Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रगोडसाखर कारखान्यामध्ये २९ कोटींचा गैरव्यवहार : डॉ { शहापुरकरांसह २१ जणांवर गुन्हा...

गोडसाखर कारखान्यामध्ये २९ कोटींचा गैरव्यवहार : डॉ { शहापुरकरांसह २१ जणांवर गुन्हा दाखल.}( कारखान्याचे लेखापरीक्षक सुशांत फडणीस यांच्याकडून गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल.)🛑 दत्तजयंती उत्सव. शनिवार १४ रोजी .या सोहळ्यासाठी कर्नाटक, गोवा, गुजरातमधून भाविक नृसिंहवाडीत दाखल..जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दत्त जयंती केली जाते उत्साहात साजरी.

🛑गोडसाखर कारखान्यामध्ये २९ कोटींचा गैरव्यवहार : डॉ { शहापुरकरांसह २१ जणांवर गुन्हा दाखल.}
( कारखान्याचे लेखापरीक्षक सुशांत फडणीस यांच्याकडून गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल.)
🛑 दत्तजयंती उत्सव. शनिवार १४ रोजी .या सोहळ्यासाठी कर्नाटक, गोवा, गुजरातमधून भाविक नृसिंहवाडीत दाखल..
जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दत्त जयंती केली जाते उत्साहात साजरी.

गडहिंग्लज.- प्रतिनिधी.

आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर लि. हरळी या कारखान्यात २९ कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापुरकर यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कारखान्याचे लेखापरीक्षक सुशांत फडणीस यांनी याबाबत गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. बेकायदा डिस्टिलरी विस्तार, जुना गिअर बॉक्स खरेदी व बॉयलर यामध्ये ११ कोटी ४२ लाख ६४ हजार तर आधुनिकीकरण विस्तारीकरण व खरेदीमध्ये अनियमिता झाल्याचे श्री फडवणीस यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये अध्यक्षांसह तत्कालीन कार्यकारी संचालक, सचिव, ठेकेदार यांचा समावेश आहे. यामध्ये अध्यक्ष वगळता कोणत्याही संचालकांना दोषी धरले नसून एवढ्या मोठ्या रकमेचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली असून राजकीय चर्चेला ऊत आला आहे.

Oplus_131072

🟥शनिवार दि.१४ डिसेंबर रोजी दत्तजयंती उत्सव..दत्तजयंती सोहळ्यासाठी कर्नाटक,गोवा, गुजरातमधून भाविक नृसिंहवाडीत दाखल..

नृसिंहवाडी :- प्रतिनिधी.

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली. उद्या,शनिवारी (दि.१४) सायंकाळी ५ वाजता मुख्य मंदिरात दत्तजन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे. दत्त देवसंस्थान व ग्रामपंचायत मार्फत सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दत्त दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात आदी राज्यातून हजारो भाविक नृसिंहवाडीत दाखल झाले आहेत. भाविकांना दर्शनाची सोय व्हावी यासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

🟥उद्या, शनिवारी दत्त मंदिरात पहाटे ४ वाजता काकड आरती व शोडषोपचार पूजा, सकाळी ७ ते १२ यावेळेत पंचामृत अभिषेक, दुपारी १२.३० वाजता श्रींचे चरणकमलावर महापूजा व भाविकांसाठी महाप्रसाद, दुपारी ३ वाजता येथील ब्रह्मवृंदांकडून पवमान पंचसुक्तांचे पठण होईल.
दुपारी ४ नंतर श्री नारायणस्वामी महाराजांचे मंदिरातील श्रींची उत्सवमूर्ती सवाद्य मुख्य मंदिरात आणण्यात येईल त्यानंतर ४.३० वाजता ह,भ.प.भालचंद्र देव (रा.केज आंबेजोगाई) यांचे सुश्राव्य कीर्तन होऊन सायंकाळी ठीक ५ वाजता दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे. जन्माकाळानंतर पारंपारिक आरती, पाळणा होऊन सुंठवडा प्रसाद वाटणेत येणार आहे. रात्री ९ नंतर धूप दीप आरती व पालखी सोहळा होवून रात्रो उशिरा शेजारती होणार आहे. श्रींचा पाळणा जन्मकाळानंतर उत्सवाचे मानकरी बाळकृष्ण राजोपाध्ये यांचे सुयोग हॉल येथे भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
जादा एसटी बसेससह, पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाविकांना दत्त दर्शन सुलभ व्हावे यासाठी दर्शनरांग व्यवस्था, मुखदर्शन, क्लोज सर्किट टीव्ही व्यवस्था, ध्वनीक्षेपक यंत्रणा, सकाळी १० ते रात्री १० पर्येंत मोफत महाप्रसाद, कापडी मंडप, शामियाना, आकर्षक विद्युत रोषणाई, आदी आवश्यक सोयी व सुविधा दत्त देव संस्थान मार्फत करण्यात आली. जादा एसटी बसेससह पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पार्किंगची नेमकी व्यवस्था, फेरीवाले नियोजन, आरोग्य केंद्र, स्वच्छता, दिवाबत्ती आदी आवश्यक नियोजन करण्यात आल्याची माहिती सरपंच चित्रा सुतार व उपसरपंच रमेश मोरे यांनी दिली
.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.