पंचायत समिती आजरा.. सहाय्यक लेखाधिकारी. रेडेकर यांचे पंचायत समितीत सेवेत. अकस्मित निधन..
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील पंचायत समितीमध्ये सहाय्यक लेखा अधिकारी म्हणून सेवेत असलेले प्रकाश राऊ रेडेकर यांचे आज दि ३ रोजी नुकतेच आकस्मित निधन झाले.. पंचायत समितीमध्ये काम करत असताना आपल्या असनावरच दुःखद निधन झाले.
पंचायत समिती कर्मचारी यांच्यामध्ये हळवळ व्यक्त होत आहे. यातील हकिकत. रेडेकर हे कर्तव्यावर असताना त्यांना बसले ठिकाणी अस्वस्थ वाटु लागलेने त्यांना लागलीच उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय आजरा येथे आणले असता तेथील डाँकटरांनी त्यांना तपासुन ते उपचारापुर्वीच मयत असलेचे सांगितलेने बाजुस प्रमाणे मयत दाखल करुन सदर मयताचा प्राथमिक तपास पो.हे.काँ.1684 मसवेकर यांनी केला असुन पुढील तपास मा सपोनि सो, यांचे आदेशान्वये पो.हे.काँ.655 शिकलगार यांचेकडे देण्यात आला आहे.