🛑शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे शिवाजी पाटील यांचा विजय निश्चित
अनिरुद्ध रेडेकर यांचा कार्यकर्त्यांसह शिवाजीराव पाटील यांना पाठिंबा जाहीर
चंदगड :- प्रतिनिधी.
चंदगड मतदारसंघाचा विकास व्हायचा असेल तर शिवाजीराव पाटील यांच्यासारखा व्हिजन असलेला दूरदृष्टीचा नेता हवा. मतदारसंघाचा खुंटलेला विकास ही करण्याची धमक फक्त अन् फक्त शिवाजीराव पाटील यांच्यात आहे. त्यामुळे माझी सर्व शिवसेना त्यांच्या पाठीशी असल्याचे मत अनिरुद्ध रेडेकर यांनी सांगितले. सावर्डे येथे शिवाजीराव पाटील यांना आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पाठिंबा जाहीर केला.
रेडेकर पुढे म्हणाले, शिवाजीराव यांचे वरिष्ठ पातळीवरील संबंध आणि मतदारसंघाच्या विकासासाठी असलेली तळमळ ही इतर नेत्यांच्या तुलनेत वेगळी आहे. त्यामुळे या मतदारसंघाला पाटील यांची गरज आहे.
यावेळी शिवाजी पाटील म्हणाले, विकासाची दूरदृष्टी असलेल्या कै. केदारी रेडेकर यांचे सुपुत्र व एकनाथ शिंदे गट शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिरुद्ध रेडेकर गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात आहेत. त्यामुळे त्यांच्या लोकसंपर्काचा मला नक्की फायदा होणार असून भविष्यात त्यांच्या पाठीशी राहणार आहे.

त्यांचा पाठिंबा हा माझ्या विजयाची नांदी असून पुढील काळात अनिरुद्ध रेडेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कुठे ही अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली.
यावेळी मल्हार शिंदे, चाळोबा देसाई, शिवसेना चंदगड विधानसभा प्रमुख मारुती नावलगी , बाबू नेसरीकर यांचासह सर्व कार्यकर्तें उपस्थित होते.
गावचा सर्वांगीण विकास आणि मूलभूत सुविधा पुरवण्यास मागील 40 वर्षातील आमदार व खासदार यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आता सातवणे, हजगोळी व जंगमहट्टी या गावातील नागरिकांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे .

चंदगड तालुक्यातील सावर्डे कार्यालयामध्ये स्वतः भेट देऊन या गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला व युवा वर्गाने पाठिंबा दर्शविला आहे. मागील आमदार आणि खासदार यांनी आपल्या भागाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्हाला बदल हवा याच उद्देशाने आपण सारे जण अपक्ष उमेदवार शिवाजीभाऊ पाटील यांना भरघोस पाठिंबा देत, आपण पाठीशी असल्याचे यावेळी सांगण्यात आले .आमदार नसून देखील एक फोन ला दाद देऊन तळागाळातील जनतेची समस्या सोडवण्याचे कार्य शिवाजी पाटील यांनी आतापर्यंत केले आहे. यापुढेही विकासाबरोबर जनसामान्यांची काळजी घेणारा नेता हवा याच उद्देशाने चंदगड तालुक्यातील सावर्डे कार्यालयाला स्वतः भेट देऊन पाठिंबा दर्शविला जात आहे यावेळी सातवणे गावचे सरपंच विठ्ठल नारायण कांबळे ,मोहन संतु परब, धोंडीबा मनोहर परब ,नारायण गोपाळ पाटील, नारायण धोंडीबा गावडे ,पांडुरंग कृष्णा गोंधळी, सागर रेपे ,शिवाजी गावडे, विठ्ठल कोंडुसकर, अशोक गावडे ,किशोर पाटील, दिनकर गावडे, सागर कांबळे ,अमीर गावडे, तुकाराम आढाव, पांडुरंग मस्कर, किशोर पाटील, तुकाराम कोंडुसकर, शंकर कोंडुसकर, सह अनेक उपस्थित होते, तर हाजगोळी गावचे आनंद कलखाबकर. बाळू कांबळे, महेश गावडे, गणपती कनगुडकर, विठ्ठल पाटील, अशोक पाटील, ज्योतिबा गावडे ,समीर गावडे, आशिष शिंदे, मोहन पाटील , तर जंगमहट्टी गावच्या प्रवीना गावडे ,नंदिनी ओउळकर, अनिता तरवाळ ,सुजाता पाटील, तुळसा कांबळे , जॉयस फर्नांडिस , जनिता फर्नांडिस , क्लोरीन फर्नालीस अंजना गावडे ,जयश्री गावडे ,रंजना गावडे, रेखा दळवी , श्रीमती जोतिबा गावडे, वैशाली भिकाजी , गोविंदकर विद्या कुट्रे ,दीक्षा गावडे, सह अनेकांनी स्वतः भेट देऊन पाठिंबा दर्शविला