🟥मी घरी बसणार नाही, पुन्हा मैदानात उतरणार.- तरुण पिढीचा आत्मविश्वास वाढवणार- शरद पवार यांचा निर्धार
🟥लाडक्या बहिणींना १५०० चे २१०० कधी मिळणार? – एकनाथ शिंदे म्हणाले, लाडक्या बहिणींना २१०० रुपये ठरल्याप्रमाणे लवकरच देणार
🛑जनता सहकारी बँक लि आजरा.- व्हा चेअरमन पदी अमित सामंत यांची निवड.
सातारा :- प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तर हातावर मोजण्या इतक्या म्हणजे 10 जागाच मिळाल्या आहेत. त्यांच्या राजकीय कारकीर्दीत असं कधीच झाले नव्हते. त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. पराभवानंतर शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नव्हती. पण निकालाच्या चोविस तास उलटून गेल्यानंतर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे. शिवाय पराभव का झाला त्यामागची ३ कारणंही त्यांनी सांगितली आहेत.
🟥विधानसभा निवडणुकांच्या निकालाला 48 तास उलटल्यानंतरही शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, त्यामुळे शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज शरद पवार यांनी कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाच्या दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपण पुन्हा मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले. काल निकाल लागला आज मी कराडमध्ये आहे. हा निकाल लागल्यावर एखादा घरी बसला असता. पण मी घरी बसणार नाही. आमच्या तरुण पिढीला हा निकाल लागेल असे वाटले नव्हते. त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. त्यांना पुन्हा उभं करणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं, नव्या जोमाने कर्तृत्वान पिढी उभं करणं हा माझा कार्यक्रम राहील, ‘असे म्हणत शरद पवार यांनी पुन्हा मैदानात उतरुन काम करणार असल्याचे सांगितले आहे.
🔴शरद पवार यांनी विधानसभा निवडणुका निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्याची मागणी केली आहे. तसेच लाडक्या बहिणींना आता पुढचा हप्ता मिळेल. कोणत्याही शेतकऱ्यांच्या घरी वीजबिल येणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. बारामतीमध्ये कोणाला तरी उमेदवारी देणे गरजेचे होते. तिथे जर उमेदवार दिला नसता तर चुकीचा संदेश गेला असता. दोघांची तुलना होणार नाही माहित होते. अजित पवारांचे अनेक वर्षांचे राजकारण, सत्तेतील सहभाग आणि दुसरीकडे नवखा उमेदवार होता. असे म्हणत त्यांनी बारामतीमधील युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार लढाईवर प्रतिक्रिया दिली. दरम्यान, आम्हाला ज्या यशाची अपेक्षा होती तसा निकाल लागला नाही. लाडकी बहीण प्रामुख्याने महत्वाची ठरली. आमचे सरकार नसेल तर ही योजना बंद होईल, असा प्रचार सत्ताधाऱ्यांनी केला. त्याचा फटका बसला असावा, असाही दावा शरद पवार यांनी यावेळी केला. उद्या आमच्या विजयी तसेच पराभूत उमेदवारांची बैठक होणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितले.
🟥लाडक्या बहिणींना १५०० चे २१०० कधी मिळणार? – एकनाथ शिंदे म्हणाले, लाडक्या बहिणींना २१०० रुपये ठरल्याप्रमाणे लवकरच देणार
मुंबई :- प्रतिनिधी.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी लाडक्या बहिणी जमल्या होत्या. त्यावेळी त्यांनी संबोधित करताना लाडक्या बहिनींचे आभार मानले. शिवाय हा लाडका भाऊ तुमच्या मागे खंबिर पणे उभा असल्याचेही त्यांनी सांगितलं. लाडक्या बहिणींनी विरोधकांना शिल्लक ठेवलं नाही. मी सांगत होतो की आम्ही थंम्पिंग मेजॉरीटीने येवू पण त्यांनी विरोधकांना डंम्पिंगमध्ये पाठवलं असंही ते यावेळी म्हणाले.
🟥वर्षा बंगल्यावर महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही सुपरहीट झाली. या लाडक्या बहिणींमुळे महायुतीला मोठा विजय मिळाला. विरोधकांचा सुपडासाफ झाला. त्यांच्याकडे विरोधी पक्षनेता बनवण्या इतके ही संख्याबळ राहीले नाही असं ही शिंदे यावेळी म्हणाले. त्यांना तुम्ही साफ धुवून टाकलं. येवढं मतदान केलं येवढं मतदान केलं की लाडक्या बहिणांची लाट निर्माण झाली असं यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. निवडणुकीत महायुतीने लाडक्या बहिण योजनेचे पैसे वाढवणार असल्याचे आश्वासनही दिले होते. शिवाय निवडणुकी पुर्वी महिलांच्या खात्यात पैसेही जमा केले होते.
🔴एकनाथ शिंदे यांनी बहिणींना आधी 1500 रूपये दिले आहेत. त्याचे आता 2100 ठरल्या प्रमाणे लवकरच देणार आहोत. काळजी करू नका असे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे 2100 रूपये देण्याचा निर्णय महायुतीचे सरकार लवकरच घेईल असंही त्यांनी यावेळी सांगितले. तुम्ही तुमच्या लाडक्या भावांसाठी मतदान केलं. ते यशस्वी झाले. या निवडणुकीत बहिणींची लाट नाही तर त्सुनामी आली. त्यात विरोधक वाहून गेले. सर्वच जण मला किती जागा मिळणार असे नेहमी सांगत होते. मी त्यांना थंम्पिंग मेजॉरिटी मिळणार असे सांगत होतो. पण बहिणींनी कमाल केली त्यांनी विरोधकांना डंम्पिंगचा रस्ता दाखवला. त्यामुळे तुम्हाला द्यावे तेवढे धन्यावाद थोडे आहेत. वर्षा बंगल्या बाहेर मोठ्या प्रमाणात महिलांनी गर्दी केली होती. त्यावेळी विजय उत्सव साजरा करण्यात आला. महिलांनी फुगड्याही घातल्या.
🛑जनता सहकारी बँक लि आजरा.- व्हा चेअरमन पदी अमित सामंत यांची निवड.
आजरा.- प्रतिनिधी.

जनता बँकेच्या सन २०२४-२०२५ ते २०२७-२०२८ या कालावधीकरीता संचालक मंडळावर व्हा चेअरमन म्हणुन अमित रमेश सामंत यांची दि २१/११/२०२४ रोजी बिनविरोध निवड झाली. व्हा चेअरमन पदासाठी अमित रमेश सामंत यांचे नांव संतोष मारुती पाटील यांनी सुचविले आणि त्याला पांडुरंग शंकर तोरगले यांनी अनुमोदन दिले. सभेच्या अध्यक्ष स्थानी आजरा तालुक्याचे सहाय्यक निबंधक सुजयकुमार येजरे साहेब उपस्थित होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री एम बी पाटील यांनी प्रास्ताविक केले आणि आपले बँक सर्व अत्याधुनिक टेक्नॉलोजी सुविधा देणारी बँक असलेचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात सुजयकुमार येजरे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आजरा यांनी जनता बँक ही बहुजन समाजाची बँक आहे ती बहुजन समाजाचीच राहु द्यावी यामध्ये कुठल्याही गटातटाचे राजकारण आणु नये असे आव्हान केले. तसेच नुतन व्हा चेअरमन श्री अमित सामंत यांनी बँकेमध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण आणु देणार नाही. सर्वांना सोबत घेवून बँकेची घोडदोड अखंडपणे चालू ठेवू तसेच येत्या दोन वर्षामध्ये रु ५०० कोटी ठेवीचा टप्पा पुर्ण करणेचे संकल्प करु असे आपल्या भाषणात सांगितले.
बँकेकडे अद्यावत तंत्रज्ञानयुक्त डी सी व डी आर सेंटर असून बँकेच्या २० शाखांपैकी १३ शाखा स्वमालकीच्या इमारतीध्ये कार्यरत आहेत. तसेच बँकेकडे सर्व प्रकारची अत्याधुनिक टेकनॉलॉजी, यु पी आय, आर टी जी एस, एन ई एफ टी, आय एम पी एस, पॉज, ई कॉम, रिसायकलर ए टी एम, एस एम एस सुविधा व मोबाईल बँकींग यासारख्या सुविधा ग्राहकांना उपलब्ध आहेत.
बँकेने आज पर्यंत ९५० लोकांना जवळपास रु. ९५ कोटीची कर्ज आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेमार्फत बिनव्याजी आदा केलेले आहेत. त्याचा सर्व मराठा समाजातील तरुण उद्योजकांनी लाभ घ्यावा. तसेच अन्य समाजातील महामंडळाअंतर्गत तरुण उद्योजकांना व्याज परताव्याची कर्ज ही बँकेने सुरु केलेले आहे. तसेच पंतप्रधान सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाअंतर्गत रु. १० लाखाच्या सबसिडीची कर्जे आज पर्यंत ६० लोकांना रु ९ कोटी कर्ज वाटप करुन बहुजन समाजातील उद्योजकांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम बँकेने केलेले आहे. त्याचाही फायदा उद्योजकांनी घ्यावा असे आव्हान बँकेचे चेअरमन मुकुंददादा देसाई, नुतन व्हा. चेअरमन श्री अमित सामंत, सी ई. ओ , एम बी पाटील व सर्व संचालक उपस्थित होते.