संकेश्वर बांद्रा राष्ट्रीय महामार्गावर अपघातात महिलेचा मृत्यू..
आजरा.- प्रतिनिधी.
आजऱ्याहून गडहिंग्लजच्या दिशेने दुचाकीवरून जाणाऱ्या विक्रम कुडाळकर यांच्या दुचाकीवर मागील सीटवर बसलेल्या त्यांच्या पत्नी सौ. सुरेखा कुडाळकर (वय ५२ वर्षे) यांचे चालत्या दुचाकीवरून पडल्याने व डोक्याला गंभीर मार लागल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बुधवार दि. ११ रोजी बारा वाजण्याच्या सुमारास गडहिंग्लज मार्गावरील सोहाळे – मुंगूसवाडी नजीक सदर अपघात घडला.
विक्रम कुडाळकर हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे मेहुणे आहेत. अपघातानंतर तातडीने सौ. सुरेखा यांना गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सौ. सुरेखा यांच्या पश्चात पतीसह एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
चौकट..
संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्गावर.. टोल वसुली साठी युद्धपातळीवर काम होत असताना.. अद्यापही या मार्गावर काही ब्रिजवरील रस्ते आजही नादुरुस्त आहेत.. नियोजनाच्या अभावामुळे काही ब्रिजवरील नादुरुस्त रस्त्यांचे काम अद्यापही चालू आहे.. अनेक ठिकाणी खड्डे आहेत.. याकडे मात्र राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.. या रस्त्याचे वेगवेगळे अनुभव लोकांना येत आहेत यांच्याकडून देखील अपघात व अति वेगाने येणारी वाहने.. यामुळे अनेक अपघात झालेले आहेत..राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने वेळेत लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा.. अनेकांचे जीव गेले आहेत व जाऊ देखील शकतात..