Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमहसूल विभागाची मोठी कारवाई.- नवी मुंबईतून ३०० कोटींचे अंमली पदार्थ जप्त.

महसूल विभागाची मोठी कारवाई.- नवी मुंबईतून ३०० कोटींचे अंमली पदार्थ जप्त.

महसूल विभागाची मोठी कारवाई.- नवी मुंबईतून ३०० कोटींचे अंमली पदार्थ जप्त.


नवी. मुंबई. प्रतिनिधी. ०३


महसूल विभागाने नवी मुंबई येथे कारवाई करत ३०० कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहे. नवी मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथून महसूल विभागाने ३०० कोटी रुपयांचे २९० किलो हेरॉईन जप्त केले आहे. महसूल विभागाने हे प्रकरण महसुल गुप्तचर संचलनालयाकडे (डीआरआय) सोपवले आहे. डीआरआय या प्रकरणात २ जणांची चौकशी करत आहे.

संचालनालयाच्या महसूल गुप्तचर यंत्रणेने उरणच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथून ३०० कोटी रुपयांचे हेरॉईन ताब्यात घेतले आहे. या वर्षातील अमली पदार्थाचा सर्वात मोठा साठा यावेळी जप्त करण्यात आला आहे. जेएनपीटी बंदरातून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी २९० किलो हेरॉईन जप्त केले आहे. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या वर्षी डीआरआयने १९१ किलो हेरोइन हेरॉईन जप्त केले होते. तपासादरम्यान हे आयुर्वेदिक औषधी वनस्पती असल्याचे खोटे सांगण्यात आले. पंजाब पोलिसांच्या विशेष टास्क फोर्सने अमृतसर जिल्ह्यातील एका घरातून १९१ किलो हेरॉईन व इतर साहित्य जप्त केले होते. त्यामध्ये दोन अफगाणिस्तानच्या नागरिकांसह सहा जणांना अटक केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.