदी निवड, व सेवानिवृत्त निमित्ताने भव्य मिरवणूक.
( मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे भावेश्वरी आजी-माजी सैनिक पोलीस सशस्त्र कल्याणकारी मंडळाचे आवाहन.)
आजरा.- प्रतिनिधी.
तालुक्यातील झुलपेवाडी येथील भावेश्वरी आजी माजी सैनिक पोलिस व इतर सशस्त्र दल कल्याणकारी संस्था झुलपेवाडी यांच्यावतीने सेवानिवृत्त व लेफ्टनंट पदी निवड झाल्याबद्दल भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी झुलपेवाडी गावातील तसेच पंचक्रोशी तालुक्यातील सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी सैनिक पोलीस मित्र, विविध सेवा संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि गावचे सर्व ग्रामस्थ रविवार दि. २२ /१२/२०२४ रोजी सायं ७ वा गावातील पंढरीनाथ मारुती पावले हे २८ वर्षे भारत देशाची प्रामाणिक पणे सेवा करून सुखरूप घरी परतले आणि आपल्याच गावातील शुभम विठ्ठल पावले हे आपल्या पहिल्याच प्रयत्नात इंडियन आर्मी मध्ये लेफ्टनंट या पदावर रूजू झाले . आणि गावात पहिल्यांदाच अधिकारी होण्याचा मान मिळवला याबद्दल या दोघांचीही भव्य मिरवणूक आणि सत्कार समारंभ साने गुरुजी वाचनालयाच्या स्टेजवर आयोजित केला आहे. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे अशी अपेक्षा आमच्या संस्थेच्या मार्फत करत आहेत. या भव्य मिरवणूक कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.