ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ गावोगावी भजन आंदोलन.
पुणे. प्रतिनिधी. ३
आषाढी वारी साठी पायी वारीसाठी पायी चालत निघालेल्या ह भ प बंडातात्या कराडकर यांना दिघी पुणे येथील पोलिसांनी शुक्रवारी पहाटे ताब्यात घेऊन त्यांना स्थानबद्द केल्याचा निषेधार्थ आज माळशिरस तालुक्यातील अनेक गावांमध्ये भजन आंदोलन करून शासनाच्या निर्णयाचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला .
संत तुकाराम बीजच्या वेळी शासनाने आषाढी पायी वारी संदर्भात निर्णय घेऊन आषाढी पायी वारी होऊ द्यावी यासाठी सुमारे दोन ते तीन महिने ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी शासनास विनंती केली होती.मात्र कोरोनाचे नियम सांगून शासनाने आषाढी पायी वारी कोणत्याही परिस्थिती मध्ये निघणार नाही असे सूतोवाच करत सामान्य वारकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार करून इतर ठिकाणी चालू असलेल्या निवडणुका,कारखाण्याची निवडणूक,आठवडा बाजार,मद्यपान ची दुकाने सर्रास चालू ठेवून दुट्टपी भूमिका घेत कोरोना हा फक्त पायी वारी चालू झाली तर जास्त फैलविला जातो असं सांगून दोन तारखेस चालू केलेली आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी तीन तारखेस पहाटे रोखून ह.भ.प.बंडातात्या यांना स्थानबद्द करून आंदोलन व पायी वारी मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.
ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या अटकेचे वृत्त समजताच महाराष्ट्रातील गावोगावी भजन व दिंडी आंदोलन चालू झाले असून या मधून वारकऱ्यांनी आपला निषेध नोंदविला आहे अकलूज,मलोली,बाभूळगावगुरसाळे, लवंग,महुद,संगम, या भागातील वारकऱ्यांनी भजन आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केला.
पायी वारी साठी शासनाचे सर्व नियम आम्ही पाळतो ,सुरक्षित अंतर,कमी गर्दी ,या सर्व नियमांचे पालन करून सुद्धा आम्हास शासन चालू देत नाही हा कुठेतरी वारकरी संप्रदायाची अवहेलना करण्याचे काम शासन करत असल्याचे ह भ प विठ्ठल महाराज कंधारे यांनी आपले मत व्यक्त केले.