Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमहाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.नंदाताई बाभूळकर यांच्या प्रचारार्थ माणगांव (चंदगड) येथे विराट सभा...

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.नंदाताई बाभूळकर यांच्या प्रचारार्थ माणगांव (चंदगड) येथे विराट सभा संपन्न.

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.नंदाताई बाभूळकर यांच्या प्रचारार्थ माणगांव (चंदगड) येथे विराट सभा संपन्न.

चंदगड.- प्रतिनिधी.

चंदगड विधानसभेचे उमेदवार डॉ.नंदाताई बाभूळकर यांच्या प्रचारार्थ खास.शरद पवार यांची सभा संपन्न झाली. यावेळी बोलताना श्री पवार म्हणाले
लोकसभेत ४०० खासदार निवडून आणून संविधान बदल करण्याचा डाव भाजपचा होता मात्र हा डाव सूज्ञ मतदारांनी उधळून लावला.राज्यात महिला असुरक्षित आहेत.६२ लाख युवक बेरोजगार आहेत.शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर बनला आहे.हे सरकार असंवेदनशील आहे. प्रश्नांकडे यांचे दुर्लक्ष आहे त्यामुळे सत्तेवर राहण्याचा त्यांना अधिकार नाही.हे सरकार शेतकरी, महिला, युवकांच्या विरोधातील आहे त्यामुळे बदल करण्याची गरज आहे.फसवणूक करणाऱ्या लोकांना पराभूत करून त्यांना शिक्षा द्यावी असे आवाहन (आम.राजेश पाटील यांचे नांव न घेता) केले.
डॉ.नंदाताई बाभूळकर : या सरकारने लोकशाहीची धुळधाण केली आहे.काळिमा लावणाऱ्या गोष्टी घडल्या संविधान बदलण्याचे पाप भाजप करत आहे.महायुती सरकारने युवकांच्या तोंडातील घास हिसकावून घेत उद्योगधंदे गुजरातला नेले.या जातीवादी शक्तींचा नायनाट या निवडणुकीत होणार आहे.

   १६०० कोटीचा विकास काय केला हा संशोधनाचा विषय आहे.पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा हिशोब जनता २० तारखेला चुकता करणार आहे. हक्काचे पाणी कर्नाटकाला देण्याचा प्रस्ताव विद्यमान आमदारांनी केला.या गद्दारांना गाडण्यासाठीच शरद पवार यांनी मला उमेदवारी दिली आहे.या निवडणुकीत गुंडागर्दी, दडपशाही सुरू आहे मात्र येथील जनता खपवून घेणार नाही.निष्ठावंतांचे की गद्दारांचे सरकार हवे  हे जनतेने जनतेने ठरवावे.चंदगड विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्याची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

 यावेळी काॅ.अतुल दिघे, सुनिल शिंत्रे, एम.जे.पाटील, बाळेश नाईक आदींची भाषणे झाली.या सभेला खास.शाहू महाराज, माजी आम.संध्याताई कुपेकर, बाळ कुपेकर,अमर चव्हाण, रामराजे कुपेकर, रेखाताई हत्तरगी यांच्यासह महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट.

चंदगड विराट सभा.- खास.शरद पवार .-

प्रमुख मुद्दे
संविधान बदलू पाहणाऱ्यांना हाकला, सरकार असंवेदनशील आहे .फसवणूक करणाऱ्या लोकांना मनातून शिक्षा द्या

डॉ.नंदाताई बाभूळकर
२० तारखेला जनता तुमचा हिशेब चुकता करेल, गद्दारांना गाडण्यासाठी उमेदवारी
पहिला गुलाब चंदगड मधून निष्ठावंतांचे की गद्दारांचे सरकार हवे हे जनतेने जनतेने ठरवावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.