🛑भारतीय राज्यघटनेच्या प्रतीकृतीची” विटंबना करणाऱ्यांच्यावर कारवाई करा. ( संविधान संवर्धन चळवळ व पुरोगामी पक्ष ,संघटना,संस्था यांची मागणी.)
🛑सुरेखा कुडाळकर अपघातात मयत प्रकरणी एकावर गुन्हा दाखल..
आजरा.- प्रतिनिधी

आजरा येथे संविधान संवर्धन चळवळ व पुरोगामी पक्ष संघटना संस्था व्यक्ती यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील “भारतीय राज्यघटनेच्या प्रतीकृतीची” विटंबना करून, तोडफोड करण्यात आली. तो इसम परभणी तालुक्यातील मिर्झापुर या गावचा रहिवाशी असुन ती व्यक्ती खेडुत स्वभावाचा असुन, वरील प्रकारचे कृत्य करण्यासाठी त्या व्यक्तीस कोणी भाग पाडले? या सर्व घटनेमागे फार मोठे षडयंत्र असून, ज्या संघटना, संस्था व व्यक्ती संविधानाला मानत नाहीत, भारतीय राज्यघटनेचा वारंवार अपमान करतात, भारतीय राज्यघटनेचा मूळ ढाचा बदलून धार्मिक ढाचा बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशा सर्व संघटना, संस्था व व्यक्ती यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करायला हवा आहे. अशी भूमिका मांडली आहे.
चौकट.
निवेदनातील प्रमुख मागण्या.
१)दि.१० रोजी सायंकाळी ५ च्या दरम्यान, परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील (Constitution replica) “भारतीय राज्यघटनेच्या प्रतीकृती” ची विटंबना करुन तोडफोड करणाऱ्या इसमा विरूद्ध आणि अशा घटना करायला लावणाऱ्या व षडयंत्र करणाऱ्या यंत्रणेचा सुत्रधार शोधण्यासाठी “केंद्रीय अन्वेशन विभाग” यांच्या तर्फे तपास करून योग्य ती जलदगतीने कारवाई व कार्यवाही ताबडतोब करणेबाबत…
२) ज्या संघटना, संस्था व व्यक्ती संविधानाला मानत नाहीत. भारतीय राज्यघटनेचा वारंवार अपमान करतात. भारतीय राज्यघटनाचा मूळ ढाचा बदलून धार्मिक ढाच्या बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा सर्व संघटना, संस्था व व्यक्ती यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा.
३)संविधानाच्या प्रस्ताविकेच्या प्रतिकृतीची सन्मानाने उभारणी करून. त्याची संरक्षणाची जबाबदारी परभणी प्रशासनाने घेतली पाहिजे.
४) आरोपींवर देशद्रोह व राष्ट्र प्रतिष्ठा अवमान अधिनियमच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांच्यावर त्वरित कठोर कारवाई करणे अपेक्षित होते, परंतु अद्याप तसे करण्यात आलेले नाही. यामुळे याची सखोल चौकशी झाली पाहिजे. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी संग्राम सावंत, डॉ. उल्हास त्रिरत्ने कॉम्रेड शिवाजी गुरव, नितीन राऊत, किरण के.के. ,मेघराणी भाईंगडे, मनीषा गुरव,संदीप कांबळे,द्वारका कांबळे, शिवाजी इंगळे, दशरथ सोनुले,रविंद्र नावलगी,विजय कांबळे, सुरेश दिवेकर, अमित सुळेकर, दत्तात्रय पाटील,स्मिता कांबळे,महादेव सुतार, डॉ.सुदाम हरेर, महादेव कांबळे, प्रशिक कांबळे, आदित्य कांबळे, सुर्यकांत कांबळे यांच्या सह कार्यकर्ते उपस्थितीत होते.
🛑सुरेखा कुडाळकर अपघातात मयत प्रकरणी एकावर गुन्हा दाखल..
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा मसोबा येथे झालेल्या अपघातामुळे मयत सुरेखा कुडाळकर प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक जयवंतराव शिंपी यांनी आजरा पोलिसात फिर्याद दिली आहे. यातील आरोपीचे विक्रम बापूसो कुडाळकर, रा. सोमवार पेठ, आजरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा दि.११/१२/२०२४ रोजी दुपारी ०१ वा. चे सुमारास मसोबा मंदीरचे पुढे घडला होता. गुन्ह्यातील वाहन – स्प्लेंन्डर टु व्हीलर गाडी नंबर MH09GG8623 गुन्ह्यातील मयताचे नाव सुरेखा विक्रम कुडाळकर, रा. सोमवार पेठ, आजरा, ता. आजरा. यातील हकिकत – यातील फिर्यादी व आरोपी हे नात्याने भाचे व मामा असे आहेत. वरिल तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी व मयत नाव सुरेखा विक्रम कुडाळकर रा. सोमवार पेठ, आजरा, ता. आजरा असे स्प्लेंन्डर टु व्हीलर गाडी नंबर MH-09-GG-8623 वरुन गडहिंग्लज येथील काळभैरी देवाला दर्शनासाठी जात असताना आरोपी विक्रम यांनी आपले ताबेतील गाडी भरधाव वेगाने रस्त्याचे परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून चालवलेने मसोबा मंदिराचे थोडे पुढे आले असता मयत सुरेखा हिचा गाडीवरुन तोल जावुन ती खाली पडलेने तीचे कपाळावर मार लागलेने तीचे नाकातुन व डावे कानातुन रक्त येवुन ती गंभीर जखमी होवुन तीचे मृत्युस कारणीभुत झाले असलेबाबत यातील फिर्यादी यांनी दिले फिर्यादी वरून गुन्हा दाखल केला असून सपोनी यांचे मुखशील आदेशाने
दाखल अमंलदार – पो. बेनके, अधिक तपास अमंलदार – पोहेकाँ शिकलगार करत आहेत.