🟥मुख्यमंत्री कोण होणार?
पुन्हा एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस?…चर्चांना उधाण..
🟥राज्यात मोठ्या घडामोडी.- पुढच्या ३६ तासांत कोणत्याही क्षणी होऊ शकतो नव्या सरकारचा शपथविधी
मुंबई :- प्रतिनिधी.
महायुतीच्या सरकारचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्रिपदी कायम राहणार की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनणार? याबाबत वेगवेगळे दावे केले जाऊ लागले आहेत. मुख्यमंत्रिपदी अजित पवारांचीही अचानक वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तीन पक्षांमध्ये सत्ता वाटप करताना काही फॉर्म्युल्यांवर विचार होऊ शकतो.
🅾️महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद कुणाला मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा संधी मिळणार का याबाबत उत्सुकता आहे. रेकॉर्डब्रेक जागा जिंकून आणणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यांचा पुन्हा ‘राजतिलक’ होणार का? याबाबतची चर्चा सुरु झाली आहेत. अजितदादांनाही मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. राजकीय अभ्यासकांच्या मते मुख्यमंत्रीपदासाठी काही फॉर्म्य़ुल्यावर विचार होऊ शकतो.
🔴भाजपमधील फडणवीस समर्थक मात्र छातीठोकपणे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असं सांगत आहेत. शिवसेना नेते तर पुन्हा एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्रिपदाची संधी मिळावी अशी मागणी करु लागलेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार निवडून आले आहेत. भाजपची साथ देणाऱ्या अजित पवारांनाही यावेळी संधी मिळेल असं त्यांचे पाठिराखे सांगू लागले आहेत. असे असले तरी दिल्लीश्वरांच्या मनात काय आहे? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळं महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झाल्यानंतरच सत्तावाटपाचा फॉर्म्युलाही जनतेसमोर येणार आहे.
🟥महायुतीला मिळालेल्या अभुतपूर्व यशानंतर आता सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री कोण होणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे पक्षानं 57 जागा जिंकल्या आहेत. त्याचसोबत त्यांना 4 अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. शिदेंच्या आमदारांनी शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर सर्वाधिक आमदार निवडून आल्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री व्हावा अशी भाजपच्या आमदारांची अपेक्षा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार? याचीच जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
🟥राज्यात मोठ्या घडामोडी.- पुढच्या ३६ तासांत कोणत्याही क्षणी होऊ शकतो नव्या सरकारचा शपथविधी
मुंबई :- प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल पहायला मिळाला आहे. महाविकास आघाडीला अक्षरशः लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. महायुतीने २८८ पैकी २३० जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे. निकालानंतर आता महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत. पुढच्या ३६ तासांत कोणत्याही क्षणी नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो. या अनुषंगाने हालचाली होत असल्याचे दिसत आहे.
🅾️पुढच्या ३६ तासांत कधीही नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो. निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी ही माहिती दिली. शपथविधीत मुख्यमंत्री, उपमुखयमंत्री यांचा समावेश असून, काही आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाऊ शकते. निवडणूक आयोगाचे अधिका-यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
🟥निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती राज्यपालांना दिली जाईल. निवडून आलेल्या आमदारांची यादी राज्यपालांकडे सोपवण्यात येईल. त्यानंतर राज्यपालांकडून नवी 15 वी विधानसभा अस्तित्वात आल्याचं नोटिफिकेशन काढून सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु होईल अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, अद्याप मुख्यमंत्री कोण असेल याबाबत निर्णय झालेला नाही. महायुतीमध्ये बैठकांचा जोर वाढला आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याबाबत देखील कोणताच निर्णय झालेला नाही.
🔴विधानसभेच्या 288 जागांपैकी तब्बल 227 जागा महायुतीनं जिंकल्या. यामध्ये एकट्या भाजपनं सर्वात जास्त 131 जागा जिंकत आपण मोठा भाऊ असल्याचं सिद्ध केलं. तर शिवसेनेनं 55 जागांवर विजय मिळवला. त्याचवेळी राष्ट्रवादीनं 41 जागांवर आपला झेंडा फडकवला. या निवडणुकीत महाविकास आघाडीला अवघ्या 48 जागांवर समाधान मानावं लागलं. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 21 जागा जिंकल्या. तर काँग्रेसला वाट्याला 17 जागा आल्या आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा जिंकता आल्या. तर एकदा हाती सत्ता द्या असं आवाहन करणा-या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा जिंकता आली नाही. तर सत्तेत सहभागी होऊ असा दावा करणारे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला त्यांचा एकही उमदेवार जिंकून आणता आला नाही.